"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। "
ज्या कुलात स्त्री चा सन्मान केला जातो त्या कुलावर देवता प्रसन्न होतात असे म्हणतात. मग आपली सुरुवातच जिच्यामुळे होते ती आपली आई एक स्त्रीच आदिमायेचाच स्वरुप चरांचरांत तिचं आस्तित्व दिसून येत शक्ती संस्कार संस्कृती रुपात आपल्या मनात आईचं स्थान असचं अतुलनीय परमेश्वरी व्यक्तीमत्व, आई.एक पहिली स्त्री आपल्या आयुष्याला पूर्णत्व देणारी तिचा सन्मान प्रथम ..
आई जिचं असणं फारसं लक्षात घेतलं जात नाही पण नसणं निरसता आणेल एकच चंद्र जसा अंधकार दूर करायला समर्थ ठरतो तशीच आई आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ कधीच सोडत नाही घडणे घडवणे या जीवनातील प्रक्रिया आईमुळेच शक्य होतात.
आई संस्काराची जननी भारतीय संस्कृती त मातेला फार मोलाचे स्थान आहे.मातृदेवो भवः म्हणून आद्यपूजनाचा मान दिला जातो.जन्माच्या वेळी नऊ महिने यातना वेदना सहन करणारी हाताचा पाळणा करुन वाढवणारी पुढे त्याच हाताने वेळेला शासन करायला ही कमी करत नाही आपल्या ला वाढवतं जाते. तितकसं सोपं नसतं ते ...स्वतः हालअपेष्टा सहन करुन मुलांवर प्रेमाची फुंकर घालणारी जग्नमाता प्रेमाचा झरा ..आई..
भारतीय संस्कृती अशाच मातांनी विभूषित आहे.ज्यांच्या नावाने आपल्या देशाला भारत हे नाव पडले त्याला जन्मदेणारी शकुंतला भगवान श्रीरामांना जन्म देणारी कौसल्या लवकुश यांची जननी सीता ,शिवबांना घढवणारी जिजामाता ज्यांनी जीवनाकडे पाहण्याची शुभदृष्टी आपल्या बालकांनी दिली अन् ते महापुरुष घडले.ती आई..
आपल्या जीवनाची सुरुवातच मुळी आईमुळे होते जिच्या संस्कारामुळे आपल्या कोवळ्या रोपट्याचे रुपांतर वटवृक्षात होते.असंख्य चुका पदरात घेवुन आपल्या मायेच्या पदराआड लपवत जगलेला प्रत्येक क्षण आठवला कि कळतं अरे आईशिवाय तो क्षण अपुराच....अशी आई..
चुकलेल्या प्रत्येक कृतीला शासन करताना हात थरथरणारे दोष मात्र स्वतःकडेच घेणारी फक्त आईच असते.समईतली वात जशी स्वतः जळते इतरांना प्रकाश देते तशीच उभं आयुष्य एका मायेच्या धाग्यापरीने जळणारी आई..
निसर्गातल्या प्रत्येक हालचालीचे निरीक्षण केले तर प्रत्येक निर्मितीला आईची उपमा देता येते.उन्हामधे ती सावली होते तर थंडीत ऊब तिच्या रागवण्यातदेखील एक गोडवा ..इंद्रधनुष्यातले सात रंग बघितले कि जो आनंद होतो ती जाणीव म्हमजे आई..डोक्यावरचं आभाळ पायाखालची जमीन आईच..श्वास आसवं आनंद आईमुळेच...हस-या चेह-याने जगणारी दुःखाची जाणीवही होवू न देणारी आईच...
दुसऱ्या ला भरभरुन देता यावे मात्र दुसऱ्याच्या दुःखाचे कारण मात्र कधीही बनू नये हे शिकवणारी आई...अशा नकृळत खूप गोष्टी शिकवून जाते ती आई...दुसऱ्या चं दुःख समजून घेवून वागता यायला हवं न बोलता ही खूप काही शिकवुन जाणारी आई...यशामुळे भारावूनही पाय जमीनवरच हवे हे शिकवणारी तर नैराश्यावारही मात करायला लावणारी आई ..एक परिपूर्ण जाणीव.. आई हा शब्द मानवी भावनांशी निगडीत आहे.कुणा आईला दुखावाण्याआधी आपणही एक आई याची जाणीव दुसऱ्या एका आईनेही लक्षात आणली तर आयुष्य नंदनवन होईल ही जाणीव आईच...
आई या विषयावर अनेक काव्य तिच्या मायेचे प्रेमाचे गोडवे गावुन तिची प्रत्येकाच्या मनातील प्रतिमा उलगडत जाते.
आई एक दीर्घ स्वर म्हणून तिच अस्तित्व ही चिरंतन ढळणारं तिचं असणं आपण कधीच लक्षात घेत नाही मात्र तिच नसणं पोरकं करुन टाकेल.
आई घरपण देणारा श्वास तर आई मर्यादा दर्शवणारा उंबरठा तर कधी धगधगणारा निखारा हाळूवार फुंकर घालून सत्य उलगडवणारा निखारा प्रतिकूल परिस्थितीत सतत हात देणारा एक आधार ...आई...
आठवणी बोचणा-या सलणा-या आनंद देणाऱ्या तिच्या बरोबरच्या प्रत्येक आठवणी सकारात्मकतेकडे नेणा-या जाणीवा ...आई एकृ जाणीव..परमेश्वराच अस्तित्व या पृथ्वीवर आहे ते या आईच्या स्वरुपातच..
प्रत्येक निसरड्या वाटेवर सतत हात देणारी यशामधे आपल्या पुढे अपयशात आपल्या सदैव बरोबर संकटात आपल्या मागे उभे राहणारी ती आईच...तुमची माझी सर्वाची आई ही जाणीव यात व्यक्तीसापेक्षता नाहीच ..प्रेम माया आदर म्हणजे आई "सर्वमाता वंदनीय"या उक्तीनुसार समस्त स्त्रीशक्तीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आई या व्यक्तीरेखेविषयी कृतज्ञता ...!!
जागतिक महिलादिन साजरा करताना प्रथम मान आईचा..सहजच सुचलेलं मांडण्याचा प्रयत्न
©मधुरा धायगुडे