स्टोनमॅन केस हि १९८५ सालची गोष्ट आहे. ह्याची शोध मोहीम १९८५ मध्ये सुरु झाली जेव्हा मुंबई पोलिसांना काही शव मिळायला सुरुवात झाली होती. हि शव झोपडपट्टीतल्या भिकारी, कचरा गोळा करणाऱ्यांची, बेघर रस्तावर झोपणाऱ्या माणसांची होती. मुंबई मध्ये त्याकाळी अचानक या सगळ्यांचा मृत्यू रात्र्च्या गोटात एकामागोमागएक होऊ लागला. सगळ्यांच्या म्रणाचे कारणही एकसारखेच होते. तेंव्हा मुंबई पोलिसांना यामध्ये गडबड आहे असे वाटून त्यांनी तपास चालू केला. ह्या हत्या साधारणपणे सायन सर्कल माटुंगा महेश्वरी उद्यान याभागात झाल्या होत्या. कदाचित हा परिसर धारावीच्या झोपडपट्टीजवळ आहे त्यामुळे खुन्याने निवडला असेल. इथे भिकारी आणि बेघर लोकांची संख्या मुंबईतील इतर प्रभागांपेक्षा जास्त होती. ह्या हत्यांच्या मालिकेची सुरुवात झाली आणि दोन वर्ष चालू राहिली. ह्या मध्ये पोलिसांच्या रेकॉर्डनुसार बारा लोकांची हत्या झाली होती.
पोलिसांच्या अहवाला नुसार या केसची माहिती काही अशी होती. खुनी रस्त्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांची निवड करत असे. त्यांच्या डोक्यात ते झोपलेले असताना मोठा सिमेंटपासुन बनवलेला दगड फेकत असे. त्यामुळे त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा होत असे. आश्चर्याची बाब अशी कि तो सिमेंटचा दगड तीस किलो वजनाचा होता. सुरुवातीला हे खुन मुंबई पोलिसांनी फार गांभिर्याने घेतले नव्हते. सलग सहावा खुन होणार होता. तेंव्हा पोलिसांना याचे गांभिर्य कळले. कारण सहाव्या खुनाच्यावेळी खुन्याच्या तावडीतुन तो माणुस निसटला होता. तो एक वेटर होता. त्याने त्या अंधारमय रात्री काय घडले ते पोलिसांना सांगितले तेंव्हा त्यांनी या प्रकाराकडे लक्ष दिले. शेवटचा खुन सन १९८७ साली एका बेघर मुलाचा झाला. या खुनानंतर अचानकपणे हे सत्र थांबले.
काही लोकांनी यावार अंदाज बांधायला सुरुवात केली. काहिंचे म्हणणं होतं की हे खुन काळ्या जादुच्या आहारी गेलेल्या इसमाने घडवुन आणले आहेत. सायन आणि धारावी या ठिकाणी हे खुन झाले. मुंबईमधील हया शहरांमध्ये काळे जादुचे प्रयोग व प्रसार करणारी माणसे राहतात असा अंदाज बांधण्यात आला. तिथे झोपडपट्टीत राहाणार्या माणसांना काळ्या जादुतुन मिळणार्या नफ्यासाठी नेहमीच हाव असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या खुनांमागे एक थेअरी आहे. खुनी नेहमी आपली शिकार फार सावधपणे हेरत असे. ज्यालोकांना आगा पिछा नाही किंवा ते मेले तरी त्यांच्या साठी विचारणारं कुणी नाही असे पाहुन तो आपली शिकार ठरवत असे. या मध्ये मुख्यत्वे भिकारी आणि दिवसभर कुठेतरी काम करुन रात्री रस्त्यावर झोपणारे गरिब लोकं सामिल होते. प्रत्येक खुनाजवळ तीस किलोचा सिमेंटचा दगड पडलेला असे ज्याने त्यांचा खुन केला जात होता. साधारणपणे तीस किलोचा सिमेंटा दगड एकट्या माणसाने उचलुन आणंणं जरा असंभवच वाटात होतं. त्या दगडाने अगदी अचुक नेम साधुन खुन करणं त्याही पेक्षा अमानवी होतं. इतका मोठा दगड घेऊन फिरणं हे ही शक्य वाटत नव्हते. त्यामुळे या खुनांच्या मालिकेत अनेक प्रश्न उद्भवला होता.त्या सिमेंटच्या दगडसदृश लादिवर कुणाच्या बोटांचे ठसेही मिळाले नाहीत. आजुबाजुला कोणताही पुरावा नव्हता किंवा कुणी साक्षीदारही मिळाला नाही. जो वेटर या खुन्याच्या तावडीतुन सुटलेला त्यालाहि अमावस्या असल्याने खुन्याचा चेहरा दिसला नाही. त्याने जीव मुठीत धुम ठोकली होती. असेच साधर्म असणारी केस कलकत्त्यात ही आढळली होती.