आज मी तुम्हाला कोंकणातील राजापूर ला ३०
वर्षापूर्वी आमच्या सागर काका बरोबर
घडलेला एक भयानक अनुभव सांगणार आहे.
काका तेव्हा राजापूर ला शाळेत शिकायला होता.
शाळे पासून गावाची वाडी ६ किलोमीटर अंतरावर
होती. तेवढे अंतर तो रोज चालत
जायचा आणि लहान पणापासून गावी राहिल्यामुळे
तेवढ अंतर तो सहज रोज चालायचा. पण एके
दिवशी आंबे काढण्याच्या नादात त्याला शाळेतून
घरी जायला उशीर झाला .
संध्याकाळचे ७. ३० वाजले असतील त्याला कळले
कि खूप उशीर झाला आहे सोबतीला सुधा कोणीच
नव्हते तेव्हा त्याने short cut ने
जाण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे त्याचे २
किलोमीटर कमी होणार होते पण एक
भीती होती कि जाताना मधेच स्मशान लागत पण
घरी लवकर जायचं असेल तर त्याच रस्त्याने
जाव लागेल . तो तिथून अगोदर
सुधा गेला होता पण सोबत मित्र असताना.
तो चालत होता त्याच्या मनात
भीती नव्हती कारण रस्ता ओळखीचा होता .
तो स्मशान जवळ पोहचला सगळी कडे एक दम
शांत आणि भयाण वाटत होत. म्हणून त्याने
चालण्याचा वेग वाढवला. स्मशान क्रॉस करून
तो गावाच्या दिशेने निघाला पण अचानक
त्याचा चालण्याचा वेग कमी झाला जस
कि त्याला कोणी मागे खेचतोय .
तरीही तो प्रयत्न करून चालू लागला .
अचानक हवेत मोगर्याच्या फुलांचा सुगंध
दरवळला तो घाबरला कि या स्मशानात
पहिली वेळच असा सुगंध येतोय . मागे वळून
पहायची हिम्मत त्याच्यात नव्हती . अचानक
त्याच्ला मागे बायकांच्या पैंजणानचा आवाज
आला . जस कोणी बाई पैंजण घालून
त्याच्या मागून येतेय.
तो आता आणखीनच
घाबरला त्याला पळता सुधा येत नव्हत . एवढ
कमीच होत कि काय कि अचानक मागून
एका मुलीचा गोड आवाज आला. कि सागर मागे
वळून बघ मी किती सुंदर आहे ते . आता तो खूप
घाबरला आणि विष्णू स्तोत्र म्हणायला सुरवात
तरी सुधा त्या मुलीचा आणि तिच्या पैंजणाचा आवाज
येताच होता.
प्रत्येक क्षणाला त्याच्या चालण्याचा वेग
कमी होत होता पण त्याने ठरवले कि मागे वळून
पाहायचे नाही . कारण त्याला आईने संगी तले
होते कि रात्रीच्या वेळी जर कोणी मागून आवाज
दिला तर त्याच्या कडे वळून पाहायचे
नाही आणि त्याच्या हाकेला ओ
सुधा द्यायचा नाही. आणि हेच आठवून तो हळू
हळू गावच्या वाडीच्या दिशेने चालत होता .
सामान्यतः स्मशान पासून वाडीत जायला २०
मिनिट लागायची . पण सगर एक तसा पासून
चालत होता . तो आवाज आणि सुगंध
अजूनही त्याचा मागून येत होता अचानक
गावच्या वेशीवरील सतीदेवी चे मंदिर
त्याला दिसले. आणि तो जसा त्या मंदिरा जवळ
पोहचला तसा त्याच्या मागून येणारा आवाज
आणि सुगंध दोन्ही नाहीसे झाले . आणि अचानक
पायात जे बंधन वाटत होते आणि चालण्यास
अडथला होत होता तो नाहीसा झाला .
आत्ता त्याने धावायला सुरवात केली तो थेट
घरच्या दरवाजा जवळ आला आणि बेशुद्ध
झाला …………….
जवळ जवळ २ हफ्ते तो आजारी होता.
आणि जेव्हा काका आम्हाला हि गोष्ट सांगत
होता तेव्हा हि त्याने
अनुभवलेली ती भीती त्याच्या डोळ्यात स्पष्ट
दिसत होती …….