माझा अंदाज योग्य ठरला. दुसऱ्या कवटीचा दिवा विझताच चंद्रकांत आला, मी त्याला लगेच आरशात ओळखले. कारण तो मला एकदा छावणीत भेटला होता.

जेव्हा मी विचारले की तुमचे आत्मचरित्र संपूर्ण वाचता आले नाही; पुढे काय झाले ते सांगू शकाल का? चंद्रकांतनी यावर जे सांगितले ते खालीलप्रमाणे होते... तो म्हणाला

"सलग अनेक दिवस मी दुःख आणि मानसिक त्रासाच्या असह्य अग्नीत जळत होतो. त्यानंतर मी त्या अघोरी साधूच्या शोधात निघालो. मला त्याला विचारायचे होते की त्याच्या विद्येच्या प्रयोगात काही चूक झाली का की इच्छामरणाची शक्ती मिळवण्यासाठी मला हिच किंमत मोजणे अपेक्षित होते?

मी त्याला शोधत राहिलो, पण मला तो संन्यासी कुठेही दिसला नाही. माझा वेग खूप वाढला होता. काही वेळातच मी शेकडो मैलांचे अंतर कापत असे. मी खूप काळजीपूर्वक त्याला शोधत होतो. तरीही मी त्यांला शोधण्यात यशस्वी होऊ शकलो नाही. शेवटी मी त्र्यंबकेश्वरला जायचे ठरवले. माझ्या आत्म्याला तिथे मोठी शांती मिळाली.

पण मी तिथे फार काळ राहू शकलो नाही. अचानक माझी इच्छाशक्ती मजबूत झाली. मी नाशिक स्टेशनवर आलो. कुठेतरी जाणारी एक मेल ट्रेन उभी होती. अचानक माझी नजर प्रथम श्रेणीच्या एका डब्यावर पडली. एक प्रवासी नुकताच आला होता आणि बर्थवर अंथरूण घालू लागला. तो माझ्याकडे पाठ करून उभा होता. तरीही सारखे मला वाटले की मी त्याला कुठेतरी पाहिले आहे आणि जणू मी त्याच्या जवळचा मित्र आहे. कदाचित माझ्या टक लावून पाहण्याने त्याने माझ्याकडे पाहिले असावे.


मी त्याला पाहून आश्चर्यचकित झालो. मला इतका धक्का बसला की मी चपापलो. तो माणूस माझ्याकडे खूप शांतपणे बघत होता. माझ्या आश्चर्याला सीमा नव्हती. ती व्यक्ती "मी" होतो, हो! मीच....चंद्रकांत जोशी!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel