या सर्व कारणांमुळे खगोल शास्त्रज्ञ असे मानतात की जीवन गोल्डीलाक क्षेत्राच्या बाहेर उपग्रह किंवा भटक्या ग्रहांवर संभव आहे, परंतु गोल्डीलाक क्षेत्रात पृथ्वीसारख्या ग्रहांवर जीवनाची संभावना पुर्वानुमानापेक्षा कमी आहे. एकंदरीत ड्रेक च्या समीकरणाचे नवे आकलन जीवनाची संभावना पूर्वी केलेल्या अंदाजांपेक्षा कमीच दाखवतात.
प्रोफ़ेसर पीटर वार्ड आणि डोनाल्ड ब्राउन ली यांनी लिहिले आहे "आपण मानतो की जीवाणू आणि बिवाणु यांच्या रुपात ब्रम्हांडात जीवन सामान्य आहे, कदाचित ड्रेक आणि कार्ल सागन यांच्या गणने पेक्षा खूप जास्त. परंतु प्राणी आणि वनस्पती यांसारखे जातील जीवन पुर्वानुमानापेक्षा खूपच अधिक दुर्मिळ आहे." वार्ड आणि ली पृथ्वीला आकाशगंगेत जीवनासाठी अद्वितीय असण्याच्या संकल्पनेला दुजोरा देतात. हा सिद्धांत आपल्या आकाशगंगेतील जीवन शोधण्याच्या आशेला कमी करतो परंतु दुसऱ्या आकाशगंगेत जीवन असण्याच्या शक्यतेला नाकारत नाही.