जयजयजी कृष्णनाथ रुक्मिणीवरा ।

पंचारति करितों तुज तारिपामरा ॥ धृ. ॥

गोकुळांत जन्मुनियां भक्त तारिले ।

सजलजलदरुप तुझे केवि शोभले ॥

तेजें तव भानुशशी खचित लोपले ॥

उत्सव बहु थोर मनी जाहला सुरां ॥ जय ॥ १ ॥

माव करुनि विधिनें गो गोवत्सें चोरिली ।

कौतुकाने सत्य लोकि अवधि लपविंलीं ॥

दोन्हिं ठाई गोवत्सें तूचि दाविली ।

न कळे तव पार कदा निगममंदिरा ॥ जयजयजी. ॥ २ ॥

वसुदेव देवकीचा बाळ म्हणविला ।

मुक्त करुनि पितृबंध कंस मर्दिला ॥

उग्रसेन मथुरेचा भूप स्थापिला ।

दुष्ट दैत्य मर्दियेले भक्तभवहरां ॥ जय. ॥ ३ ॥

सन्मार्गी भक्तजना लाविसी खरा ।

निशिदिनि जें ध्याती त्यां तारिसी पुरा ॥

दास विनवि हे तुजला इंदिरावरा ।

बलवंता भजनप्रेम दे गदाधरा ॥ जय. ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel