श्यामल वर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूंच हरी ।

आरती करितों बहु प्रेमानें भवभयसंकट दूर करी ॥ धृ. ॥

दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवतरसी ।

भक्त काज कल्पद्रुम म्हणुनी निशिदिनीं ध्याती भक्त तुशीं ॥

अतिविधर जो काळा फणिवर कालिय यमुना जलवासी ।

तत्फणिवर तूं नृत्य करुनी पोंचविलें त्या मुक्तींसी ॥ १ ॥

कैटभ चाणुर कंसादिक हें शौर्ये वधिले अमित अरी ।

नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिती लीला बहुत परी ॥

अपार महिमा श्रवण करोनी भजती त्यातें मुक्त करी ।

दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥ २ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel