प्रारब्धाची गति । कदाकाळीं न सोडिती ॥ १ ॥

होणार सोडिना । आलें कपाळी टळेना ॥ २ ॥

दैवयोगाची गती । जी होणार ती होती ॥ ३ ॥

जें जें कर्माचें फळ । तें तें भोगावें सकळ ॥ ४ ॥

ज्याचें बीज पेरियेलें । त्याचें त्यास फळ आलें ॥ ५ ॥

ज्यानें जैसें आचरिलें । तैसें त्याच्या फळा आलें ॥ ६ ॥

मानवाचें कल्पना बळ । देव करितों सकळ ॥ ७ ॥

किल्ली कैसी चालविली । घडामोडी कैसी केली ॥ ८ ॥

सत्य सार बुडविलें । अवघे असत्यचि झालें ॥ ९ ॥

नरहरी म्हणे नाम थोर । नाम साराहुनी सार ॥ १० ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel