"सुलतान खान" हे नाव त्याच्या मनावर कोरले गेले होते पण हळू हळू सुलतान खान पुन्हा पुन्हा घरी येऊ लागला. प्रत्येक वेळी त्याचा कटाक्ष हृदयाचा ठोका चुकवून जायचा. इतक्या घृणेने कुणीही त्याच्याकडे आधी पहिले नव्हते.

पण ब्रिगेडियर च्या वेषांत आलेला सुलतान खान नंतर वेगवेगळ्या वेषांत आला. कधी मोठा बिसिनेसमॅन बनून. तो गेला कि आई चिंताग्रस्त व्हायची. "मला तू सोडून जाशील का ? " शुकाने तिला अनेकदा अश्रुपूर्ण नजरेनी विचारले. "नाही, कधीही नाही" ती उत्तर द्यायची. पण अनेकदा ती बाहेर जायची. कधी बिसिनेसमेंन सुलतान खान बरोबर तर काही मंत्री सुलतान खान बरोबर. सुलतान खान ने त्याला मारायची धमकी दिली होती आणि त्याला वाचवण्यासाठी आई हे सगळे करतेय हे त्याला लक्षांत हळू हळू आले. आईच्या शरीरावर फिरणारे सुलतान चे हात त्याच्या डोळ्यांत सुई प्रमाणे खुपसू लागले त्याच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली पण आपण काहीही करू शकत नाही ह्या भावनेने तो हतबल सुद्धा झाला.

शेवटी आईने त्याला सत्य सांगितले. त्याची आई साधारण स्त्री नसून एक यक्षिणी होती. तिचे नाव होते अनंतमती. चिरतारुण्य लाभलेली. शुकाला तिने दत्तक घेतले होते. हजारो वर्षे पृथ्वीतलावर तिचे वास्तव्य होते. तिचा संपूर्ण समाज कालौघात नष्ट झाला होता. तिने हरप्पा संस्कृती पहिली होती आणि शिवाजीचे सैन्य पहिले होते. प्रथम महायुद्धांत ती पोलंड मध्ये आणि द्वितीय महायुद्धांत ती इटली मध्ये होती. तिने आपल्या कपाटांतून काही फोटो काढून दाखवले. अत्यंत जुन्या फोटोग्राफ मध्ये ती हिटलर सोबत विदेशी वेषांत होती.

शुकाचे डोके भांबावून गेले. पण तिने आपल्या दोन्ही हातांत त्याचा चेहरा गच्च पकडला. "तो आम्हाला सोडणार नाही शुक" तिच्या डोळ्यांत हतबलता दिसत होती. सुलतान खान यक्षिणीला मारेल ? तो काही साधारण मानव नव्हता. तिच्यापेक्षा जुना एक कनिष्ठ असुर होता. कथा पुराणात ज्या असुरांचे वर्णन होते त्या प्रमाणे करूणा नसलेला, अतिमानवीय शक्ती असलेला असुर. मानवी मनाला भ्रमित करणे त्याच्या साठी डाव्या हाताचा खेळ होता. त्यामुळेच सध्या तो नेता, व्यावसायिक, मिलिटरी अधिकारी अशी अनेक रूपे धारण करून फिरत होता. त्याला मी मागे पहिले होते प्रथम महायुद्धाच्या वेळी. पोलंड मधून ब्रिटन मध्ये प्रवास करताना एका भाडोत्री सैनिकांच्या तुकडीने तिच्या सर्व महिला मित्रांसह पकडले. ती सहज पळून जाऊ शकली असती पण कॅप्टन फ्रॅंक ने तिचा हात पकडला तेव्हांच ती समजली कि ह्या वेळी ती एका वेगळ्या शक्तीला सामोरे जात आहे. विश्वांत तिच्या सारख्या शक्तींना शोधणारे तांत्रिक, मांत्रिक, अवलिये सगळीकडे पसरले होते पण बहुतेकांना ती पुरून उरायची. पण कॅप्टन फ्रॅंक वेगळा होता. त्याच्या पकडी पुढे तिचे काहीही चालले नाही. त्यानंतर सुरु झाला बलात्काराचा प्रयत्न. तिने प्रतिकार केला पण एक क्षण असा आला जेंव्हा तिचे सर्व अंग शिथिल झाले. काही वेळाने तिला ते सर्व आवडायला सुद्धा लागले. तिचा प्रतिकार त्याला आवडत होता आणि त्याची जबरदस्ती तिला खेचत होती. पण हे प्रेम नव्हते. यक्षिणीना दैवी शारीरिक सौन्दर्य असते. माणसाने त्याचा उपभोग घेतला तर त्याचा विनाश अटळ असतो पण असुरा साठी ती मंदिरे समान असते. आधी हवे हवे से वाटणारे त्याचे शरीर तिला झेपेना झाले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण मदिरेच्या आहार गेलेला पुरुष जसा गुपचूप मंदिरालयांत पोचत तशी ती त्याच्या कडे आकृष्ट झाली.

नंतर तो स्वतःहून गायब झाला. तेंव्हा द्वितीय महायुद्ध सुरु झाले होते. अनंतमती भारतांत आली आणि फ्रॅंक आपल्याला कधीही पुन्हा भेटणार नाही अशी समजूत घेऊनच पण ती समजूत खोटी होती. त्याच्या साहवसंत असताना मानवांवर अनन्वित अत्याचार करताना तिने पहिले होते. अनेक लोकांना त्याने नरबळी दिले होते, कित्येक कुमारिकांचा त्यांच्या आईवडिला पुढे कौमार्यभंग केला होता. त्याच्यासाठी कुणाला जिवंत जाळणे हि सामान्य शिक्षा होती. पण पृथ्वीलोक मध्ये एक फार पुरातन म्हण आहे कि मानवी इच्छाशक्तीपुढे सर्व शक्ती अनपेक्षित पणे फोल ठरतात. द्वितीय महायुद्धांत मानवी शक्तीने असुरी शक्तीचा सुद्धा परायज केला होता. नाझींच्या बाजूने फ्रॅंक असून सुद्धा नाझींचा पूर्ण पाडाव झाला होता.

शुकाने सर्व माहिती डोक्यांत घेतली खरी पण त्याचा विश्वास बसणे अशक्य होते. अनंतमती ने त्याला सर्व काही विस्तारपूर्वक सांगितले.

"आम्ही पळून गेलो तर ?" त्याने प्रश्न केला.

"मी कदाचित शास्ता सरोवरांत जाऊन राहू शकेन पण पुन्हा बाहेर पडणे मला शक्य नाही आणि तू तर मानव आहेस तू जाऊन जाऊन कुठे पळशील ? " तिला ठाऊक होते कि फ्रॅंक उर्फ सुलतान खान उर्फ राजशेखर बिर्ला सगळे एकाच असुराची रूपे आहेत. "तो फक्त हवेचा वास घेऊन तुला शोधून काढू शकतो."

"पण त्याला काय हवे आहे ? आम्हाला मारून त्याला काय मिळेल ? " शुकाने आईला विचारले होते.

"तुला तो मारून टाकील आणि मला ठेवील माझ्या शक्ती साठी. त्याच्या मनात काही तरी मोठी योजना आहे. त्याच्या काळांत तो सर्वसाधारण असुर होता. पण ह्या काळांत त्याच्या थोड्याश्या शक्तींनी सुद्धा तो खूप काही अरु शकतो. त्याच्याकडे फार सिद्धी आहेत. यक्षिणींना जास्त शक्ती नसतात, सौन्दर्य, भ्रम, इत्यादी माझ्या शक्ती आहेत. पण त्याच्या प्रमाणे ह्या पृथ्वीवर इतका समय व्यतीत केलेली मी कदाचित एकमेव स्त्री असेंन. मला तो शोभेची वस्तू म्हणून सुद्धा ठेवू शकतो" तिने सांगितले.

"आई तू सांगीन ते मी करिन पण मला तुला नाही सोडून जायचे. " आपल्या आईच्या प्रेमाची गोष्टच निराळी आहे हे शुकाला जाणवत होते. तिचे सौन्दर्य अपरंपार वाटत होते. ती साक्षांत करुणामयी देवी वाटत होती.

"उपाय एकच आहे शुक" तिने शून्यात नजर लावून सांगितले. तिने जे काही सांगितले ते शुकाच्या समजुतीच्या बाहेर होते. शुकाला सर्वकाही समजण्यास खूप वेळ लागला. पण यक्षिणी अनंतमती कडे ज्या काही ठराविक सिद्धी होत्या त्यांत प्राणरोपण प्रयोग सुद्धा होता. तिचे सुंदर शरीर खरे तर तिचे नव्हतेच मुळी. ती कुणाचेही शरीर धारण करू शकत होती. त्याच्या पुढे असणारी सुंदरी तरुण माता प्रत्यक्षांत ३० वर्षां मागे मृत झालेली कोणी युवती होती.

तिने स्वतःच्या हाताची नस कापली. रक्ताचा सदा सर्वत्र जमिनीवर पसरला. भयचकित नजरेने शुक पाहत होता. तिने दुसऱ्या चाकूने शुकाचा दावा हात कापला. दोघांचे रक्त मिश्रित झाले. काही मिनिटांनी अनंतमातीचे शरीर धडकारून कोसळले आणि तिचा प्राण शुकाच्या शरीरांत वास करून गेला. तिच्या प्रमाणे शुकाला सुलतान खान च्या शक्तीपासून रक्षित केले होते. सुलतान खानला आत त्याला शोधणे मुश्किल होतेच पण यक्षिणी स्वतःच्या प्राणाचे अर्पण करून इतकी मोठी जोखीम उचलेले हे कदाचित त्याला सुद्धा अनाकलनीय होते. मृत मातेचे शरीर शुकाने काळजी पूर्वक उचलले आणि तिने दिलेल्या आदेश प्रमाणे एका गुप्त जागी जपून ठेवले.

पुढील पाऊल लवकर उचलणे आवश्यक होते. पाहिजे तर सुलतान खानला घरांत घुसून ते शरीरं नष्ट करणे सहज शक्य होते पण ती असे आत्मसमर्पण करेल तर तो त्या घरांत आला सुद्धा नसता. त्याच प्रमाणे अनेक दिवस गेले तरी सुलतान खा अजिबात फिरकला नाही कदाचित अनंतमातीने आत्मनिषेध केला हे हे त्याला समजले होते. पुढील पावूल म्हणून रक्तसंभावांचा शोध घेणे आवश्यक होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शुकाला जगभर फिरायचे होते पण स्वामी रक्त संभव त्याला महाराष्ट्रांतच सापडले.

इतक्या वेळाने आईच्या कलेवर पुढे बसलेल्या शुकाला  आठवण झाली कि त्याच्या आईच्या प्राणशक्तीमुळेच त्याला आस्चर्यकारकरित्या रक्तसंभावांचा पत्ता मिळाला होता. अनेक प्रकारचे ज्ञात केवळ तिच्या आत्मशक्तीमुळे त्याच्या शरीरांत आले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please login to comment. Click here.

It is quick and simple! Signing up will also enable you to write and publish your own books.

Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा


पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा