या अधिकमासी श्रीपुरुषोत्तम पाही ।

करू मंगल आरती सर्व मिळूनिया ठाई ॥ ध्रु ० ॥

देहबुद्धी कापुस पिंजुन घेऊ सारा ।

तीस-तीन सुतांचा एकेक वातीस फेरा ।

स्नेह तुपात भिजवून सप्रेमे करी घेई ।

करू मंगल आरती सर्व मिळुनिया ठाई ॥ १ ॥

मन शुद्ध निरांजन निर्गुण तबकी ठेवा ।

षड्‍विकार जाळुन कापुर वडी मग लावा ।

मनभक्ति गुंफुनी हार फुलांचा वाही ।

करू मंगल आरती सर्व मिळुनिया ठाई ॥ २ ॥

गुरूब्रह्म सनातन पाहुन ब्राह्मण ऐसे ।

करू अपूपवायन दान तयाला खासे ।

अहंभाव दक्षणा देऊनी कृतार्थ होई ।

करू मंगल आरती सर्व मिळुनिया ठाई ॥ ३ ॥

त्र्यय वर्षा त्रिंपुटी साधुनी संधी आला ।

मलमास अधिक मग म्हणती कोणी याला ।

मनु साधुनी संधी गुरुपदी तरुनी जाई ॥

करू मंगल आरती सर्व मिळुनिया ठाई ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel