मुंबईतील गर्दीतून वाट काढणे शुकाला चार वर्षांनी सुद्धा सोपे गेले. बस आणि लोकल चा प्रवास दमडी सुद्धा ना देता करून तो दादर मधील आपल्या घराच्या कुंपणाच्या बाहेर आला. दादरच्या गजबजलेल्या भागांतील घर कुणी बळकावले तयार नसेल ना हि भीती त्याच्या मनात होती पण पारवे आणि कुत्रे सोडून आंत कुणी नव्हते. घर फार जुने होते काळ्या पाषाणी दगडांनी बांधलेले. कुंपणाचे दार गंजलेले होते शुकाने त्यावरून आंत उडी मारली. दाराच्या कुलुपाची चावी तुळशीच्या मातीत प्लॅस्टिकच्या थैलींत लपवून ठेवलेली होती. ती काढून त्याने दार उघडले. मुंबई शहरांत प्रचंड गर्दी असली तरी एकाकीपणाची  भावना तितकीच तीव्र असते. तो अश्या प्रकारे घरांत घुसला तरी कोणीही त्याच्या कडे लक्ष दिले नव्हते.

बिल न भरल्याने वीज आणि पाण्याचे कनेक्शन तोडले होते. घरांत अंधार होता. खिडक्या वगैरे उघडून त्याने आंत प्रकाश आणि हवा येऊ दिली. कुबट  कमी होत होता. खिडकीच्या बाजूला अराम खुर्ची होती त्यांत तो बसला. खिडकीच्या बाहेर सदाफुलीच्या झाडाकडे त्याची नजर गेली. झाड आज सुद्धा पूर्वी प्रमाणेच टवटवीत होते. शहरांतील गर्दीच्या आवाजांत कावळ्यांचा आवाज तो ऐकू शकत होता. कावळ्यांची दृष्टी तीव्र असते. तांत्रिक लोकांचे कावळे हे मित्र असतात कारण कधी कधी आत्म्याची संपर्क करणे, अतींद्रिय शक्तींना ओळखणे हे कावळे सहज पणे साध्य करू शकतात. उत्क्रांतीत कावळ्यांना हि शक्ती का प्रदान झाली हे ठेवून नाही पण मानवी जगांत ज्या प्रमाणे मॅट्रिक लोक प्रेतांना हाताळतात त्याच प्रमाणे प्राणी जगांत गिधाडे आणि कावळे हे काम करतात. त्यामुळेच कदाचित त्यांना हि शक्ती प्राप्त झाली असावी.

बराच वेळ शुक मनात अनेक विचार घोळवीत खुर्चीवर बसला होता. त्याच्या पुढे तळघराचे दार होते. कदाचित सामान ठेवण्यासाठी ती लहानशी खोली बांधली गेली असावी. त्याला आंत जायचे होते पण आंत जे काही होते त्याला सामोरे जायला त्याला भीती वाटत होती. पण उपाय सुद्धा नव्हता. तळघराच्या दरवाजा त्याने mseal लावून सील केला होता. आंत हवा जाणे शक्य नव्हते. बराच वेळ ते खरवडयाला गेला. शेवटी दार एकदाचे हलले. आतून काही वास येतोय का हे त्याने आधी हुंगून पहिले पण काहीही वाईट वास आला नाही आणि त्याला समाधान वाटले. हलकाच धक्का देऊन दार उघडले. तो आंत गेला. प्रचंड अंधारातून काही पावले खाली गेला. अंधाराची अपॆक्षा सल्याने एक विजेरी आंत होती ती त्याने पेटवली. वर्तुळाकार उजेडाने ती छोटीशी खोली प्रकाशमान झाली.

मध्ये एक संदूक होती त्यावर कपड्याचे आवरण. वर त्याची आई बसली होती. तो सोडून गेला होता तशीच. तेच तारुण्, तेच तेज. ती मृत होती हे कुणीही म्हटले नसते. आज सुद्धा ती १८-१९ वर्षांची वाटत होती. दोन्ही मनगटाच्या ज्या नसा फाटल्या होत्या फक्त तोच भाग थोडा मृत वाटत होता. नसा रक्तवर्णीय नसून थोड्या काळ्या वाटत होत्या रक्त सुखल्या प्रमाणे. जो लेप त्याने आईच्या प्रेतावर लावला होता त्याने आपले काम फार छान केले होते.

शुक आईचा पायाजवळ बसला. आपले हात त्याने आईचा पद्मानसात असलेलया मांड्या वर ठेवले. आई मी आलोय. तुझ्या आज्ञे प्रमाणे मी ती विद्या घेऊन आलोय जीने मी तुला मुक्त करेन. मला रक्तसंभव सापडले त्यांनी मला विद्या शिकवली सुद्धा. अचानक त्याला आपल्याला रक्तसंभव कसे सापडले हे आठवले. आईच्या प्रतच्या शेजारी तिच्याच रक्ताने भरलेली बाटली ठेवली होती. त्यातील काही थेम्ब त्याने आपल्या मुखांत ठेवले होते. रक्तात आपल्या अनेक जन्माच्या आठवणी आणि सिद्धी असतात. यक्षीचे रक्त जास्तच प्रभावी असते. शुक खराच जरी तिचा पुत्र असता तर त्याच्या रक्तांत सुद्धा सिद्धी असत्या. त्याच्या आईला ज्या नरक यातना भोगाव्या लागल्या त्यांचा बदल घेणे त्याला शक्य झाले असते. पण तो होता साधारण मानव. बाहेरील जगांत किड्या मुंग्याप्रमे जगणारे आणि लोकसंख्या वाढवणारे दुर्दैवी जीव अशी व्याख्या त्याच्या आईच्या छळणूक करणार्याने केली होती.

शुकाला यक्षी ने का जवळ केले होते ? आपण खाता खाता एखादा रस्तावरच्या कुत्रा पायाकडे घोटाळतो आंही आम्ही दयेने एक तुकडा त्याच्याकडॆ फेकतो कदाचित असेच काही घडले असेल. यक्षीने त्याला का घरी आणले आणि लहानाचे मोठे का केले हे कोडेच होते. पण प्रेमात काहीही कमतरता ठेवली नाही. इतरां प्रमाणे यक्षी चिरतरुण होती. जेंव्हा पासून पहिली तेंव्हा पाहून वीस वर्षां पेक्षां लहान. शुक १४ वर्षांचा झाला तेंव्हा त्यांना कुणीही बाऊ बहीण समजले असते. पण तिचे जग आणि तिची रीत वेगळी होती. तिच्या समस्या शुकाच्या समजुतीच्या पलीकडील होत्या. त्याला सर्व काही समजायला खूप काळ गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel