शरीराची होय माती । कोणी न येती सांगाती ॥ १ ॥

सारी अवघीं कामें खोटी । अंतीं जाणें मसणवटी ॥ २ ॥

गोत घरें टाकुन सारी । शेवटीं गांवाचे बाहेरी ॥ ३ ॥

स्वजन आणि गणगोत । उपाय नाहीं हो चालत ॥ ४ ॥

ऐसें स्वप्नवत असार । नरहरी जोडितसे कर ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel