शुभांगी घरात आल्या आल्या म्हणाली आई खूप भूक लागली . खायला दे पटकन. हो हो आधी हात पाय तोंड धुवून ये. उपमा केला आहे मी. आलेच म्हणत शुभांगी फ्रेश व्हायला गेली. शुभांगी इयत्ता आठवीत शिकत होती. मराठी मीडियम च्या शाळेत ती जात होती. सकाळी दहा ते पाच शाळा मग आल्यावर भूक भूक करायची. तिचे आवरून होई पर्यंत आई ने उपमा डिश मध्ये काढून ठेवला वरून बारीक शेव टाकली. बाजूला लिंबाची फोड ठेवली. शुभांगी आली डायनिंग टेबल कडे आणि उपमा खात बोलू लागली आई अग आज शाळेत एक डॉक्टर बाई आल्या होत्या. हो का ? काय सांगितले त्यांनी मग. आई त्या मॅडम वयात येणे म्हणजे काय आणि मुलींना येणारी पाळी याची माहिती त्यांनी दिली. हो छानच माहिती दिली मग त्यांनी तसे ही तुमची फक्त मुलींची शाळा. प्रत्येक घरातून या विषयावर बोलले जातेच असे नाही ना. तुला नीट समजले ना शुभा आणि काही प्रश्न असतील तर मला विचार. हो ग आई पण मला कुठे अजून पाळी सुरू झालीय तेव्हा. हो आता तू आठवीत या वर्षी किंवा पुढच्या वर्षी येईल तुला पण पाळी. शुभा ने मग उपमा संपवला आणि अभ्यासाला गेली. शुभांगी शांत आणि हुशार होती. पहिल्या पाच मध्ये कायम तिचा क्रमांक असायचा. शाळेत आणि घरात आई बाबांची लाडकी होती. एकुलती एक होती ती. पण म्हणून कसला हट्ट नाही . खूप समंजस होती. आठवी चांगल्या मार्काने ती पास झाली दुसरा नंबर आला होता तिचा. नववी चे वर्ष सुरू होते पण अजूनही शुभांगी ला पाळी आली न्हवती. तिच्या आई ला आता चिंता वाटू लागली होती. एक दिवस ती शुभांगी च्या बाबां ना म्हणाली, अहो आपली शुभा चौदा वर्षाची झाली पण अजून तिला मासिक पाळी सुरू झाली नाही.आपण आपल्या फॅमिली डॉक्टरां कडे जाऊयात का? तुला वाटत ना तर जाऊ आणि भेटू डॉक्टरांना. मग दुसऱ्याच दिवशी शुभा चे आई बाबा डॉ. कडे आले त्यांना शुभा बद्दल सांगितले. तसे डॉक्टर म्हणाले कधी कधी मुलींना पाळी उशिरा ही येऊ शकते.आता तिला चौदाव वय चालू आहे तर सोळा वया पर्यँत पाळी येऊ शकते.काही ही काळजी करू नका. असे होता होता शुभांगी दहावी पास झाली पण अजून ही तिला पाळी आली न्हवती .आता तिच्या आई वडीलांना शुभा ची काळजी वाटू लागली. मग त्यांनी तिला एखादया gynecologist ला दाखवायचे ठरवले. तसे ते शुभांगी ला घेवून एका स्त्रीरोग डॉकटर कड़े आले. डॉकटरानी तिला चेक केले आणि तिची सोनोग्राफी केली. तेव्हा असे लक्षात आले की शुभांगी ला जन्मताच गर्भाशय नाही. आई वडील काळजीत पडले म्हणाले असे कसे काय होऊ शकते डॉक्टर? हो अशा खुप कमी केसेस असतात की जन्मताच एखाद्या मुलीला गर्भाशय नसते. पण याने काही ही फरक नाही पड़त तितकासा पण शुभांगी आई नाही बनु शकणार. म्हणजे ती सव्हता मूल जन्माला नाही घालु शकणार. बाकी काही त्रास वाटला तर या माझ्या कड़े. मग शुभांगी आणि आई बाबा घरी आले. शुभांगी ला इतके समजले होते की भविष्यात ती आई नाही होऊ शकणार. पण तिच्याशी कोण लग्नाला तयार होईल ही चिंता आई ला लागून राहिली. शुभांगी आता एम बी ए करत होती. तिचाच वर्ग मित्र रोहित तिच्या वर मना पासून प्रेम करत होता.तसे दोघे चांगले मित्र होते पन शुभांगी च्या मनात काय असेल याची रोहित ला कल्पना नहवती. पण योग्य वेळ बघुन तिला आपल्या भावना सांगायच्या असे रोहित ने ठरवले.शुभांगी दिसायला छानच होती लांब सड़क केस,उभा चेहरा नाजुक जीवनी,गहिरे मोठे काळे डोळे,नाजुक गुलाबी ओठ . कायम चेहरया वर शांत भाव कोणी ही सहज तिच्या प्रेमात पडेल अशी पण कमतरता एकच होती तिला गर्भाशय नहवते. तिला एम बी ए टॉप करून जॉब करायचा होता त्यामुळे प्रेम वगैरे गोष्टी साठी तिला वेळ नहवता. आणि जरी कोणाच्या प्रेमात पडली तरी जेव्हा त्याला समजेल की हिला गर्भाशय नाही तेव्हा तो खरच साथ देईल की सोडून जाईल? त्या पेक्षा आपला अभ्यास आणि करियर यावर तिने फोकस केले. पण रोहित दिवसेंदिवस शुभा च्या प्रेमात आकंठ बूड़त चालला होता. कॉलेज ची एम बी ए ची दोन वर्ष संपत आली होती. परिक्षेला दोन महीने बाकी होते. शुभा अभ्यासात मग्न होती. तिला चांगल्या मार्काने पास व्हायचे होते कारण कॉलेज मधून कैम्पस सिलेक्शन होऊन चांगला जॉब मिळवन्याची संधी होती. परीक्षा सुरु झाल्या होत्या. आज त्यांचा शेवटचा पेपर होता. पेपर झाल्यावर सगळ्या ग्रुप नी एकत्र भेटायचे ठरले होते. ज्याचा जसा पेपर होईल तो कैंटीन ला येऊन थांबेल असे ठरले. आज आपल्या भावना शुभा ला सांगायच्याच असा विचार रोहित ने केला होता. शुभा चा पेपर लवकर झाला तशी ती कैन्टीन ला आली. पाच च मिनिटा नी रोहित ही आला. आता कोणी नाहीत तो पर्यंत शुभा शी बोलावे असे ठरवून तो म्हणाला,काय शुभा कसा गेला पेपर. अरे छानच होता. हु तू आहेसच हुशार त्यात. तुला कसा गेला. लिहिला आहे मस्त बघू आता. शुभा मग जॉब करणार असशील ना? हो कॉलेज कैम्पस मधून झाले सिलेक्शन तर बरेच होईल. होईल तू टॉप स्टूडेंट् आहेस. शुभा एक बोलायचे होते. बोल ना रोहित काय. शुभा गेल्या वर्षा पासुनच जेव्हा आपली मैत्री झाली तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो आहे माझे खरच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. रोहित मी असा विचार कधी केला नाही इवन तुझाच नाही इतर कोणत्याच मुला बाबत नाही. मला करियर करायचे आहे. माझी खुप वेगळी स्वप्न आहेत रे. मला नाही अडकायचे इतक्यात कोणत्या बंधनात. शुभा मी तुला कोणत्याच गोष्टि ला अडवनार नाही. तुझे स्वप्न ते माझे स्वप्न असेल. नाही रे रोहित मी खोटे नाही वागु शकत. मला तुझ्या बद्दल तशा फिलिंग नाहीच आहेत मग खोटा का मी होकर देवू. शुभा मग आता तसा विचार करून बघ मी कायम साथ देइँन तुला प्लीज. शुभा ला माहित होते की तिची कमतरता काय आहे मग कशाला उगाच कोणाला दुखवायचे म्हणून तीने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तिला सव्हताचा एन जी वो सुरु करून गरीब अनाथ मुलांचा सांभाळ करायचा होता. रोहित मला समजून घे सध्या तरी मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार नाही करू शकत. मग इतर ही त्यांचे मित्र मैत्रीणि कैन्टीन ला आले. सगळ्यांनी मस्त गप्पा मारत नाष्टा केला . अधुन मधून नक्की भेटायचे असे ठरवून जो तो घरी जायला निघाला.रोहित शुभा ला आपल्या डोळ्यात साठवून घेत होता. खुप उदास झाला होता तो. शुभा काळजी घे आणि तुझी सगळी स्वप्न पुर्ण होवोत . ऑल द बेस्ट म्हणत त्याने तिला शेकहैंड केला. तिचा निरोप घेताना त्याचे डोळे भरून आले होते. तो गेला त्याची बाईक घ्यायला आणि शुभा ने त्याला पाहत आपल्या डोळयातील पाणी पुसले .तिचा नाइलाज होता. ती घरी आली. थोड्याच दिवसांनी तिचा निकाल लागला उत्तम मार्कानी ती पास झाली होती तिला कॉलेज कैम्प्स मधून जॉब ही मिळाला. नवीन आयुष्याला आता सुरवात झाली होती. आई बाबा ना तिच्या लग्नाची काळजी होती.ती म्हणाली होती की माझी ही कमतरता समजलया वर किती मूल माझ्याशी लग्नाला तयार होतील आणि मला कोणाला ही फसवून लग्न नाही करायचे त्या पेक्षा मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण शुभा असा कोणीतरी असेलच ना ग जो तुला आहे तशी स्विकारेल आणि मूल तर दत्तक सुद्धा घेता येत त्यासाठी लग्न न करण्याचा तुझा निर्णय कितपत योग्य आहे आई म्हणाली . बघू आई तसा कोणी असेल तर मी विचार करेन शुभा म्हणाली. आज एक मुलगा शुभा ला पाहायला येणार होता. शुभा च्या आई च्या लांबच्या नात्यातला होता. आई पण त्याला सगळ सगळ खर सांगायचे काही ही लपवायचे नाही. हो शुभा तू ये ऑफिस वरुन लवकर . संध्याकाळी शुभा लवकर आली आणि फ्रेश होऊन तयारी करू लागली. शेवटी तिला ही मन भावना होत्याच ना. आपल कोणीतरी असावे प्रेमाचे हक्काचे,आपल्यावर भरभरून प्रेम करणारे असे सगळ्यांनाच वाटत असते कारण ते नैसर्गिकच आहे. प्रत्येकाला आपल्या सुख दुखात सहभागी होणारा जोड़ीदार हवा असतो. शुभा ने छान अबोली कलर ची साड़ी नेसली मैचिंग बांगडया घातल्या. एका हातात वॉच घातले. केस पिन अप करून मोकळे सोडले. हलकी लिपस्टिक लावली. आरशात पाहत तिला अचानक रोहित ची आठवण झाली. रोहित ही दिसायल स्मार्टच होता कोणी ही त्याच प्रपोजल एक्सेप्ट केल असत. थोड़ी ती नाराज झाली. आई ने आवाज दिला तशी ती बाहेर आली. थोड्याच वेळात तो मुलगा त्याचे आई बाबा लहान बहिन आले. आई नी सगळ्यांना पानी दिले. मग शुभा ला नाष्टा घेऊन बोलवले. शुभा सूंदर दिसत होती. एका चेयर वर ती बसली. मुलाने तिला काही प्रश्न विचारले. त्याच्या आई ने ही विचारले. शुभा अभ्यासात आणि घरकामात ही हुशार होती . तिला नाव ठेवायला ज़ागाच नहवती. त्यांना शुभा आवडली . पन शुभा म्हणाली एक मिनिट मला तुम्हाला काही सांगायचे आहे त्या नन्तर तुम्ही ठरवा तुमचा नकार की होकार? मुलगा त्याचे आई बाबा विचारात पडले ही काय आता बोलणार? शुभा म्हणाली मी सगळ्याच बाबतीत हुशार आहे चांगली नोकरी मला आहे पण मला जन्मजात च गर्भाशय नाही. त्यामुळे मी कधी ही आई बनु शकत नाही. हे ऐकून मुला कडचे चाट झाले. मुलाची आई म्हणाली,म्हणजे तुला पाळी आलीच नाही. नाही मला पाळी आलीच नाही मी मुलाला जन्म नाही देवू शकत. ही एकच कमी आहे माझ्यात बाकी तुम्हाला हे मान्य असेल तर माझी या लग्नाला काही हरकत नाही. तसा तो मुलगा बोलला,मला मान्य आहे मी तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. शैलेश वेडा आहेस का अरे तुझ सव्हताच मूल तुला होणार नाही त्या मुलाची आई म्हणाली. आई अग ज्यांना लग्ना नन्तर मूल होण्यात अडचणी येतात तेव्हा मूल दत्तक घेतातच ना. मग इथे शुभांगी ने आपल्या पासून काही ही लपवले नाही. शैलेश आपल्या खानदानाच एक तरी मूल नको का? काही ही काय विचार करतोस. अरे नुसत मूलीकड़े सौंदर्य असून नाही चालत मूल जन्माला घालन्याची क्षमता पण हवी. आता हे ऐकून शुभा चिडली म्हणाली,हे बघा माझ्याच घरात बसून तुम्ही माझा अपमान नाही करू शकत. आणि माझ्याकड़े क्षमता नाही मूल जन्माला घालायची मग मी ही तुमच्या मुलाला विचारु शकते की त्याचा स्पर्म कॉउंट किती? बाई बाई या मुलीला काही लाज शरम आहे का शैलेश उठ चल आता असे म्हणत शैलेश त्याचे आई बाबा सगळे निघुन गेले. तशी शुभा म्हणाली बघ आई यासाठीच मी नको म्हणते लग्न. अग पण तू असे उलट उतर नको करायला होते. शुभा च्या आई तिचे काही ही चुकले नाही. जस या समाजात मुलींना प्रश्न विचारतात तसे मुलींना ही मुलाला कोणते ही प्रश्न विचारायची मुभा आहे. आपल्या मुलीत काही ही कमी नाही आपण च का कमी समजायची जे देवाने दिले नाही त्याचा इतका विचार का करायचा आणि जो शुभा ला तिच्या या कमतरते सोबत स्विकारेल त्यालाच मी माझी मुलगी देईन. शुभा ला बाबाचे बोलने आवडले तिने बाबा ना मीठी मारली. काळजी नको करू बेटा देवाने प्रत्येका साठी जोडीदार ठरवलेला असतो फ़क्त ती योग्य वेळ यावी लागते. मग शुभा ही तिच्या नोकरीत व्यस्त झाली. अशीच दोन वर्ष गेली. एक दिवस शुभा च्या बाबांचे एक जुने मित्र शरद त्यांना भेटले . गप्पा मारता मारता मुलांचा विषय निघाला. तेव्हा शुभा च्या बाबानी शुभा बद्दल त्यांना सांगितले तसे ते मित्र शरद म्हणाले अरे काही ही काळजी करू नकोस. मी तुझ्या शुभाला सुन करून घ्यायला तयार आहे. अरे पन तुझा मुलगा ,आणि वाहिनी ना हे मान्य होईल का? अरे वसंता (शुभा च्यां बाबा चे नाव ) माझा मुलगा इतक्या संकुचित विचारांचा नाही आणि त्याची आई तर समाज सेविका आहे ती ही विचाराने प्रगल्भ आहे सो डोन्ट वरि. मी येत्या रविवारी येतो तुझ्या घरी. मग अगदी आनंदाने वसन्तराव घरी आले. शुभा नुकतीच ऑफिस वरुन आली होती .चहा घेताना बाबा नी शुभा ला आणि आई ला मित्रा सोबत चे बोलने सांगितले. शुभा म्हणाली बाबा उगाच मागच्या सारख काही नको व्हायला तुम्ही नीट बोललात का? हो ग बाळा मी स्पष्ट सगळ सांगितले आहे रविवारी ते येतील. रविवारी ठरल्या प्रमाणे शरद राव त्यांच्या पत्नी ला आणि दोन मुलांना घेवून वसंत रावा कड़े आले. शुभा आत होती. आल्या आल्या वसंत आणि शरद रावांनी आप आपल्या कुटुंबा ची ओळख करून दिली. शरद रावांना दोन मुलगेच होते मोठा रोहित आणि धाकटा सुमित. पाणी वगैरे घेवून झाले तसे रोहित च्या आई म्हणालया मुलीला बाहेर बोलवा. मग शुभा च्या बाबांनी तिला नाष्टा घेवून यायला सांगितले. शुभा बाहेर दीवाणखान्यात आली. आणि तिला पाहताच रोहित बोलला,शुभा तू? मग तिने ही रोहित कड़े पाहिले. अरे रोहित तू कसा काय इकडे? अग तुलाच पाहायला आलो ना मी. शरद राव म्हणाले अरे वा तुम्ही दोघ एकमेकांना ओळखता मग अजुन काम सोपे झाले. हो बाबा मी आणि शुभा एकाच कॉलेज ला एकाच वर्गात होतो.शुभा माझी चांगली मैत्रीण आहे. मग शुभा ला काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही.आता फ़क्त तुम्हा दोघांचे मत काय ते सांगा. रोहित ची आई म्हणाली. शुभा रोहित तुम्ही दोघ आत जावून बोलू शकता. शुभा चे बाबा बोलले. तसे ते दोघे शुभा च्या रूम मध्ये गेले. बेडवर बसले. शुभा म्हणाली रोहित तुला माझ्या बद्दल सगळ माहित आहे का? तसा रोहित ने तिचा हात हातात घेतला म्हणाला, या कारणा साठी मला तू नकार दिला होतास ना? अग एकदा सांगून तरी बघायचे होते शुभा तेव्हा ही मी तुझा स्वीकार केला असता कारण माझ तुझ्या वर खर प्रेम आहे. पण बघ आता नशीबा ने आपली पुन्हा एकदा भेट घडवून आणली. हो रोहित इट्स डेस्टिनी. मग आता तरी तुला माझ प्रेम मंजूर आहे का? तू मला आज ही तितकीच आवडतेस .आई बाबांचा शब्द नाही मोडायचा म्हणून तुला पाहायला आलो आणि तूच पुन्हा भेटलीस. जरी माझे दूसर्या मुली सोबत लग्न झाले असते तरी माझ पहिले प्रेम तूच असतीस कायम. रोहित इतके प्रेम करतोस माझ्यावर. हो मग सांग देशील ना साथ? नको चंद्र तारे फुलांचे पसारे
जिथे मी रुसावे तिथे तू असावे
तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे
नजरेत तुझिया स्वतःला पहावे
जिथे सावली दूर जाते जराशी
तिथे हात तू हाती घेशील ना
मला साथ देशील ना
माझा होशील ना
माझा होशील ना ....अशीच काही शी भावनां शुभा च्यां मनात होती. अरे बोल ना शुभा बाहेर आपले आई बाबा आपल्या उत्तराची वाट पाहत आहेत. हो रोहित मी तयार आहे तुला साथ द्यायला पण तुला माहित आहे ना की मी कधी ही आई नाही होऊ शकणार. शुभा असे नको बोलूस आणि आई का नाही होणार तू आपण एखादया अनाथ मुलाला दत्तक घेवू शकतो ना ? आणि समजा लग्ना नन्तर माझ्यात काही दोष असता आणि आपल्याला मूल झाले नसते तर. मग तू केवळ मुलगी आहेस म्हणून तुला वेगळा न्याय का? मी असा संकुचित विचार करणारा मुलगा नाही आहे. सो तू काही ही काळजी करू नकोस. थैंक यू रोहित असे म्हणत शुभा त्याला बिलगली. वेडी आहेस शुभा . चल बाहेर जायचे ना? मग दोघे बाहेर आले त्यांचे हसरे चेहरे पाहुन च सगळ्यांना समजले की दोघ लग्नाला तयार आहेत. मग कधी उड़वायचा बार भाई,सुमित म्हणाला. गप ये सुमित. हा शुभा हा माझा छोटा भाऊ सुमित ही आई हे बाबा. रोहित ने ओळख करून दिली.शुभा त्याच्या आई बाबांच्या पाया पडली. लवकरच साखरपुडा उरकुन लग्न ही लवकरच करायचे असे ठरले. यथा अवकाश शुभा आणि रोहित लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांनी एका गोड मूलीला दत्तक घेतले. शुभा चे स्वप्न पुर्ण झाले रोहित आणि शुभा त्यांचा एन जी वो चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. शुभा जिला जन्मजात गर्भाशय नहवते ती आता अनेक अनाथ मुलांची आई बनली होती. मूल जन्माला घालण म्हणजेच आई पण नसते अनाथांचे नाथ होणे हे सुद्धा आईपनच नव्हे का?
समाप्त....
मुलगी बघायला गेल्यावर अगदी स्वाभाविकपणे पाळी येते का तुला? हा प्रश्न विचारला जातो. ते एका अर्थाने योग्यच आहे म्हणा. अन्यथा लग्नानंतर गोष्टी उघडकीस आल्या, तर सगळेच विचित्रच होऊन बसते, शिवाय फसवणुकही व्हायला नकोच कुणाची. मात्र,, मुलाला तुझा 'स्पर्म काउंट' किती? हे विचारले जात नाही. डायबेटीस, हृदयरोग, आंधळेपणा, मूकबधिरता आणि अस्थमा असलेल्या व्यक्तींना समाज सामावून घेतो, तितक्याच चटकन गर्भाशय नसलेल्या किंवा मासिक पाळी येऊ न शकणाऱ्या (एमेनोरिह्या) मुलींना स्वीकारले गेले पाहिजे. या पृथ्वीवर प्रत्येक जिवाच्या जन्मामागे काहीतरी दैवी प्रयोजन आहे, स्थान आहे, प्रत्येकाची समाजाला गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाने जगण्याचा हक्क आहे हे विसरून चालणार नाही.
© sangieta devkar 2017. print & media writer.