गोल्डीलाक क्षेत्र क्षेत्र हे ताऱ्यापासून अशा अंतरावरील क्षेत्राला म्हटले जाते ज्या ठिकाणी एखादा ग्रह आपल्या पृष्ठावर दरव स्वरूपातील पाणी ठेवू शकतो तसेच पृथ्वीप्रमाणे जीवनाचे पालन पोषण करू शकेल. हे निवासयोग्य क्षेत्र दोन क्षेत्रांचे प्रतीछेदन क्षेत्र आहे जे जीवनासाठी सहाय्यक असले पाहिजे; यातील एक क्षेत्र ग्रह प्रणालीचे आहे तर दुसरे आकाशगंगेचे आहे. या क्षेत्राचे ग्रह आणि त्यांचे उपग्रह जीवनासाठी सहाय्यक आणि उपयुक्त आहेत आणि पृथ्वीप्रमाणे जीवनाला सहाय्यक ठरू शकतात. सामान्यतः हा सिद्धांत उपग्रहाना लागू होत नाही कारण उपग्रहावरील जीवन हे त्यांचे त्यांच्या मातृ ग्रहापासून असलेल्या अंतरावर अवलंबून असते, आणि आपल्याकडे या बाबतील जास्त सखोल माहिती उपलब्ध नाही.
निवासयोग्य क्षेत्र (गोल्डीलाक क्षेत्र) ग्रहावरील जीवन क्षमतेपेक्षा वेगळे असते. एखाद्या ग्रहाच्या जीवनाला सहाय्यक असलेल्या परिस्थितीला ग्रहीय जीवन क्षमता म्हटले जाते. ग्रहीय जीवन क्षमतेमध्ये त्या ग्रहावरील कार्बन आधारित जीवनाला सहाय्यक असण्याच्या गुणधर्मांचा समावेश होतो, तर निवासयोग्य क्षेत्रात (गोल्डीलाक क्षेत्र) अंतराळातील त्या क्षेत्राचे कार्बन आधारित जीवनाला सहाय्यक असणाऱ्या गुणधर्मांचा. हे दोन्ही वेगवेगळे आहेत. उदाहरण म्हणजे आपल्या सौर मालेच्या गोल्डीलाक क्षेत्र मध्ये शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे तीन ग्रह येतात, परंतु पृथ्वी व्यतिरिक्त चे दोन्ही ग्रह शुक्र आणि मंगळ यांच्यावर जीवनाच्या सहाय्यक परिस्थिती अर्थात ग्रहीय जीवन क्षमता नाहीत.
जीवनाला सहाय्यक असलेल्या या क्षेत्राला निवासयोग्य क्षेत्र, गोल्डीलाक क्षेत्र किंवा जीवन क्षेत्र असे म्हटले जाते