ग्रह शोधण्यासाठी आणखी एक मार्ग म्हणजे तारिका संक्रमण विधी. जर ग्रहांच्या कक्षा पृथ्वी आणि त्यांचा मातृ तारा यांच्या मध्ये एकाच प्रतलात पडत असतील तर त्या ग्रहांमुळे आपल्या तार्याला लागणारे ग्रहण पृथ्वीवरून अनुभवता येऊ शकते. जेव्हा हे ग्रह आपल्या मातृ ताऱ्याच्या समोरून भ्रमण करतात, तेव्हा ते आपल्या मातृ ताऱ्याचा प्रकाश काहीकाळ थोडासा मंद करतात. वेधशाळांना प्रकाशातील हा बदल लगेचच समजतो. एका अंतराळात एकापेक्षा जास्त वेळा होणाऱ्या प्रकाशातील या बदलामुळे ग्रहांच्या परिक्रमा काळाची गणना केली जाऊ शकते, प्रकाश कमी होण्याच्या प्रमाणावरून ग्रहांचा आकार समजून घेता येतो. ग्रह जेवढा मोठा तेवढा तो आपल्या मातृ ताऱ्याचा प्रकाश कमी करतो. अशा प्रकारे संक्रमण विधी ग्रहांचा आकार, स्थिती आणि परिक्रमा काळ सांगते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.