जयदेवी, जयदेवी, जय देववंदे । श्रीवेदवंदे

श्रीअनसूये, माये, जय मंगळ वरदे ॥धृ०॥

जयजय श्रीचतुराननदेवात्मज कांते

जयजय कर्दमदुहिते, दत्तात्रय माते

येती तडि तापडि यति भवदाश्रमातें

पावति मुनिजन-खगमृगगण-विश्रामातें ॥जय० ॥१॥

नाना गुल्मलताद्रुम-अमृतरसवल्ल्या

आनंदघन पदवैभव श्रीहरि कैवल्या

सुपुत्रवंत्या भार्गवि, देवकि, कौसल्या

वानिति अनसूये तव बहुविध कौशल्या ॥जय० ॥२॥

देउनि भोजन सकळां सकळांच्या पाठीं

करसी भोजन स्वसुतासह एक्या ताटीं

अनंत ब्रम्हांडांचे घट ज्याचे पोटीं

तो प्रभु ढेंकर देउनि अन्नांगुल चाटी ॥जय० ॥३॥

श्रीलक्ष्मी-पार्वति-सावित्रीसहभर्त्या

अखंड ऋद्धीसिद्धी नांदति गिरिवरि त्या

चौसष्ट-अठरा करती त्वद्‌गुणआवर्त्या

विष्णूदासाच्याही ऐकिसि पदार्त्या ॥जय० ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel