श्रीमद् भागवत पुराण आस्थावान हिंदूंसाठी सर्वोत्कृष्ट मोक्षदायी ग्रंथ मानला जातो. याचे रचनाकार महर्षी व्यास यांनी या महाकाव्याला आपल्या अठरा पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ स्थान दिलेले आहे. हे पुराण ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा अद्भुत समन्वय आहे. यामध्ये वैदिक साहित्य आणि संस्कृत साहित्याचे गूढ विषय आहेतच, सोबतच यामध्ये भूगोल, खगोल, इतिहास, दर्शन, विज्ञान, नीति, कला यांसारख्या अगणित विषयांचे रोचक आणि सुगम वर्णन आहे.
भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाच्या सर्व लीला आणि प्रसंगांनी हे पुराण भरलेले आहे, परंतु इथे याच्या अकराव्या स्कंधात ७ व्या, ८ व्या आणि ९ व्या अध्यायात वर्णन असलेल्या त्या प्रसंगाची चर्चा करूया ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी ‘अवधूतोपाख्यान’ द्वारे विभिन्न प्रकारचे गुरुजन आणि त्यांच्याकडून प्राप्त होणारे शिक्षण यांचे वर्णन केले आहे. यामध्ये देवाची उपासना करणाऱ्या साधकाला या विशिष्ट गुरूंकडून ज्या ज्ञानाच्या गोष्टी शिकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यांचे महत्त्व आपल्या गृहस्थी जीवनात देखील कमी नाही.
आता माहिती करून घेऊयात की आपल्या जीवनाच्या साधनेत आपण कोणाकडून काय शिकून घेतले पाहिजे