भोगिले जे दुःख मी त्यास सुख म्हणावे लागले
एवढे मी सोसिले कि मज हसावे लागले"

 या ओळी सहजच कानावर पडल्या अन् विचार आला अरे  दुःख- दुःख म्हणजे काय?सुखाचा विचार सुखाच्या संकल्पना याचा विचार आपण नेहमी करतोच कि जरा दुःख असते तरी काय असा विचार करुन बघूया ...सुखासारखीच मनाची अव्यक्त भावना फक्त व्यक्तीनुसार बदलणारी सुखाची विरुद्ध प्रतिक्रिया तर नसेल...आपण दुःखी कधी होतो तर जेव्हा आपल्या मनासारखे घडत नाही. दुःख ही मनाचीच विरोधात्मक स्थिती . सुख दुःख कल्पनाच मुळी काल्पनिक आपल्या सोयीनुसार बदलणाऱ्या च....

बालपणी संरक्षणात्मक वातावरण मिळते काळजी घेतली जातेयामुळे दुःख या संकल्पनेची जाणीव होत नाही पण आईने एखाद्या न पुरवलेल्या हट्टासाठी दुःखच झालेले असते खरे तर ....तरुणपणी या गोष्टी जास्त आक्रमक बोथट होवू लागतात मग मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टीचे विध्वंसक रुप बघायला मिळते हीपण मनाची नकारात्मक भूमिका ती म्हणजे दुःख हे कधी जाणवते तर दुसऱ्याचे सुख बघितल्यानंतर आपल्यातील न्यूनता दाखवणारी आपलीच आपल्यासाठीची मनाची अवस्था दुःख आणि यावर मात आपणच करु शकतो हे उत्तर ....

सुदैव आणि दुर्दैव या संकल्पना याला साधर्म्य दर्शवतात आपल्यातच वास करत असतात. दैव उत्तम तर बुद्धी चांगली राहते वाईट कृती आपल्या हातून होत नाही  योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता येते परिणामी प्रसंगानुसार येणाऱ्या दुःखाची तीव्रता कमी होते. सुख दुःख या आपल्या च मनाच्या अवस्था त्यामुळे दुःखाचे रुपांतर सुखात करणे आपल्याच हातात.....

आपली अंतरिक शक्ती वाढवणे हाच रामबाण उपाय कारण मानवी शक्ती मर्यादित आहे यासाठी ईश्वरी उपासना दुःख लोप होण्यासाठी उपयोगी ठरु शकतो पण मानवी मन चंचल असते " काय करायचे काही करुन?" किंवा आम्ही देव मानत नाही असा विचारही एखाद्या करु शकतो. " आम्ही आहोत त्यात सुखी आहोत" असे अल्पसंतुष्ट विचार करणे म्हणजे देखील दुःखच  म्हणावे लागेल अशा  विचाराने प्रगतीची दारे आपली आपणच बंद करतो अन् दुःखी होतो.

नकारात्मक दृष्टिकोन  न ठेवता दोन्हीही बाजूंचा विचार करुन पुढे जाणे म्हणजे दुःख कमी करणे पण मग तुम्ही म्हणाल बोलणे सोपे आहे हो....पण करणे अवघड पण खरा विचार असा घेता येईल दोन्हीही कृती आपल्याच हातात असतात मिळणारे परिणाम आपल्याच हातात येतात.

अपयश नकारात्मकता मनाला कमकुवत करते अन् दुःख होते.., पण मनासारखे घडले यश मिळालेकि मनाला उभारी येते ते सुख..... फक्त व्यक्तीनुसार बदलणाऱ्या या संकल्पना.

तर कधी कधी आपण सकारात्मक उत्साही असूनही इतरांमुळे अपयशाला सामोरे जावे लागते मन दुखावते पण त्यातही सकारात्मकता मनाला उभारी देते ती दुःखातही सुख मिळणारी अवस्था आपली आपणच मिळवलेली असते.

आपल्या दुःख या संकल्पनेचा व्यापक अर्थाने विचार केला तर असे काही नसतेच हे आपल्याच लक्षात येईल फक्त योग्य प्रयत्न व दिशा याची तीव्रता व्यक्तीनुसार कमी जास्त होते इतकेच हे आपल्या च हातात असते.

 फार कमी लीकांना तुमच्या दुःखात सहभागी होण्याची इच्छा असते मग दुःखाचे प्रदर्शन करण्यापेक्षा ते भोगूनच संपवले तर मिळणाऱ्या अनुभवातून आपण अजूनच समृद्ध होतो पुन्हा नव्याने.
 
आयुष्य एकदाच पुनर्जन्म आहे का ? असेल तर तो अपूर्ण इच्छा काही चुकीची कर्म झाली तर होत असावा  यावर नंतर बोलूयाच.....म्हणून सुख सांगावे जगी दुःख आपल्याचपाशी असे म्हणतात.यासाठी मन प्रसन्न असणे गरजेचेच.

चांगल्याला चांगले म्हणणे चांगलेच पण तेही आपण करत नाही दुसऱ्याचा चांगुलपणा खुपतो म्हणजे एकप्रकारे दुःखच...मनात निर्माण होते. सगळेच सगळ्यांना जमत नाही प्रत्येकाकडे उपजतच एक दैवी गुण असतोच त्याकडे मात्र आपले दुर्लक्ष होते..बघा ना कोकिळेकडे सुंदर स्वर तर मोराकडे सुंदर पिसारा. कावळा कोकिळेसारखा दिसतो म्हणून त्याने बरोबरी केली तर पदरी दुःखच येईल . आपल्या मर्यादा ओळखून वागणे  म्हणजे येणारे दुःख कमी करणे मनाची प्रसन्नता महत्वाचीच ...

दुःखाचा विचार करता करता आपण सुखाचाच शोध घेत नाही ना !! असे वाटले अन् दुःख दुःख करता करता मी सुखाकडेच येवून थांबले असे वाटले मग सुखी कोण???

आपण जन्मालाच आलो आहोत हे ही कोणाला कळू नये असे ज्याला वाटते, गरजेपेक्षा अधिक पैसा मिळवण्याची ज्याला हाव नाही त्याने पैशावर विजय मिळवला , परस्त्री मातेसमानमानतो त्याने विकारावर विजय मिळवला . माझे जीवन परमेश्वरी आशिर्वाद त्याच्या इच्छेनुसार ते व्यतीत होईल अशी श्रद्धा बाळगणारा सुखी...ज्याची संतती संस्कारक्षम नम्र तो सुखी...साधेपणातही सुख..सत्ता मोह सोडणारा सुखी .इतरांच्या भावनांचा आदर करणारा सांभाळून घेणारा स्वतः सुखीच...असं बरच काही...

सुख दुःख या संकल्पना एकमेकांचा हात घेवूनच पुढे जातात त्या केवळ आपल्या मनाच्या अवस्थाच. आपले मन आनंदी ठेवणे गरजेचे असते मी आनंदी आहे ही स्वयंसूचना दुःखाची तीव्रता कमी करते सुखाकडे घेवून जाते.
रात्री झोपताना पाच मिनिटे केलेली ईश्वराची मानसपूजा मन निर्भय आनंदी ठेवण्यास मदत करते माझ्या  मनाचा स्वामी माझ्या तील ईश्वर आहे त्याच्या आदेशानुसार सर्व चालणार योग्य काळ हेच दुःखावरचे औषध त्यासासाठी मनातील ईश्वराला प्रसन्न ठेवले तर सुखाची वाट दिसू लागते मनातील चिंता पळून जातात चैतन्य निर्माण होते . दुःखाकडून सुखाच्या वाटेकडे आपण कसे वळतो हे आपल्यालाच कळत नाही .
"दुःखाचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे" असे तुकाराम महाराज म्हणतात ना, म्हणजे दुःख मग ते कोणत्याही स्वरुपाचे कशामुळेही आले असु देत ते शेवटी सुखाकडेच घेवून जाते जे आपल्याच हाती असा सकारात्मक विचार सुखाचा दुःखाची नकारात्माकता घालवतो. सुखाचा मार्ग दुःखामुळेच हाच शोध सुखाचा..

अव्यक्ततेचा  आदर यात ही सुखच दडलेले असते ना...तर व्यक्ततेत प्रोत्साहन च हे ही आनंदच देते हे  सुखच त्याचाही  आदर...सुख- दुःख तुमचे माझे सगळ्यांचेच एकसारखेच .....!!!

© मधुरा धायगुडे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel