"पंगिरा " विश्वास पाटील यांची ग्रामीण भाषेतली, ग्रामीण जीवनाविषयी लिहली कादंबरी. तसी मला विश्वास पाटील यांची ओळख नवीन नाही. शालेय जीवनात मराठीच्या पाठा पासून त्यांची ओळख झाली. नंतर "पानिपत"व "महानायक" वाचल्यावर खात्री पटली की विश्वास पाटील म्हणजे इतिहास विषयक मोठे लेखक पण "पंगिरा"वाचल्यावर मात्र माझा सर्व कयास मोडीस निघाला.
"पंगिरा" मध्ये त्यांनी "पंगिर" गावचे जे वर्णन केले आहे तीच स्थिती भारतातील अनेक गाव मध्ये आज सुद्धा अनुभवला मिळते.
कथा थोडक्यात:- आंबेपुर जिल्ह्यातील "पंगिर" हे सदन - समृध्द गाव.गावातील माणसे पण "पंगिरा"नदीमुळे व "यमाई-सदोबा" मुळे सुखी. गट-तट या राजकारणच बळी पडलेले गावकरी. सरपंच सकोजी राव डुकरे यांचा गट हा माजी आमदार बाबासाहेब सावंत यांच्यशी निगडित तर सावंत यांचा पराभव करून आमदार झालेले संताजी काळे यांचा पोलीस पाटील ज्ञानोबा साळवी, मुरार पाटील यांचा विरूद्ध गट. यांचा भांडणीत आपली पोळी भाजून घेणारे भिकू आण्णा व सेवा निवृत्त विचारे गुरुजी. भिकू अण्णा गावकऱ्यंना सरकारी कचेरी मध्ये गुंतवून मलिदा खाणारे तर विचारे गुरुजी आंबई चे वन राखण्याच्या नावाखाली संपुर्ण गावाची जमीन हडप करणारे. यांच्या वरील कळस म्हणजे सरपंच यांचं मुलगा संपत राव आणि त्याचा तथा कथित कंत्राटदार मित्र तानाजी. आबासाहेब कांबळे सारखा आईच्या कष्ट्यावर उच्चशिक्षण घेऊन वकिली करणारा कृतघ्न मुलगा, तसेच हनुमंत मुरार पाटील सारखा वकील बापाची मान सरपंचाने लावल्या कायद्याच्या सोडवणुकीसाठी कोर्ट च्या पायऱ्या झिजून जालेला. दुसऱ्याचे घर फोडणे हे सरपंचचे आवडते काम जेणेकरून गावावर आपला वचक राहून अपला मुलगा गावाचा भावी नेता बनवा अशी इच्छा राखणारा. पलीकडील छोट्या भावाला म्हणजे डोंगरवडी ला त्रास देण्यात पंगिरकर पुढे . लोकसंख्या च्या दृष्टीने पांगिर मोठे तर डोंगर वाडी लहान.
ऊस सारख्या नगदी पिक घेऊन पंगिर् मधील शेतकरी गबरू झालेले पण शर्मा नावाच्या कृषीविज्ञानयोगी यांचा सल्ला टाळून पाण्याचा अमर्याद वापर करणारे, दुष्काळी झळ सोसावी लागल्या वर कुटे ठिकाणावर येतात. पण जलसंवर्धन ना साठी डोंगर वाडी चा निर्घृण बळी घेण्यास तयार असतात.त्याला साथ लाभते ती हलाखी च्या स्थितीतून वर आलेले आमदार काळे हे मताचा बेगमी साठी पाठीशी उभे राहतात, पण त्या मुळे डोंगर वाडी - भकास वाडी कडे झुकलेली. दुष्काळानंतर पंगिर मध्ये हळव्या कांद्याचे अमाप पीक येते पण व्यापारी शेतीमालाचा भाव पाडून शेतकरीची पिळवणूक करून त्यांना माथ्यावर हात मारून त्यांचा स्वप्नाचा चुरडा करण्यासाठी टपलेले.
आज पांगिर सारखी स्थिती गावोगावी झाली आहे. सुखाच्या आणि पेसा च्या लोभापायी आज माणूसपण आणि गावपण हरुवून बसला आहे.
शुभम रत्ना पाटोळे.

विश्वास पाटील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel