सृष्टीची निर्मिती त्यात असंख्य सजीवांचा जन्म त्यातीलच एक निर्मिती आपण मन भावना बुद्धी असलेला मानवी देह या ऋणातून त्या ऋणात असा जाता जाता एकमेकांशी बांधला जातो .त्याचे व्यव्हार नकळत या ऋणातूनच निर्माण होत गेले अशा प्रकारचे ऋणानुबंध तयार होत एक व्यक्ती दुसऱ्या शी काहीतरी ऋणातून एकमेकांना जोडला जावू लागला मग त्यात नाते नातेसंबध असे भावनिक शब्द तयार झाले असावेत प्रत्येक जण काहीतरी ऋणातूनच एकमेकांशी बांधला जात असेल का? तर कधी कधी नातेसंबधातही कटुता बघायला मिळते मग याला काय नाव?? असे अनेक प्रश्न ??
एकमेकांबद्दलची सहानुभुती त्यातून निर्माण होणारा स्वार्थ म्हणजे ऋणानुबंध कि केवळ व्यवहार कर्तव्याचे ऋण फेडण्यास जोडलेली एकत्र आलेली मानवी मने म्हणजे ऋणानुबंध....!!
ऋणानुंबधाशिवाय कुणी कुणाच्या आयुष्यात येत नाही ह्या
जन्माशी आईचा ऋणानुबंध त्यातूनच आईला मुलांबद्दल प्रेम आपुलकी वाटू लागते मग या ऋणानुबंधाला सुरुवात होते...एखाद्या ओहोळाप्रमाणे हे ऋणानुबंध एकमेकांत कधी सहानुभूती तर कधी खरं अधोरेखित प्रेम वृद्धींगत होत ऋणानुबंधाच्या गाठी तयार होत राहतात. काही निरगाठी तर काही सूरगाठी....!!आपले एखाद्या शी उत्तम पटते तर एखाद्या शी कमी मग ते कुटुंब असू देत शेजारी पाजारी मित्रमैत्रीणी हे ऋणानुबंधामुळेच.....!
माणसाला या ऋणात अडकल्यामुळे सतत अनामिक भीती वाटत राहते ऋणातून मुक्त होण्यासाठी कधी कधी तयार होणारे ऋणानुबंध नकारात्मकता देतात कदाचित सूर जुळलेले नसतात आयुष्यातील काही क्षण बेसूर होवून जातात द्वेष तिरस्कार अशा भावना हे ऋणानुबंध बिघडवतात तर कधी हेच ऋणानुबंध स्वार्थापलीकडेही बघायला शिकवतात चांगुलपणाने जोडले जातात एखाद्या च्या सुखासाठी झुरायला शिकवतात ते हे ऋणानुबंधच..
तर कधी कधी सगळे शब्द सगळ्या ओळी सगळे संवाद गोठवून सहानुभूतीने त्याग करायला लावतात.पण कधी मित्रांच्या घोळक्यात आठवणींच्या कक्षेत माणसांच्या भाऊगर्दीत आपल्याला सामावून घेणारे ऋणानुबंधही तयार होतात अगदी मनस्वी नात्यांतून ज्या जाणीवा घेवून हे ऋणानुबंध तयार होतात तिथे व्यवहार स्वार्थ ह्याच्याही पलीकडची आसक्ती निर्माण करतात ओढ लावतात ते हेच ऋणानुबंध मग अनेक आठवणी जागवत स्वतःच्या च मनाचे समाधान करत मन गुरफटू लागते जागवू लागते नवीन आशा ह्या ऋणानुबंधामुळेच...,!!!
प्रत्येक नात्यातील गोडवा चाखत जीवनचक्र ह्या ऋणानुबंधात अडकत जाते एका नव्या जाणीवेने अस्तित्व टिकवण्यासाठी कारण आपलं अस्तित्वच ही खरी आपली अस्मिता खूणगाठ असते जगण्याची...!
ज्यांच्या मधे तुमच्या बद्दल आपुलकी असते जिव्हाळा असतो ते ऋणानुबंध दृढ होतात दोघांतही समान आपुलकीचा धागा असेल तर ...कधी कधी ऋणानुबंध विधिलिखीत असतात परमेश्वरी संकेत तर कधी कधी ते असूनही जपताना अडचणी येतात ....हे ही ऋणानुबंधच ..!!
आयुष्यातील दुःखद प्रसंग अपमान एखाद्या नात्यात आपलं असणंच कुणाला आवडत नसेल यामुळे एकमेकांची आसक्ती कमी होते तर कधी कमीच राहवी म्हणून देखील प्रयत्न होत राहतात अशावेळेस हे ऋणानुबंध सांभाळणे तारेवरची कसरत होवून जाते मग यातून निर्माण होतात नवीन ऋणानुबंध....!!
लहानपणी एकमेकांना सांभाळून घेणारे एकमेकांना हवूहळू आपल्या आनंदातून वजा करायला लागतात एकमेकाचे नाते उत्कटता प्रेम कुठे जाते?? तेव्हा हेच ऋणानुबंध गूढ अनाकलनीय वाटायला लागतात. मग आपले आपल्याशीच असलेले एक नाते स्वतःशी स्वतःचे असलेले नाते ....हा खरा ऋणानुबंध...कारण कालांतराने इतर नाती आपल्या पासून दूर गेली तरी आपले आपल्याशी नाते कायम आपल्या जवळ राहणारे...स्वतःच स्वतःवर प्रेम करणे एक खरा ऋणानुबंध .मग हे ही एक नातेच ..!!
कारण नात्यात उत्कट प्रेम असणं गरजेचे ही उत्कटता निघून गेली तर लादलेली नाती ऋणानुबंध ठरतील का??
नात्यात प्रेमाबरोबरच वैराग्य असणेही गरजेचे ऋणानुबंध टिकवताना कुठे ताकद आणि मर्यादेचा वापर करायचा तर कुठे फक्त करुणा दाखवायची हे समजायला हवे.चुकीच्या गोष्टींना समर्थन देवून आपण आपल्या ऋणातून मुक्त होत नाही याचा समतोल सधता आला तरच या ऋणानुबंधाच्या गाठी निरगाठी होतील.....
आयुष्यात याहीपेक्षा काही श्रेष्ठ आहे पण आपली दृष्टी त्याकडे कधी वळतच नाही वास्तव वेगळेच असते साचेबंद आयुष्य जगताना चालते तेच योग्य आसे वाटून वास्तवाकडे पाठ फिरवली जाते ..ऋणानुबंध सत्याकडे जायला शिकवतात पण मानवी मन ..पुन्हा ऋणानुबंधाचे ऋण..
मी ह्याच्यासाठी हे केले तर त्यानेही माझ्या साठी हे कलेच पाहिजे अशा स्वार्थी सहानुभूतीही ऋणानुबंधांना नकळत बळकटी आणत आमचे फार जमते अशी भावना अहंकार उत्पन्न करत जाते अन् ऋणानुबंध ही..!!
बघा ना..आपली मुले आपल्यासमोर मोठी होतात तरी आपण विचार करतो..आपण अजून आहे तसेच आहोत मन मानतच नाही ....आपण जन्माला आलो तर मरण अटळ हे सत्य ह्या सत्याकडे डोळसपणे बघितले तर आपलाच दृष्टीकोन आपल्याला ऋणानुबंधातील गुज आहे हे स्वीकारायला शिकवते.
हे ऋणानुबंध गुंतागुंतीचे न वाटता सहज वाटतात .मग पुन्हा तेच संवाद हवा एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोलण्याने ऋणानूबंधातील गोडवा जाणवेल.
ऋणानुबंध म्हणजे क्रियाप्रतिक्रिया च समोरील व्यक्ती च्या प्रतिसादानेच ऋणानुबंध दृढ होतील मात्र कधी कधी मर्यादा पाळणे ही योग्यच
लोकांनी घालून दिलेल्या लक्ष्मणरेषाच आपल्या मर्यादा असतात. .जगण्याचा डोलारा उभा राहतो या ऋणानुबंधामुळे यात दोन्ही बाजूंचा विचार समतोलता आणते सकारात्मकता छापा तर नकारात्मकता काटा ऋणानुबंध नाण्याच्या दोन बाजू पारखण्याची कसोटीच..
आजकालच्या digital युगात माणूस एकमेकांपासून दूर गेला हे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे ठरेल.या whatsup facebook च्या जमान्यात तो खरतर जास्त जवळ आला पण पुनूहा तेच मानवी भावनांची मर्यादा तो ओळखू शकेल?? एखादी post आपल्याला आवडली तर आपण लगेच व्यक्त होतो quick responseदेतो like तर कधी अनाहूतपणे तर कधी मुद्दाम उगीच कशाला म्हणून टाळतो ..कधी कधी आपला comfortzone आपले मन एखाद्या चा चांगुलपणा उघडपणे मान्यच करत नाही मग इथेही ऋणानुबंधच मनस्वी दाद देण्याची वृत्ती तर कधी dislike ही करत नाही ही मर्यादा accept reject ह्या मानवी भावनाच फक्त स्वरुप बदलले हे ऋणानुबंधच ..आवडीने व्यव्हार शिरस्ता म्हणून ही जपलेले ..पण digitalरुपातही मानवी मनाच्या संकल्पना अबादितच ....हे ऋणानूबंधच.....!!!
नातेसंबधाचे ही marketing प्रबोधन करणे या marketingच्या युगात गरजेचे वाटते का ???
तर असे हे ऋणानुबंध परमेश्वरी शक्तीच्या रुपात अस्तित्वात आलेले कधी कधी वाटते लहानपणी से रात्रभर पाऊस पडूनजातो पण सकाळी शाळेत जाताना मात्र तो थांबलेला असतो तसच काहीस मानवी मन अन् हे नातेसंबध ऐन बहरात आनंदाच्या क्षणी साथीला असणारे मात्र परिस्थिती नुसार व्यक्ती व्यक्ती नुसार गरजेनुसार बदलत जाणारे ....निरगाठ बनून भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणे महत्वाचे हे पटवून देणारे ...पण हळूहळू ही संकल्पना च लोप पावत चाललीये का अर्थात ज्याचा त्यचा अनुभव पण नात्यातली मग ते कुठलेही आसो निरपेक्षताच संपत चाललीये का ?
मग वाटते कोणत्याही क्षणी आपले मनच आपल्यापाशी त्याचाच ऋणानुबंध खरा स्वतःचेच स्वतःशी असलेले ऋणानुबंध सदैव टिकणारे मनाची दृढता राखता येणं हे परिस्थिती सापेक्षबदलांनाही सक्षम करते ऋणानुबंधाची गोडी टिकवून ठेवते.शेवटी सगळे आपल्यातच...मनाची बैठक उत्तमता देते स्वतःच्या मनाचा स्वतः शीच असलेला ऋणानुबंध ...!!
शब्दांचा मनाशी तर मनाचा शब्दांशी असलेला हा ऋणानुबंधच... !!
व्यक्ती सापेक्षता आहेच हा ही एक ऋणानुबंधच ...सहजच सुचलेलं ऋणानुबंधामुळेच ...तुमच्या माझ्या मनातलं...!!!
© मधुरा धायगुडे