पंढरपुरचा जाणा विठ्ठल धणी । राणी रुक्मिणी सत्यभामा ॥ १ ॥

भूमीमध्यें गुप्त कानोपात्रा झाली । उजवे बाजू ठेली लक्ष्मी ते ॥ २ ॥

पुढें हो प्रतिमा नामदेव पायरी । उभा महाद्वारीं चोखामेळा ॥ ३ ॥

पुढे मल्लिकार्जुन महिमा असे फार । लिंग असे थोर महादेवाचे ॥ ४ ॥

पुढें भागीरथी मध्यें पुंडलिक । आणिकही तेथें वेणुनाद ॥ ५ ॥

आषाढी कार्तिकी साधुसंत येती । गोपाळकाला करिती आनंदानें ॥ ६ ॥

देवाचें समोर नरहरी सोनार । ह्रदयीं निरंतर नांव घेतो ॥ ७ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel