आजची गोष्ट आपल्या पेज
वरच्या एका मित्राने सांगितली आहे. त्याचे
नाव नमूद करू नये अशी विनंती त्याने
केली आहे.
हि घटना त्याच्या निलेश या मित्रा बरोबर
घडली आहे. घटना घडून फक्त २ महिने
उलटले आहेत.
मी श्रीरामपूर चा राहणारा आहे. इथून
शिर्डी फक्त ३० किमी अंतरावर आहे.
एकदा निलेश च्या घरी त्याचा मित्र
अहमदाबाद येथून शिर्डीस जाण्यास
आला होता. शिर्डीत काही दिवस
थांबल्यावर निलेश ने
त्याला त्याच्या घरी येण्याचा हट्ट केला.
निलेशच्या हट्टापाई त्याला होकार
द्यावा लागला. शेवटी निलेश
शिर्डी ला जाऊन त्याला घरी घेऊन
आला तेव्हा साधारण दुपारचे २ वाजले
असतील.. घरी येताना त्याच्या मित्राने
शिर्डीहून travels बद्दल
माहिती काढली होती जेणेकरून परत
अहमदाबाद ला जायला त्रास होणार नाही.
चौकशी केल्यावर कळले कि रात्री ११
वाजता ची बस आहे.
रात्री जेवण उरकले पण
एवढ्या रात्री मित्राला travels ची बस
पकडायला शिर्डी ला जावे लागणार होते.
म्हणून तो त्याची पल्सर गाडी घेऊन
मित्राला शिर्डी ला सोडायला निघाला.
जाताना त्याला आईने सांगितले होते
कि या रोड वर खूप अपघात होतात. तू
जास्त वेगाने गाडी चालवू नको. पण निलेश
काही ऐकणाऱ्यातला नव्हता. त्याच्याकडे
पल्सर २२० सीसी बाईक होती म्हणजे वेगळे
काही सांगायलाच नको. त्याने अगदी वेगात
गाडी पळवली आणि रात्री ठीक ११
वाजता ती बस जिथून सुटणार होती तिथे
पोहोचले. पण नंतर त्यांना कळले कि बस
थोडी उशिरा सुटणार आहे म्हणून बस
जाईपर्यंत निलेश मित्राबरोबर थांबला.
साधारण १२ वाजता बस शिर्डीहून
निघाली आणि बस सुटल्यावर
निलेशही घरी यायला निघाला. रस्त्यात
शिर्डी जवळच गणेश नगर नावाचे एक गाव
लागते तिथे एक धोक्याचे वळण आहे.
त्या वळणावर खूप अपघात झाले आहेत.
आणि विशेष म्हणजे दर
अमावास्येला आणि पौर्णिमेला तिथे
लोकांना वाईट अनुभव येतोच.
रस्तावरची वर्दळ खूपच कमी झाली होती.
त्या वळणावरून जात असताना निलेश
ला असे जाणवले कि रस्त्यात
अगदी मधोमध कोणी तरी उभे आहे म्हणून
त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला. पण हळू
हळू पुढे गेल्यावर त्याला तिथे कोणीच
दिसले नाही. त्याला वाटले कि भास
झाला असेल म्हणून त्याने पुन्हा वेग
वाढवला. वेग वाढवल्यावर त्याला वाटले
गाडी वर खूप लोड आलाय. त्याने अजून
वेग वाढवला पण लोड काही कमी होत
नव्हता.
नंतर अचानक त्याला लक्षात आल
कि बाईक वर मागे कोणी तरी बसले आहे.
तो पाहणार तोच आपल्या खांद्यावर
कोणाचा तरी हात आहे असे जाणवले.
घाबरतच त्याने मागे वळून पहिले
आणि त्याची बोबडीच वळली छातीत एकदम
धस्स झाले. १ माणूस त्याच्या बाईक वर
बसला होता. त्या माणसाच्या डोक्यातून
रक्ताच्या धारा वाहत होत्या.
त्या माणसाला एक डोळाच नव्हता. त्याचे
समोरील काही दात पडले होते...
त्या माणसाच्या चेहऱ्यावर कसले
तरी निशाण होते. त्याला पाहून निलेश
ला कळून चुकले होते कि या माणसाचा गणेश
नगर जवळ असलेल्या धोकाच्या वळणावर
नक्कीच अपघात झाला असेल.
पण इतक्यात लवकर हे सगळे थांबणारे
नव्हते. खरे संकट तर अजून यायचे
बाकी होते. त्या माणसाने निलेश
च्या कानाजवळ येउन
काही तरी सांगायचा प्रयत्न केला.
तो म्हणत होता कि "मला हॉस्पिटल मध्ये
घेऊन चल नाही तर मी मरेल." हे ऐकून
निलेश थर थर कापायला लागला.
त्याला अतिशय घाम फुटला. त्याने
अगदी जोर-जोरात हनुमान
चालीसा म्हणायला सुरुवात केली. पण त्याचे
प्रयत्न निष्फळ ठरले. काही क्षणातच
निलेश चा बाईक वरचा कंट्रोल पूर्णपणे
सुटला. बाईक चा वेग अचानक
वाढायला लागला. निलेश बाईक चा वेग
कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करत
होता पण भीतीमुळे तो काय करतोय हेच
त्याला कळेनासे झाले होते. तो माणूस परत
म्हणायला लागला
"मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल नाही तर
मी मरेल."
"मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चल नाही तर
मी मरेल."
बाइक वरचा कंट्रोल सुटल्याने
त्याचा मोठा अपघात झाला. अपघात
झाल्यावर निलेश ने त्या माणसाला पहिले
तर तो खूप विचित्र हसत होता. पण निलेश
चे नशीब खूप चांगले होते. सुदैवाने
इतक्या रात्री एक रुग्णवाहिका(amb
ulance) एका पेशंट ला घेऊन
शिर्डी ला जात होती. त्या रुग्णवाहिकेच्या
चालकाने निलेश ला रक्ताच्या थारोळ्यात
पडलेले पहिले. लगेच त्याने गाडी थांबवून
निलेश ला उचलले
आणि शिर्डी च्या हॉस्पिटल मध्ये नेले.
झालेल्या अपघातामुळे निलेश चा एक पाय
आणि एक हात पूर्ण पणे तुटला होता.
कित्येक दिवस त्याला साधे
उभेही राहता येत नव्हते. त्याने
घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.
त्याच्या आईने तिथे जाऊन विचारपूस
केल्यावर कळले कि तो माणूस एका ट्रक
खाली येउन मरण पावला होता.
मरणाच्या अगोदर
तो लोकांना जीवाच्या आकांताने ओरडून
म्हणत होता कि "मला हॉस्पिटल मध्ये घेऊन
चला नाही तर मी मरेल." पण कोणीच
त्या माणसाची मदत केली नाही. तेव्हा पासून
तो माणूस त्या रोड वरून ये-
जा करणाऱ्या लोकांना अडवून
"मला हॉस्पिटल मध्ये घेऊन चला" असे
म्हणत असतो....