कोण शरण गेले विधि त्रिपुरहरणा ।

गोरुपा भूदेवांसह दु:खोद्धरणा क्षीराब्धिस्थें कोणीं येऊनियां करुणा ॥

नाभी नाभी गर्जुनी केले अवतरणा ॥ १ ॥

जय देव जय देव जय मेघश्यामा ।

ब्रह्मचारी म्हणविसी भोगुनियां श्यामा ॥ धृ. ॥

पद लाउनि विमलार्जुन कोणीं उद्धरिला ।

क्षणमात्रें दावनल कोणी प्राशियला ॥

बालपणी शकटासुर कोणीं नाशियला ।

बालक देउनि कोणीं गुरु संतोषविला ॥ जय देव ॥ २ ॥

वासुदेवासह जातां लावुनिया चरणां ।

कोणीं उथळ केली अवलीळा यमुना ॥

अवतारें अरुणानुज निजवाहन कोणा ।

मोहरिनादें कोणा लुब्ध व्रजललना ॥ जय देव ॥ ३ ॥

भोगनियां भोगातित कोणातें म्हणती ।

भारत भागवतवादी कोणाची ख्याती ॥

ऎसा तूं परमात्मा परब्रह्ममूर्ती ।

एकाजनार्दनह्र्दयीं ध्याता हे चित्ती ॥ जयदेव ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel