पूर्वी समुद्राच्या कांठी फक्त भाकरीचे पीठच पीठ होते. ज्याला भाकरी खावीशी वाटेल त्याने समुद्रकिनाऱ्यावर जावें, लागेल तेवढे पीठ ध्यावे व भाकरी करून खावी.
पण असा कायदा होता की पीठ लागेल तेवढेच घ्यावयाचे, चिमटीभरसुद्धां जास्त घ्यावयाचे नाही आणि पिठाचा घरी संचय करावयाचा नाही.
मग एकदा एका बाईच्या असें मनांत आले की हा असा त्रास रोजच्या रोज कोण करीत बसतो म्हणून त्या दिवशी तिने चांगले चार दिवस पुरेल इतकें पीठ आणले.
चार दिवस संपल्यावर पुन्हा पीठ आणायला समुद्राच्या काठी गेली.
पण पीठ कुठे गेले? तिने नियम मोडल्याबरोबर पीठ नाहीसे झाले व समुद्राच्या काठी वाळूच वाळू झाली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.