धन्य धन्य योगी सर्व जगांत ॥
मोरया गोसावी नाम प्रख्यात ॥
अतुल तप आहे त्यांचे विख्यात ॥
विघ्नहराचें दर्शन त्या नित्य होत ॥
जयदेव जयदेव जय योगिवर्या ॥
आरती (भावार्थी) ओवाळू तव चरणद्वया ॥धृ०॥१॥
त्यांच्या तपःसामर्थ्याचिया योगें ॥
मोरेश्वरीचें देव चिंचवडीं आलें ॥
तपस्तेजाचें अद्भुत सामर्थ्य ॥
भक्तावर केले त्यानीं परमार्थ ॥२॥
गणेश भक्ता माजी श्रेष्ठ अत्यंत ॥
प्रसन्न पूर्णं झाले त्यावरी एकदंत ॥
मार्गशीर्ष वद्य षष्ठीलागोनी ॥
समाधी घेतली चिंचवड स्थानीं ॥३॥
गणेशाची भक्ति उपजो माज्या चित्तीं ॥
’कृष्ण-सूत’ तव करितो विनंति ॥
तीर्थे तीर्थे जायते साधुवृन्दम् ॥
वृन्दे वृंदे तत्वचिंतानुवादः ॥
वादे वादे जायते तत्वबोधा ॥
बोधे बोधे सच्चिदानंदभासः ॥१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel