प्रथम - कॉम्प्यूटर प्रोग्रॅम नुसार जीवनासाठी गुरु सारख्या ग्रहांच उपस्थिती अनिवार्य आहे जे अंतर्गत ग्रहांना धुमकेतू आणि उल्का यांच्यापासून वाचवतात. हे ग्रह आपल्या गुरुत्त्वाकर्षण शक्तीने उल्का आणि धूमकेतू यांना दूर अंतराळात ढकलून सौर मालेला स्वच्छ ठेवतात ज्यामुळे अंतर्गत किंवा आतल्या बाजूच्या ग्रहांवर जीवन संभव होते. जर आपल्या सौर मालेत गुरु हा ग्रह नसता तर पृथ्वीवर उल्का आणि धूमकेतू यांचा एवढा वर्षाव झाला असता की इथे जीवन संभव झालेच नसते. कार्नेगी संस्थान वाशिंग्टन चे खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जॉर्ज वेदरील यांच्या मते गुरु आणि शनी या ग्रहांच्या अनुपस्थितीत जीवन नष्ट करणाऱ्या घटकांशी पृथ्वीची टक्कर हजारो पटींनी अधिक संख्येने म्हणजे दर साधारण १०,००० वर्षात झाली असती. लक्षात असुद्या, की आज पासून ६.५ कोटी वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका टक्करीने पृथ्वीवरून डायनासोर चे नामोनिशाण मिटून गेले होते. जॉर्ज यांच्या मते अशा परिस्थितीत जीवन कसे शिल्लक राहील याचे अनुमान लावणे कठीण आहे.
द्वितीय - पृथ्वीचा एक मोठा उपग्रह (चंद्र) आहे जो पृथ्वीच्या परिक्रमेची गती नियंत्रित करतो. न्यूटन च्या गतीच्या नियमांनुसार चंद्र नसता तर पृथ्वीचा भ्रमण अक्ष अस्थिर राहिला असता आणि पृथ्वी त्या अक्षवरून कालंडण्याची शक्यता अधिक होती. ही स्थिती देखील जीवन असंभव बनवते. फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ डॉक्टर जेक्स लास्केर यांच्या मते चंद्र नसता तर पृथ्वीचा अंश ० पासून ५४ पर्यंत दोलायमान झाला असता ज्यामुळे जीवन अशक्य बनवणारे विषम ऋतूंचे चक्र निर्माण झाले असते. जीवनाच्या साम्भावानेसाठी ग्रहाच्या जवळ तुलनात्मक दृष्टीने मोठा उपग्रह असणे देखील आवश्यक आहे. या करकला देखील ड्रेक च्या समीकरणात सामील केले गेले पाहिजे. मंगळ ग्रहाचे दोन छोटे उपग्रह आहेत, ते इतके छोटे आहेत की मंगळाचा अक्ष स्थिर करण्यात अक्षम आहेत. मंगळ पूर्वी आपल्या अक्षवरून ढळलेला आहेच आणि भविष्यातही ढळू शकतो.
तृतीय - अलीकडेच मिळालेले भूगर्भीय पुरावे असे सांगतात की पृथ्वीवरून जीवन कित्येक वेळा नष्ट झालेले आहे. जवळ जवळ २ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी पूर्णपणे बर्फाने अच्छादलेली होती. ते हिमयुग होते आणि त्या वेळी जीवन संभाव नव्हते. काही अन्य वेळी ज्वालामुखी विस्फोट आणि उल्कापात यांनी जीवन जवळ जवळ नष्ट केले आहे. जीवनाचेह निर्माण आणि विनाश आपल्या अंदाजापेक्षा देखील अधिक नाजूक आहेत.
चतुर्थ - भूतकाळात बुद्धिमान जीवन देखील जवळ जवळ संपूर्णपणे नष्ट झालेले आहे. नवीन DNA पुरावे पाहता साधारण १ लाख वर्षांपूर्वी कदाचित काही शे किंवा हजार मनुष्य वाचले होते. जिथे अन्य प्राणी, ज्याच्यात विभिन्न प्रजातीत खूप जास्त जेनेटिक अंतर असते, तिथे आश्चर्यकारक रित्या सर्व मनुष्य जेनेटिकली एकसारखेच आहेत. प्राणी जगताच्या तुलनेत आपण सर्व एकमेकांचे क्लोन आहोत. हे अशाच परिस्थितीत शक्य होईल जेव्हा बहुतांश मानव एखाद्या मोठ्या दुर्घटनेत नष्ट होतील आणि केवळ काही मनुष्य मानवी जीवन पुढे घेऊन जातील. जसे एखाद्या ज्वालामुखी उद्रेकाने वातावरण अचानक थंड होऊन जाईल आणि मानव नष्ट होऊन जाईल.
यांच्या व्यतिरिक्त पृथ्वीवर जीवन असण्याची काही अन्य कारणे आहेत -
मजबूत चुम्बकीय क्षेत्र - हे ब्राम्हांडीय आणि सौर किरणोत्सर्ग यांच्यापासून जीवनाचे रक्षण होण्यासाठी अनिवार्य आहे. याच्या अनुपस्थितीत सौर वायूच्या प्रवाहाने पृथ्वीच्या वातावरणाचे क्षरण होत राहील.
पृथ्वीच्या भ्रमणाची साधारण गती - जर पृथ्वीच्या भ्रमाची गती कमी झाली तर दिवस असलेल्या भागात आत्यंतिक उष्मा होईल तर रात्र असलेल्या भागात आत्यंतिक थंडी. जर भ्रमण गती वाढली तर भयानक ऋतू स्थिती निर्माण होईल जसे वादळ आणि वेगवान वारे.
आकाशगंगेच्या केंद्रापासून योग्य अंतर - जर पृथ्वी आकाशगंगेच्या केंद्राच्या जास्त जवळ असती तर भयंकर पातळीवर किरणोत्सर्ग झाला असता, तसेच अंतर जास्त असते तर DNA अणू बनण्यासाठी आवश्यक तत्व मिळाली नसती.