*उधारी*

- दीपक तांबोळी

एका पेशंटच्या दाढेची ट्रिटमेंट झाल्यावर
सुबोधने दुसऱ्या पेशंटला खुर्चीत बसायला सांगितलं.त्याच्या दाढांचं तो निरीक्षण करीत असतांनाच रिसेप्शनिस्ट काचेचा दरवाचा ढकलून आत आली.
" सर ते मनोहर पाटील नावाचे पेशंट आहेत ना,ते म्हणताहेत की आता त्यांच्याकडे फक्त एक हजार आहेत.बाकीचे दोन हजार पुढच्या आठवड्यात आणून देणार म्हणताहेत"
सुबोधला याच गोष्टीची चिड होती.कपड्यांवरुन तर पेशंट चांगला सधन दिसत होता.शिवाय तो नेहमी कारने येतो हेही त्यानं पाहिलं होतं.बरं त्यांना अगोदरच तीन हजार खर्च येणार असल्याची कल्पना दिली होती.तरी सुध्दा त्यांनी पैसे आणू नयेत याचा त्याला संताप आला.प्राँब्लेम हा होता की तिथं जमलेल्या पेशंटच्या गर्दीसमोर असं त्यांना संतापून बोलणंही त्याच्याबद्दल पेशंटच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला छेद देणारं होतं.त्याने नरमाईने घ्यायचं ठरवलं.
"ठिक आहे.त्यांचा मोबाईल नंबर लिहून घे आणि त्यांना सांग पुढच्या आठवड्यात नक्की आणून द्या"
रिसेप्शनिस्ट गेली.तो आपल्या कामाला लागला पण मनातली ती खदखद काही कमी होईना.
खरं पहाता तो शहरातला सगळ्यात यशस्वी दंतवैद्य होता.गरीबीची जाण असल्यामुळे त्याने आपली फी माफक ठेवली होती.कामात तर तो निष्णात होताच.वर मिठास बोलणं.त्यामुळे तो सर्वांना डाँक्टरपेक्षा आपला मित्रच वाटायचा.अर्थातच त्याचा दवाखाना कायम पेशंटने तुडूंब भरलेला असायचा.सकाळी नऊ पासून ते रात्री दहापर्यंत त्याचं काम चालायचं.महिन्याला दहा लाखाच्या आसपास त्याची कमाई होती.लोकांनी त्याची उधारी बुडवली नसती तर हीच कमाई अकरा बारा लाखापर्यंत गेली असती.

दुपारी दोन वाजता त्याने काम थांबवलं.त्याला आणि स्टाफलाही भुक लागली होती.पंधरा मिनिटात त्याने जेवण संपवलं कारण बाहेर पेशंट ताटकळत बसले होते.बेसिनमध्ये हात धुत असतांनाच मोबाईल वाजला.हात कोरडे करुन त्याने तो घेतला.
"हँलो सुबोध मी चंदन बोलतोय.फ्री आहेस ना? जरा बोलायचं होतं"
" आताच जेवून हात पुसतोय बघ.बोल काय म्हणतोस"
" अरे जरा घराचं काम सुरु केलंय.दोनतीन लाखाची मदत केलीस तर बरं होईल"
" चंदन यार,मी तुझ्या पाया पडतो.तू दुसरं काहीही माग.माझ्या घरी सहकुटुंब रहायला ये.खाणंपिणं सगळं मी करीन.पण प्लीज यार मला पैसे मागू नकोस.तुला सांगतो ज्यांनीज्यांनी माझ्याकडून उधार पैसे नेलेत त्यांनी ते मला कधीच परत केले नाहीत.तीसचाळीस लाख माझे लोकांकडे अडकलेत.पैसे द्यायचं कुणी नावच काढत नाही "
"अरे पण मी तुझा मित्र आहे.तुझे पैसे बुडवेन असं तुला वाटलंच कसं?"
" मित्र?अरे बाबा मित्र तर मित्र माझे भाऊ,बहिणी,मेव्हणे,काका,मामा ,सासरे सगळ्यांना पैसे देऊन बसलोय.एक रुपया मला परत मिळाला नाही. मिळालं ते फक्त टेंशन,मनस्ताप आणि शिव्या.पैसे मागितले तर म्हणतात ' तुम्हांला काय कमी आहे ,पैसा धो धो वाहतोय.पैसे देणारच आहोत ,बुडवणार थोडीच आहे!'अगोदर लाचारीने पैसे मागणारे नंतर शिरजोर बनतात हे मी नेहमीच पहात आलोय. तुला जर वाटत असेल की आपली मैत्री कायम रहावी तर प्लीज मला पैसे मागू नकोस.हा पैसा सगळे संबंध खराब करतो बघ"
समोरुन फोन कट झाला. तो रागानेच कट केला असणार हे त्याच्या लक्षात आलं.त्याने परत आपलं काम सुरु केलं पण त्याच्या मनातून तो विषय जाईना.

उधारीचे पैसे परत का मिळत नाही हे विचारायला मागे तो एका ज्योतीष्याकडे गेला होता.ज्योतिषाने त्यांची कुंडली पहाताच त्याला सांगितलं
" दुसरं काही सांगण्याच्या आत एक गोष्ट सांगतो.तुम्ही कुणालाही उधार पैसे देऊ नका.उधारीचे पैसे तुम्हांला कधीही परत मिळणार नाहीत. तुमचे भाऊबहिण, साले,मेव्हणे,जवळचे नातेवाईक,मित्र सगळेच तुमचे पैसे ह उपाय?"त्याने विचारलं होतं.ज्योतिषाने नकारार्थी मान हलवली.
"उपायापेक्षा बचाव केव्हाही चांगला.कोणी कितीही कळकळीने पैसे मागितले तरी द्यायचे नाहीत.संबंध खराब झाले तरी चालतील कारण पैसे देऊनही संबंध खराबच होणार आहेत.किंवा मग पैसे द्यायचे आणि ते दिले आहेत हेच विसरुन जायचं म्हणजे टेंशनचं कामच नाही.तुमच्या नशिबात पैसा भरपूर आहे.तेव्हा पैसा बुडाल्यामुळे तुम्हांला फारसं जाणवणार नाही."
ही गोष्ट खरी होती.त्याच्याकडे पैसा येतांना दिसत होता म्हणून लोक मागत होते आणि तो बुडवल्यामुळे त्याला काही फरक पडणार नाही म्हणून निर्लज्जपणे बुडवत होते.तेव्हापासून त्याने पैसे उधार देणं बंद केलं होतं.पण दवाखान्यातली उधारी त्याला काही बंद करता आली नाही.

रविवार उजाडला.खरं तर रवीवारीही त्याचा दवाखाना बंद नसायचा.असिस्टंट डाँक्टर्स काम करत असायचे.सुबोधही एखाद दुसरी चक्कर टाकायचा.आज मात्र त्याला साठ किलोमीटरवरच्या एका खेड्यातल्या लग्नाला जायचं होतं म्हणून तो दवाखान्यात जाणार नव्हता.खेड्यातली लग्नं विशेष म्हणजे त्यातलं जमीनीवर बसून केलेलं जेवण त्याला फार आवडायचं.लहानपणीच्या आठवणी त्यानिमित्ताने जाग्या व्हायच्या.देशविदेशात अनेक महागड्या हाँटेल्समध्ये तो जेवला होता पण या जेवणातली त्रुप्ती त#285327335
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel