लॉकडाऊनमुळे कॉलेजच्या दिवसाचे शेवटचे क्षण जगायचे राहून गेले. आतापर्यंत कॉलेजला केलेली दंगा-मस्ती खूप आठवते, चेहऱ्यावर हसू येते पण राहून गेलेले क्षण पुन्हा येतील का? या विचाराने मनात खंतही वाटते. 
          कितीपण पार्टी मस्ती आता करू पण जी मज्जा क्लासमध्ये गोंगाट घालण्यात यायची ती आता नाही येणार. ते दिवस खरंच खूप मस्त होते "आत येऊ का सर" असे एकजण म्हणायचं आणि घुसायचे दहाजण, exam च्या वेळेला २ लाइन माहिती पडल्या की २ पेजेसच explanation लिहायचं, एखादा पोरगा लेक्चरला कमी आणि कट्टावरच जास्त दिसायचा. पास होण्यासाठी करायचे नवस, पण अजूनही आठवतात कॉलेजचे दिवस. वर्गात शिकवलेले सर्व डोक्यावरून जायचे पण तरीही हे दिवस फार आवडायचे. सर शिकवत असतांना X आणि O चा खेळ खेळायचा, नोट्सच्या निमित्ताने वहीत गाणे लिहायचे. खूप दंगा केलेली bday पार्टी, assignment साठी xerox च्या दुकानासमोर लावलेली रांग, कॉलेज कट्ट्यावर बसून मोठमोठ्याने गप्पा मारणे एवढंच नाहीतर मित्र-मैत्रिणींसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवतात. 
            फक्त शेवटचे १५ दिवस होते कॉलेजचे लॉकडाऊनमुळे तेही नाही मिळाले जगायला. सगळ्यांना जगायचं होते कारण यात कॉलेजच्या जीवनाचं सारांश लपलेलं होतं. ते शेवटचं project submission, seminar, college festival traditional day, farewell आणि sign out day  राहून गेलं. 
कॉलेज मधून गेल्यावर कुणी उच्चशिक्षित होईल तर कुणी परदेशात जाईल, कुणी समाज सेवेत तर कुणी देश सेवेत रमून जाईल. पण तरीही वाटतं

 पुन्हा जगावे चार दिवस आठवणींचे,
मित्र-मैत्रिणींच्या सोबतीचे,
अभ्यास सोडून धमाल नि मस्तीचे,
कुठलंही बंधन नसलेल्या मनमोकळेपणाचे ..

मित्रांनो कॉलेज सोडल्यावर जीवनाच्या वाटेवर पुन्हा वळून पाहू,
सोडून गेल्या या क्षणांना आठवणीत जपून ठेऊ,
आठवणीच्या दुनियेत पुन्हा या कॉलेजला आशेने पाहू...!!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel