आज देवासाठी आणलेल्या फुलामधे छानसा सुंगध येत होता म्हणून एकेक फूल नीट पहात होते सुगंधाची चाहूल देणारी तीन-चार जाई ची फुले हातात आली सुगंधाने सारं घर दरवळून गेलं अन् मन मागे .,जाई जुई चंपा चमेली अशा फुलांच्या जोड्या साधर्म्य दाखवणा-या आपण नावे घेताना जाई -जुई अशीच कि दोन्ही सारखीच असा कायमच पडलेला प्रश्न?? जाई ची फुलं बघितली असे अलीकडे तर आठवतच नाही अनेक वर्षे मन मागे गेलं अन् लांबसडक केसांची ती वेणी आठवली आजही छान शोभून दिसली असती ही जाईची फुले गुंफुंन माळली असती ...असा विचार करत होते देवाला ही फुलं वाहू कि अशीच ठेवू असा स्वार्थी विचारही येवून गेला पांढऱ्या शुभ्र पाकळ्या गुलाबीसर देठावर पहुडल्या होत्या मोजून पाचच पाकळ्या नाजूक कोमल अशा हिरव्या पानाच्या कुशीतून हातात विसावलेल्या दिसत होत्या सुंगध लपून राहत नव्हता भरभरुन सुगंध वाटून ती फुले रित होण्यातला आनंद टिपत होती ...जाई जुई चमेली एकच ..काही ठिकाणी तिला चमेली म्हणत गुलाबी देठातून पांढरी खुललेली कळी पंचमहाभूतांना आमंत्रण देत पूजेतील आर्जवता सुंगधाने दाखवत होती मन आत्मा याची पूर्णाहुती पुजेला त्या जाईच्या वासाने मिळून गेली . .भरपूर मिळाली असती तर छानसा गजरा माळला असता लांबलचक केसाचाही भूतकाळ आठवत ....अन् विविध छटांच्या फुलात आपले आपले स्थान टिकवत आपला आपला मान घेत ती फुल आपल्या आराध्यावर अधिष्ठीत झाली...आपला गंध दरवळत ठेवत...मनाची कळी खुलवून गेली ..!!
असे हे जाईचे फूल....
पानापेक्षा ही लांब झुपकेदार एखाद्या फुलो-यासारखे गुलाबीसर देठापेक्षाही १इंच लांब विरक्ती चे दर्शन च..बाराही महिन्यात गौरी च्या पूजेत मान असणारे जुलै ते सप्टेंबर दरम्यान मोहरत सुंगधाची लयलूट करते .
गुलाबापाठोपाठ सुंगधी द्रव्ये तेल तयार करण्यासाठी उपयुक्त जाईचे फूल गजरे हार तुरे पूजा या मधे वापरली जाणारी फुले मागणी तिथे लागवड या उक्तीनुसार शहरी भागात घरगुती बाल्कनी त अंगणात मांडव घालून आसमंत सजवून टाकतात. सर्व रंगात मिसळला जाणारा पांढरा रंग उगवत्या पूर्वे दिशेला घराच्या अंगणात बाल्कनीत पाच पाकळ्याचा जाईचा (चमेली- गुजरातमधे असा उल्लेख )जास्त खुलून दिसतो.तर रानात सहजच उगवलेली ती रानजाई सात पाकळ्यांची असते .सुंगध दरवळत आपल्या असण्याची ग्वाही देणारी ...
तर ...
जाई हे हस्त नक्षत्राचे आराध्यफूल तर पांढरा रंग शुक्र ग्रहांचा मान असणारे शुक्र सौंदर्य कला यांचा कारक तर कर्क राशीला सुगंधित ठेवणारे हे जाई हे फूल मनाला आपल्या सुगंधाने तरतरीत ठेवते सकारात्मकता आणते. म्हणून सुंगधी अत्तर उत्पादनात याचा समावेश होतो....
औषधी गुणधर्म तर आहेतच मन प्रफुल्लित करणारे हे फूल मनावर शरीरावरही उपयुक्त च नायटा सारखे रोगात याचे तेल आराम देते..डोकेदुखी सारख्या आजारात ही या चा उपयोग ..तर काजळ जाई काजळाची ती तीट ही आठवली कि....याचा उपयोग काजळ निर्मीतीत ही...
तर..
असेही म्हणतात की हे फूल भगवान शिव आणि भगवान विष्णूशी संबंधित आहे. जाई जिथे जिथे अन्नपूर्णा तिथे तिथे .असे म्हणतात .अन्नाचा अभाव अशा ठिकाणी कधी पडत नाही असा ही संदर्भ ....शेवटी पांढरा रंग पवित्रतेचा आत्मा मन शांत करणारा सुखाचा कारक,...
या तीन-चार फुलांनी जाईविषयीची माझ्या मनातील उत्सुकता जागवली ..सहजच या जाईने ही शब्दांच्या या तोडक्या मोडक्या रेखाना आज आधार दिला मन तरतरीत झाले .
असा हा जाईचा वेल अथवा रोपटे या दोन्ही रुपात घराचा इवलासा कोपरा सजवला तर मनाची मरगळ सुंगधाने दुर होईल पांढरा रंग शीतलतेबरोबर शांतता ही देईल सकारात्मकता वाढवेल....
आत्मिक आनंद देवून गेला हा सु.... गंध जाईचा ...!!!
©मधुरा धायगुडे