कॉलेजमध्ये प्रवेश करतांना तुम्हाला 'Shri Sant Gajanan Maharaj College Of Engineering Shegaon' अशा मोठ्या अक्षरात लिहिलेलं प्रवेशद्वार दिसेल. कॉलेजच्या समोरच्या गेटमधून आत शिरल्यास एक सरळ जाणारा उतार रस्ता तुम्हाला दिसेल जो सरळ जाऊन कॉलेजचा मागच्या गेटला मिळतो. एकही कचरा पडलेला नसून अगदी स्वच्छ असणाऱ्या या रस्त्याच्या आजूबाजूला कडूलिंबासारखी मोठमोठी हिरवी झाडेच झाडे आहेत. त्या हिरव्या झाडांच्यामध्ये छोटी झाडे देखील आहेत. पांढरी, लाल , पिवळी अशी रंगीबेरंगी फुलझाडे आहेत. हा रस्ता म्हणजे भिंतीला लावलेल्या निसर्ग फोटोफ्रेमच्या फोटोप्रमाणेच हे रम्य असं निसर्गदृश्य आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याच्या आजूबाजूला अजून छोटे-छोटे रस्ते जुळलेले आहेत. समोरच्या गेटमधून थोडं समोर आल्यावर कॉलेजचं 'research center' आहे.
त्याचं नाव आहे 'Sant Gajanan Innovation & Advance Research Center '. इंजिनीरिंग स्टूडंटला इथे गेल्यानंतर आपण 'researcher' किंवा 'scientist' झाल्यासारखं वाटतं. थोडं अजून समोर गेलं की डाव्याबाजूला 'seminar hall' आहे जिथे कॉलेजचं 'cultural event' होतात. 'seminar hall' च्या थोडं समोर गेलं की 'college administrative office' तुम्हाला दिसेल. ऑफिसच्या अगदी आमनेसामने एक मोठं मैदान आहे. या मैदानावर सकाळी मॉर्निंग वॉकची गर्दी आणि संध्याकाळी क्रिकेट-फुटबाल असले खेळ खेळणाऱ्या मुलांची गर्दी असते. हे मैदान संपलं की सुरुवात होते ते क्रीडाघरला ज्याला 'sport complex' या नावाने संबोधलं जातं. यात बॅडमिंटन, जिम्नास्टिक खेळल्या जातात तर मुलामुलींसाठी जिम, योगा, ऍरोबिक साठी खोल्या आहेत तसेच संगीतासाठी नादब्रह्म कक्ष आहे. याच कॉम्प्लेक्सच्या बाजूला एक मोठा लांब मोकळा वरून छत असलेला हॉल आहे. हा हॉल कॉलेज गॅदरिंगच्या वेळेला सकाळ- संध्याकाळ प्रॅक्टिससाठी बुक केलेला असतो. या काळात BE-MBA चे विध्यार्थी डान्स, ड्रामा, योगा, स्टंट इत्यादींची प्रॅक्टिस सुरु करतात.
या हॉलच्या समोरच 'विद्यामंदिर' आहे जिथे इंजिनीरिंगचे विद्यार्थी शिकत असतात. यात electrical, information technology, electronic, computer science इत्यादी ब्रांचेस आहेत. आत गेल्यानंतर सगळ्या क्लासरुमच बांधकाम एकसारखं आहे. विद्यामंदिरच्या समोर एक पटांगण आहे जिथे 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने,आनंदाने साजरा केला जातो. कार्यक्रमात शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले या दोघांचाही सहभाग असतो. पटांगणाचा समोर विद्यार्थांसाठी महत्वाचं असलेलं ज्ञानाचं भंडार आहे म्हणजे सर्व पुस्तके उपलब्ध करून देणारे ग्रंथालय. या ग्रंथालयात अनेक मोठमोठ्या लेखकांची, कावयित्रींची पुस्तके, ग्रंथ ठेवले आहेत. शिवाय ग्रंथालयात संत गुलाबरावांनी लिहिलेले अनेक ग्रंथ इथे ठेवलेले आहे त्यामुळे या ग्रंथालयाचं नाव 'संत गुलाबराव ग्रंथालय' असं आहे. ग्रंथालयाचा आत गेल्यावर तुम्हाला विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वावर लिहिलेल्या विविध पुस्तकांचा संग्रह मिळेल. या ग्रंथालयाचं बांधकाम एखाद्या चित्रपटात दाखवलेल्या ग्रंथालयाप्रमाणे आहे. ग्रंथालयाच्या वरच्या मजल्यावर प्रत्येक ब्रांच साठी वेगवेगळे कंपार्टमेंट आहे. या ग्रंथालयाच्या मागच्या बाजूला शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी इमारती बांधल्या आहेत. तसेच मुलामुलींचे वसतिगृह देखील आहे. 'संत जनाबाई' हे 1st-2nd year, 'संत मुक्ताबाई' हे 3rd year, 'संत मीराबाई' हे 4th year साठी असे मुलींचे एकूण तीन वसतिगृह आहेत. आणि मुलांचे एकूण पाच वसतिगृह आहे.
मुलांचा वासतिगृहाच्या बाजूला कॉलेज कॅन्टीन आहे. रिसेसला मुलं-मुली, शिक्षकवर्ग सगळे कॅन्टीनला चहा, कॉफी, बिस्किटे, शेगावची प्रसिद्ध कचोरी, आलुवडे इत्यादी घेण्यासाठी जमलेले असतात. मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळं असं कॅन्टीनमध्ये दोन कंपार्टमेंट आहे. रोजच्या जेवणासाठी गर्ल्स मेस आणि बॉइज मेस पण आहे. परिसरात छोटी-छोटी घरे देखील आहेत ज्यात कर्मचाऱ्यांची कुटुंबे स्थायिक आहेत. कॉलेजच्या छोट्या मागच्या गेटला लागून संत गजानन महाराज शाळाही आहे. असा हा कॉलेजचा संपूर्ण परिसर विविध इमारतीने सजलेला आहे. पहिल्यांदा आलेल्याला तर अजूनही हा परिसर, हे दृश्य पाहून भुरळंच पडते!