पंढरी नगरी दैवत श्रीहरी । जाती वारकरी व्रतनेमें ॥ १ ॥
आषाढी कार्तिकी महापर्वें थोर । भजनाचा गजर करिती तेथें ॥ २ ॥
साधुसंत थोर पताकांचा भार । मुखीं तो उच्चार नामामृत ॥ ३ ॥
आनंदाचा काला गोपाळकाला केला । ह्रदयीं बिंबला नरहरी ॥ ४ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.