पापांचे पर्वत मोठे झाले । शरीर नासलें अधोगती ॥ १ ॥
जन्मांतरीं केलें अवघें व्यर्थ गेलें । देह हो नासले क्षणामाजी ॥ २ ॥
जिणें आशाश्वत देह नाशिवंत । अवघें सारें व्यर्थ असे देखा ॥ ३ ॥
कांहीं नाहीं दान कांहीं नाहीं पुण्य । जन्मासी येऊन व्यर्थ जाय ॥ ४ ॥
परोपकार कांहीं नाहीं केला देवा । सद्गुरु केशवा ह्रदयीं ध्यावा ॥ ५ ॥
सारामध्यें सार नाम असे थोर । ह्रदयीं निरंतर नरहरीच्या ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.