परग्रही जीवनाच्या शोधासाठी असलेले ड्रेक चे समीकरण हे पूर्णपणे परिकल्पित (Hypothetical) आहे. हे समीकरण केवळ एक शक्यता दर्शवते जी एक वास्तवता देखील असू शकते. दुसरीकडे सेटी प्रोजेक्ट अंतराळात जीवनाचा शोध घेण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे. परग्रही जीवनाचा शोध घेण्याचा एक उपाय मंजे सौर मालेच्या बाहेर पृथ्वी सारख्या ग्रहांचा शोध लावून सेटी चे संपूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित करावे लागेल.
अलीकडेच अंतराळातील जीवनाच्या शोधला सौर मालेच्या बाहेरील ग्रहांचा शोध लागल्यामुळे मजबुती मिळाली आहे. सौर मालेच्या बाहेरचे ग्रह शोधण्यात एक मोठी अडचण आहे ती अशी की हे ग्रह स्वयंप्रकाशित नाहीत, त्यामुळे ते दुर्बिणीने पाहता येत नाहीत. हे ग्रह आपल्या मातृ तऱ्यापेक्षा हजारो पटींनी धूसर आहेत.


या ग्रहांच्या शोधासाठी खागोल शास्त्रज्ञ ताऱ्यामध्ये एक छोटासा डळमळीत पण शोधण्याचा प्रयत्न करतात. ग्रह आणि तारा दोघेही आपल्या गुरुत्वाकर्षणाने एकमेकांना प्रभावित करतात. याच गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे ते दोघे एकमेकांची परिक्रमा करतात. एकमेकांच्या परिक्रमेचा केंद्र बिंदू दोन्ही ग्रहांच्या संयुक्त द्रव्यामानाचा (center of mass) केंद्र असतो. ताऱ्याचे द्रव्यामान ग्रहापेक्षा कितीतरी अधिक असल्यामुळे हा द्रव्यामानाचा केंद्र ताऱ्याच्या जवळ आणि ग्रहापासून दूर असतो, त्यामुळे ग्रहाचा भ्रमण मार्ग खूप मोठा असतो आणि ताऱ्याचा भ्रमण मार्ग लहान असतो. हे काहीसे असेच आहे, जेव्हा एखादा पिता आपल्या मुलीला खेळवण्यासाठी म्हणून आपल्या हातात धरून गोल फिरवतो, तेव्हा मुलगी एक मोठी गोल फेरी फिरते तर पिता एक लहान वृत्त बनवतो. या गुरुत्वाकर्षणाच्या चढाओढीत जेव्हा तारा आपल्यापासून थोडा लांब जातो किंवा जवळ येतो तेव्हा त्याच्या गतीमध्ये येणारे परिवर्तन डाप्लर प्रभावाने मोजता येऊ शकते. या परिवर्तनाने आपण ताऱ्याच्या जवळपास असलेल्या ग्रहांची उपस्थिती जाणून घेऊ शकतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel