मैत्री हा शब्द सगळ्यांचा आवडीचा असतो. "मैत्री खूप काही शिकवते" हे कधी वृत्तपत्रातून, कधी पुस्तकातून तर कधी सुविचारातून वाचलं होतं. पण आज ते सिद्ध झालंय...
माझ्या मैत्रीच्या कट्यात असणाऱ्या मित्र-मैत्रिणीने खूप काही शिकवलं...
आजोबा मला नेहमी सांगायचे. "प्रत्येकाकडे खूप सुंदर गुण असतो फक्त तो शोधावा लागतो." आणि त्याच शोधात असताना मी माझ्या मित्र-मैत्रिणीकडून खूप काही शिकली...
जान्हवी - नेहमी दुसऱ्यांसाठी त्यांचा आधारस्तंभ बनून सोबत आणि पाठीशी उभं राहायचं.
कोमल - कधीच मदतीसाठी नकार न देणे आणि वेळ आली की मोठं होऊन समजूतदारपणाने वागणे.
शितल - आयुष्यात नेहमी हसत, खेळत, बिनधास्त राहणं.
जयश्री - भावनांना समजून शायरी करण्याची कला.
प्रांजली - कधी जीवनाच्या एखाद्या क्षणाला आपण पूर्णपणे खाली पडलो तर तितक्याच खांबीरतेने त्याला सांभाळून पुन्हा झेप घेवू शकतो.
जाई - कविता बनवण्याचा सुंदर गुण
अबोली - संकटाच्या वेळी स्वतः जबाबदारी स्वीकारून ती योग्यरीत्या पूर्ण करणे.
मानसी - उत्तम भोळेपणा असणारा गुण.
ज्योती - दुसऱ्याला त्रास न देता कुठलंही काम जर का एकटीने होत असेल तर ते एकटीने करणे.
निलमणी - जगात आपल्यावर हसणाऱ्या लोकांचा विचार न करता आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करणे.
विद्या - वेळेचा वक्तशीरपणा
प्रियंका - मोजक्या शब्दात दुसऱ्याला व्यवस्तीतरित्या समजावून सांगणे.
निकिता - कधी मोकळ्या वातावरणात बसून निसर्गाचा आस्वाद घेणे.
तनश्री - अभ्यास करणे.
शुभश्री - पहिली भेट का होईना पण गोड हसणे आणि बोलणे.
राधा - घरी नसताना सुद्धा इतरांची काळजी पाहुणांसारखी घेणे.
साक्षी - जगात थोडं शहाणं राहण्याची गरज आहे कारण साध्या माणसाला कुणीच जगू देत नाही.
नमिता - दुसऱ्याला तात्पुरता राग आला तरी चालेल पण मनात कधी सत्य लपून ठेवायचं नाही.
प्रगती - जर आपला हक्क मिळत नसेल तर स्वतः स्वतःचा हक्क मागायला शिका.
मधुरा - अगदी स्पस्टपणे बोलायला शिका.
प्रतिक - गावातल्या किंवा सामान्य लोकांशी त्यांच्यासारखं बोललं की त्यांना अपुलकीचं वाटतं.
देवांशू - खऱ्याअर्थाने एका शब्दावर दुसऱ्याला मदत करायला तयार राहणे.
चंद्रकांत - कुणाशी पहिल्यांदा मैत्री का होईना पण अगदी मनमोकळेपणाने बोलणे.
अजय - जवळच नसूनही मदतीसाठी होकार म्हणायला शिका.
पुष्कर - कधी गर्दीतही शांत राहणे, कधी वेळ पडली की स्वतःचा स्वार्थाचा विचार न करता दुसऱ्याला सांभाळून घेणे.
जिगर - मदतीसाठी नेहमी तयार राहणे.
अजय - कविता आणि शायरी सांगण्याची, सादर करण्याची कला.
प्रखर - अशी मैत्री करणे की कुणाला कधी वेगळं वाटणार नाही.
ऋषिकेश - स्वतः कडे सुंदर गुण असूनही दुसऱ्यांच्या गुणांचा सन्मान करणे.
भूषण - असलेल्या भावनेतून शब्दांवर भर पाडण्याची कला.
कॉलेज अभ्यास सोडून इतर गोष्टी फार कमी शिकवतो.
पण या कॉलेजच्या पलीकडचं "मैत्रीचं कॉलेज" , आयुष्यात लागणारे धडे शिकवतो. आणि यात शिकवण देणारे शिक्षक म्हणजे आपले "मित्र-मैत्रिणी"...!!