ख्रिस्त जन्माच्या साधारण १,७०० वर्षांपूर्वी हडप्पा संस्कृती नुकतीच लोप पावली होती. त्यावेळेस देखील मनुष्याचा पुर्णतः शारीरिक विकास झालेला नव्हता. मनुष्य प्राण्यांपैकी विशिष्ट टोळया आपापसांत सांकेतिक भाषांचा वापर करत असे. इतर मनुष्य अरण्यात मांस-फळ मिळेल ते खाऊन आपली उपजिवीका करत असे. हडप्पा नष्ट झालं त्याच वेळी हिमालय येथील एका तपस्वीला, म्हणजेच रुद्रस्वामी यांना भविष्यात येणाऱ्या संकटाची चाहूल लागते. त्या वेळेस हिमालय आणि त्याजवळचा परिसर इतर भागांच्या तुलनेत सुधारलेला होता. त्यांची विशिष्ट भाषा ते त्यांच्या मुलांना शिकवत असे. ते सर्व वसाहती करुन राहत असत. त्या संस्कृतीमध्ये आणि हडप्पा मोहोंजेदडो संस्कृतीमध्ये बरेच साम्य होते. शेती, व्यापार अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी बरीच प्रगती केली होती. तत्कालीन भुतलावरील विद्वान असलेले रुद्रस्वामी यांना दिव्य शक्तीची देणगी होती. मनुष्य जातीचा विकास आणि संरक्षण करण्यासाठी ते सदैव तत्पर असत.

तर भविष्यातील संकटाची चाहूल लागताच रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना विशिष्ट ठिकाणी बोलावतात आणि एका असाधारण युध्दासाठी सज्ज राहावयास सांगतात.

‘असे कोणते युध्द होणार आहे स्वामी, ज्याबाबत आपण इतके चिंतित आहात?’’ त्यांच्या विश्वासातील एकजन त्यांना विचारतो.

‘‘मनुष्याचा समुळ संहार करण्यासाठी युध्द होणार आहे. हे युध्द असाधारण असेल, या युध्दात जो कुणी विजयी होईल तो या भुतलावर सत्ता स्थापन करेल.’’ रुद्रस्वामी डोळ्यााची पापणी न हलवता बोलू लागतात.

‘‘आपला सामना कुणाशी होणार आहे? आणि कधी होणार आहे?’’ दुसरा अनुयायी प्रश्न उपस्थित करतो.

‘‘शत्रु कोण आहे आणि कसा आहे हे मला देखील माहित नाही. पण जो कुणी आहे तो दुबळा नक्कीच नाही. तसं असतं तर त्याने जग जिंकण्याच्या दिशेने पाऊल उचललंच नसतं. शत्रु पश्चिमेपर्यंत आलेला आहे. माझ्यात असलेल्या सुप्त उर्जा मला सांगत आहेत की, युध्द काही दिवसांवर आलेलं आहे. त्यांनी हडप्पा नावाचे एक संपुर्ण शहर उध्दवस्त केले आहे, जिथे आपल्यासारखी माणसं वसाहती करुन राहत होती.’’

‘‘म्हणजे आपल्यासारखे आणखी मनुष्य प्राणी या भुतलावर अस्तित्वात आहेत?’’

‘‘हो.’’

‘‘पण शत्रुने ते शहर उध्दवस्त का केलं?’’

‘‘तुझा वंश तेव्हाच वाढू शकतो जेव्हा तु तुझ्यावर येणाÚया संकटाचा नाश करु शकशील. आपल्या शत्रुने आपल्यातील गुणवत्ता आणि सामथ्र्य आधीच ओळखले होते. आपल्या अस्तित्वाने त्याला धोका आहे म्हणुन स्वतःचं कुळ आणि वंश वाचवण्याच्या हेतुने तो भुतलावरील मनुष्यप्राण्याचा नाश करीत आहे. त्याच्यातील सामथ्र्य इतकं आहे की त्याने संपुर्ण हडप्पा शहर उध्दवस्त करुन टाकलं आणि हे आपणच केलं आहे याचा काहीएक पुरावा त्याने ठेवलेला नाही.’’

‘‘हा नक्की कशा प्रकारचा मनुष्य आहे?’’

‘‘हा मनुष्य नाही’’ रुद्रस्वामी विद्रुप हास्य करत म्हणतात. ‘‘हा प्राणी मनुष्यापेक्षा खुपच वेगळा आहे. तो जर अस्तित्वात असेल तर भविष्यातील आपल्या वंशजांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याला या भुतलावरुन पुर्णपणे संपवायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याच्याशी युध्द करुन त्याला चारीमुंड्याा चीत करायचं आहे. नंतर आपल्यातील पराक्रमी युवकांनी हिमालय सोडून भुतलावरील प्रत्येक ठिकाणाहून त्याचं अस्तित्व संपवायचं आहे, भविष्यात कुणाला त्याचा केसदेखील सापडला नाही पाहिजे. त्यानंतर काही विद्वानांनी माझ्याबरोबर उगवत्या सुर्याच्या प्रदेशात (आत्ताचे जपान) एका विशिष्ट कामासाठी प्रस्थान करावयाचे आहे. आपल्यापैकी कोण कोण माझ्याबरोबर असणार आहे?’’

‘‘स्वामी, आमच्यापैकी प्रत्येकजन आपल्याबरोबर आहे. आम्हाला आपल्या बोलण्यावर पुर्णतः विश्वास आहे. आपण आज्ञा करावी.’’ एक पंडीत आवेशाने म्हणतात.

रुद्रस्वामी युध्दासाठी सैन्य तयार करतात. नगरातील सर्व पुरुष लढण्यासाठी तयार होतात. अरण्यातील विनाशकारी विष एकत्र करुन ते त्यांच्या भाला, तलवारी आणि बाणांच्या टोकांवर लावले जाते. सैन्य अश्व (घोडे) आणि गज (हत्ती) यांना सामावुन युध्दाच्या तालिमी सुरु होतात. रुद्रस्वामींबरोबर असलेले काही पंडीत युध्दासाठी काही रणनिती आखतात. शत्रु जवळ आला आहे याची सर्वांना कुणकुण लागलेली असते. कारण अरण्यातील पशु सैरवैर झालेले असतात आणि पक्ष्यांचे थवे मोठ्या संख्येने पुर्वेच्या दिशेने स्थलांतर करीत असतात. शत्रु कुठवर पोहोचला आहे हे पाहण्यासाठी रुद्रस्वामींनी आधीच वाघांचा कळप शत्रुच्या दिशेने सोडलेला होता आणि त्यांच्या पाठीवर आपल्याजवळील एका योध्द्याला अश्वासह पाठवले होते. तीन दिवस आणि रात्र सतत प्रवास करत तो अश्व अचानक थांबतो. तो योध्दा जरा निरखुन बघतो तर त्याला वाघ त्यांच्या दिशेने येताना दिसतात. तो अश्व मागे वळवतो आणि वेगाने परतीच्या मार्गाला लागतो. हिमालयावर असलेल्या रुद्रस्वामींना हे सगळं कळत होतं. ते नगरातील सर्व सैनिकांना नगरापासून काही अंतरावर असलेल्या मैदानावर युध्दासाठी तयार रहावयास सांगतात.

सर्व सैनिक हातात हत्यारं घेऊन गज, अश्वांसह युध्दभुमीच्या दिशेने निघतात. संख्येने साधारण दोन हजाराच्या आसपास असलेले सर्व सैन्य युध्दभुमीवर उभं असतं. बराच वेळ निघून जातो मात्र शत्रु येण्याची कोणतीही हालचाल त्यांना दिसत नाही. सर्वांना रुद्रस्वामींवर विश्वास असतो, मात्र या वेळी कदाचित ते चुकले असतील अशी शंका अनेकांच्या मनात येते. सोबत आणलेले अन्न ग्रहण करत असताना सैन्याला दुरवरुन त्यांच्या योध्दा अश्वावर बसून माघारी येताना दिसतो. सगळे युध्दासाठी सज्ज होतात. अश्व जसजसा जवळ येतो तसतसा त्यांना त्यावर बसलेला आपला कर्तुत्ववान योध्दा हयात नसल्याचं लक्षात येतं. अश्व त्यांच्याजवळ येऊन थांबतो. त्यांचा योध्दा मेलेला असतो. त्याचं मेलेलं शरीर ते अश्वावरुन खाली उतरवतात. सर्वजण शोकाकूळ झालेले असतात. काहींचे डोळे पाणावतात.

काही क्षणात सर्वांना जमीन हलत असल्याचा भास होतो. सगळीकडे एकदम शांतता पसरते. सर्वजन समोर पाहतात. दूरवरुन मोठ्या संख्येने कुणीतरी येत असल्याचं त्यांना स्पष्ट दिसतं. हाच तो शत्रु ज्याने आपल्या माणसाला मारलं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. सर्व सैनिक आपापली हत्यारं तयार ठेवतात आणि मोठ्याने आरोळ्याा देत शत्रुच्या दिशेने चाल करतात. आपल्या समोर कोण आहे? कसा आहे? त्याची बलस्थानं आणि कमकुवत बाजू कोणत्या याची त्यांना कसलीही माहिती नसते. सर्व सैन्य फक्त शत्रुच्या दिशेने धावून जात असतात.

आता शत्रु स्पष्टपणे दिसू लागला होता. त्याला पाहून अनेकजन जागीच थांबले. कुणालाही आपल्या डोळ्याांवर विश्वास बसत नव्हता. मनुष्याएवढे हात मात्र त्यांना केवळ चारच बोटं, पायाला देखील चार बोटं मात्र पायाचे तळवे रुंद होते, त्याला लिंग नव्हते, रंगाने हिरवानिळा असणारा तो पशु बऱ्यापैकी मनुष्य प्राण्यासारखा दिसत होता. मात्र त्याचं तोंड सापासारखं होतं. असा विद्रुप आणि भयानक पशू पाहून सुरुवातीला सगळेच घाबरले. पण त्यांचे नेतृत्व करत असलेला योध्दा मोठ्याने म्हणाला,

‘‘धैर्य गमावू नका. रुद्रस्वामींचे शब्द आठवा ‘आपला वंश तेव्हाच वाढू शकतो जेव्हा आपण आपल्यावर येणाऱ्या संकटाचा नाश करु शकू.’ आज जर आपण आपल्यासमोर उभ्या असलेल्या दैन्यावर विजय मिळवू शकलो तर आपल्या वंशजांना आपला अभिमान वाटेल आणि जर आपण मागे हटलो किंवा परजित झालो तर अभिमान किंवा दुःख व्यक्त करायला आपला वंश वा कुळ, काहीही अस्तित्वात नसेल.’’

सर्व सैन्य मनातील भिती बाजूला ठेवून मोठ्याने ओरडू लागतात आणि शत्रुच्या मनात भिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मनुष्य प्राण्याच्या अनेक प्रजाती नष्ट केल्याने त्यांच्यावर समोर उभ्या असलेल्या मनुष्याचा फारसा फरक पडत नाही. उलट ते आणखी वेगाने मनुष्याच्या दिशेने चाल करु लागतात. मनुष्य देखील चाल करण्यास सुरुवात करतो. सगळे आरोळ्याा देत शत्रुवर हल्ला चढवतात. दोन-चार वार केल्यावर सैन्याच्या लक्षात येतं, हा पशू जितका बलवान दिसतो आहे तितका तो बलवान नाही. मुळात तो पशू युध्दासाठी सक्षमच नाही. संख्येने तुल्यबळ असलेला मनुष्यप्राणी त्या विद्रुप शत्रुवर सहजच विजय मिळवतो आणि त्यांचा मुख्य असलेल्या सर्पाला बंदिस्त करतो. रुद्रस्वामींनी सांगितल्यानुसार सर्व शत्रुचा नाश केला जातो आणि सर्वांना जाळले जाते. त्यांच्या मुख्य सर्पाला घेऊन सैन्य रुद्रस्वामींना भेटायला निघतात.

रुद्र्रस्वामी पर्वतावर उभे राहून आपल्या अंतर्मनाने सर्व पाहत होते. सैनिक शत्रुच्या मुख्य सर्पाला रुद्रस्वामींसमोर उपस्थित करतात. त्या सर्पाला पाहून रुद्रस्वामी त्याच्याशी त्याच्या भाषेत बोलू लागतात.

‘‘कोण आहेस तू?’’

‘‘आम्ही सुर्वज्ञ आहोत, अर्धसर्पनुष्य जातीचे राजे आहोत आम्ही.’’ सुर्वज्ञ बोलू लागतात.

‘‘मनुष्य प्रजातीचा नाश तुम्हाला का करावयाचा आहे? आम्ही तुम्हाला कसली हानी पोहोचवली होती?’’ रुद्रस्वामी रागाने विचारतात.

‘‘मनुष्यजातीपासुन आम्हाला धोका आहे.’’ सुर्वज्ञ स्वामींच्या डोळ्याात बघत बोलू लागतो.

‘‘धोका? असा कोणता धोका आहे तुम्हाला आमच्याकडून?’’ रुद्रस्वामी पुन्हा विचारतात.

सुर्वज्ञ त्यांच्याकडे एकटक पाहत राहतो. दिर्घ ‘वास घेत स्वामींकडे निरखुन बघत तो उत्तर देतो,

‘‘नामशेष होण्याचा.’’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel