इजिप्तमध्ये :

भल्यामोठ्या डोंगराच्या तळाशी एक गुहा असते. तिच्या आत अग्निपुत्र एक यज्ञ करत होता. हा यज्ञ साधारण सहा महिन्यांपासून सुरु होता आणि तो आता पूर्णत्वास आला होता.


"सर्व आत्म्यांवर ताबा मिळवण्यासाठी आपल्या रक्ताची आहुती द्या." यज्ञातील अग्निमधुन आवाज आला आणि अग्निपुत्राने त्याचा एक हात कापून तो अग्नीला अर्पण केला. आगीचा मोठा भडका उडाला आणि काही क्षणातच अग्नी विझली. कापलेल्या हाताच्या ठिकाणी त्याला नव्याने हात आला. क्षण दोन क्षण शांतता होते आणि मोठ्या प्रमाणात तिथे आत्मे येऊ लागतात. ते सर्व आत्मे पारदर्शक होते. हळूहळू त्यांना शरीर प्राप्त होतं. त्यांच्यापैकी कुणी अर्धसर्पानुष्य, कुणी डायनोसोर, कुणी अश्मयुगीन मानव तर कुणी हिंस्त्र प्राणी या त्यांच्या पूर्वीच्या शरीरात आकाराला येतात. अग्निपुत्राच्या यज्ञाने त्यांना त्यांचं आधीचं शरीर पुन्हा एकदा प्राप्त होतं, जे पूर्वीप्रमानेच असेल आणि प्रसंगी त्यांना मारल्यास ते पुन्हा एकदा मरु शकतील. अग्निपुत्राने त्यांना एक जीवनदान दिलं होतं.


"अग्निपुत्राचा विजय असो. मी सुर्वज्ञ आहे. अर्धसर्पानुष्य प्रजातीचा राजा." त्यांच्यापैकी एक पुढे येत म्हणाला.


Anchor

"ये सुर्वज्ञ, मला तुझ्यासरख्याच योद्धयाची गरज होती. एक काळ होता जेव्हा तू जवळपास सर्व मनुष्यप्राणी पृथ्वीवरुन संपवले होतेस. म्हणून तूच मला माझा सेनापती म्हणून योग्य वाटतोस. आजपासून तुझं नाव अग्निसूर्य असेल." अग्निपुत्र म्हणतो.


"देवा, तुमची आज्ञा हाच माझा धर्म. पण अशी कोणती लढाई करायची आहे, ज्यासाठी आपण आम्हा सर्वांना इथे बोलावल आहे?" अग्निसूर्य विचारतो.


"मनुष्यसंहाराची लढाई, मनुष्यप्राण्याने संपूर्ण पृथ्वीचा सत्यानाश केला आहे. त्याला या पृथ्वीतलावरून समूळ नष्ट करायचं आहे." अग्निसूर्य म्हणतो.


"पण देवा, हे काम म्हणावं तेवढं सोपं नाहिये." अग्निसूर्य म्हणतो.


"म्हणूनच तर तुम्हा सर्वांना इथे एकत्र बोलावलं आहे. उत्तर दिशेला दैव्यशक्ती तलवारवर प्राप्त झालेला एक मनुष्य आहे, अभिजीत. त्याला मृत्युच्या कुशीत झोपवायचं आहे. मी हे काम करायला गेलो तर तो माझा वध करु शकतो. म्हणून आपले सैन्य त्याच्यावर हल्ला करेल. तो एकदा मृत्युमुखी पडला तर पृथ्वीवर आपलंच राज्य असेल." अग्निपुत्र म्हणतो.


"पण देवा, पूर्वसूचना न देता समोरच्या पक्षावर हल्ला करने योग्य नाही." अग्निसूर्य म्हणतो.


"अच्छा? मग भुतकाळात तुम्ही मनुष्य प्राण्याला संपवण्यासाठी तुम्ही कोणती पूर्वसूचना दिली होती?" अग्निपुत्र विचारतो.


अग्निसूर्य शरमेने खाली मान घालतो.


"तरीही आपण पूर्वसूचना देऊन मनुष्यप्राण्यावर हल्ला करायचा आहे." अग्निपुत्र पुढे म्हणतो, "जरा बघू तरी, मनुष्यप्राणी स्वतःला वाचवण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो ते..." आणि मग अग्निपुत्र विद्रूपपणे हसु लागतो. अग्निसूर्य देखील त्याच्यासोबत हसू लागतो.


सर्व सैन्याला संमोहित केल्यानंतर अग्निपुत्र आणि अग्निसूर्य यांच्यात बराच वेळ चर्चा होते. युद्ध कशाप्रकारे असेल आणि हल्ला कोणत्या स्वरुपात करायचा, युद्धाची जागा आणि एकूणच रणनीतिवर दोघे बराच वेळ बोलतात आणि पृथ्वीवर अनौपचारिकपणे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होते.


दरम्यान अमेरिकेमध्ये, डॉ. अभिजीत कॉनफरन्स चॅट द्वारे सर्व राष्ट्रांना युद्ध होणार असल्याची माहिती देत प्रत्येक राष्ट्राला सैन्यासह सज्ज राहावयास सांगतो. ही लढाई मनुष्य आणि दानव यांची असल्याने सर्व राष्ट्रे त्याला पाठिंबा देतात. जॉर्डन आणि जॉनदेखील अभिजीतजवळ आले होते.


सर्व राष्ट्रांना प्रतीक्षा होती ती अग्निपुत्राच्या सुचनेची, आणि ती वेळ जास्त दूर नसते. ब्राझील येथील रियो डी जेनेरो इथला उंच पर्वतावरील पुतळा पाडून अग्निसूर्य युद्धाचा इशारा देतो. त्यावेळी सर्व वृत्त्वहिन्यांना तो पर्वतावर बोलावतो आणि त्यांच्यामार्फत युद्धाची घोषणा करतो.


"दर्भद्रि मनुष्य प्राण्यांनो, तुमचा शेवट आता जवळ आला आहे. या पृथ्वीतलावर तुम्ही खुप मोठा काळ राज्य केलं आहे. आता पृथ्वी आणि आत्मा एकदमच सोडण्याची वेळ तुमच्यावर आली आहे. मी अग्निपुत्राचा सेनापती अग्निसूर्य तुम्हाला आवाहन करतो, दोन तासांमध्ये अफ्रीका येथील मोठ्या रणांगनात तुमच्या सैन्यासह हजर रहा. तिथे मृत्यु तुमची वाट पाहत आहे. दोन तासांत नाही आलात तर कोणतीही पूर्वसूचना न देता एकाच वेळी संपूर्ण पृथ्वीवर हल्ला करु..." असं म्हणत अग्निसूर्य विद्रूपपने हसू लागतो.


अर्धा मनुष्य आणि अर्धा सापासारखा दिसनारा तो, त्याला बघून प्रत्येकाला किळस येत होती आणि त्यातच अशा विद्रूप प्राण्याने आवाहन दिल्याने प्रत्येकाच्या मनात राग खदखदत होता.


अमेरिकेमध्ये :

डॉ अभिजीत, जॉर्डन, जॉन, अमेरिकी लश्करप्रमुख आणि संयुक्त राष्ट्राचे विशेष अधिकारी यांच्यात आधीपासूनच बैठक सुरु होती. अग्निसूर्याने वृत्तवाहिन्यांना दिलेली सुचना त्यांनी बैठक सुरु असतानाच पाहिली.


"आपल्याला ताबडतोब कारवाई करावी लागेल. जॉन, या युद्धाची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवतो." अभिजीत म्हणतो.


जगभरात जॉनपेक्षाही अनुभवी आणि युद्धात प्रावीण्य मिळवलेले बरेच सैन्यदल अधिकारी होते. पण तिसऱ्या महायुद्धाची धुरा एक नौसेना अधिकाऱ्याच्या हातात सोपवली याचे अनेकांना आश्चर्य वाटले. तरी कुणीही अभिजीतच्या निर्णयाला विरोध केला नाही, कारण बर्मूडा त्रिकोणाजवळ जॉनने केलेला पराक्रम सर्वांच्या लक्षात होता. आता जॉन काय बोलतोय याची सगळे वाट पाहत होते.


"अग्निपुत्र आणि अग्निसूर्य आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी नक्कीच वेगळा डाव आखलेला आहे, आपल्याला अत्यंत सावधपने पावले उचलावी लागतील. अफ्रिकेमध्ये लढ़ा असल्याने जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड आणि अफ्रीकाशेजारील देशांनी आपले सैन्य अफ्रिकेत पाठवावे. दूर असलेले देश अतिहिंस्त्र शास्त्रास्त्रे घेऊन एयर फ़ोर्सच्या सहाय्याने तुमच्या मदतीला येतील." जॉनने आदेश देताच सर्व राष्ट्रे युद्धाच्या तयारीला लागली. विचार करण्यासाठी कोणालाही वेळ नव्हता, आणि वेळ काढताही येत नव्हता.


"सर, एक महत्वाची सुचना आहे. आम्ही इजिप्तमधून आफ्रिकेच्या दिशेने जाणारी फौज पाहत आहोत. इथलं चित्र पाहता आम्ही पुरते गोंधळलो आहोत. इथले लाइव्ह व्हिडिओ दाखवण्याची परवानगी द्यावी." पूर्व आफ्रिकेच्या सिमेवरुन जॉनला व्हिडिओ फोन येतो, जो समोर असलेल्या स्क्रीनवर अभिजीत आणि जॉर्डनसह सर्वजन सहजपणे पाहू शकत होते.


जॉन परवानगी देतो आणि समोर आलेले चित्र पाहून सर्व अधिकारी आपल्या जागेवरुन उठून उभे राहतात. हे स्वप्न आहे की सत्य यावर विश्वास बसत नव्हता. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन नामशेष झालेले डायनोसोर, अश्मयुगीन मानव आणि त्याच काळातील हिंस्त्र प्राणी, दोन टोकदार दात बाहेर आलेले वाघ आणि सिंह, चार पाय आणि पंख असलेले महाकाय पक्षी सोबत अर्धसर्पानुष्य सेना अशी मोठी फौज आफ्रिकेच्या दिशेने जात होती.


(क्रमशः)


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel