आरती रामदासा नित्यानंद विलासा ।
कृपासिंधू स्वामीराया परळीगडनिवासा ॥धृ॥
कलियुगीं ब्रम्हविद्या प्रगटाया लागुन ।
द्विजकुळीं प्रगटले महारुद्र आपण ।
ब्रह्मचर्या संपादोनी केलें गंगातीरा येणें ॥१॥
घेवोनि रामभेटी वर्णिंयले कीर्तीगुण ।
दासबोध ग्रंथ केला दीनजनांलागून ।
त्वरितचि मुक्ति जोडे करितां त्याचें श्रवण ॥२॥
दयाक्षमाशांतिभक्तिवैराग्य निर्मळ ।
निजअंगें आचरोनी मार्ग केला सोज्वळ ।
निरंजनादिक भक्त उद्धराया सकळ ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel