.....जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा माझे मित्र
माझ्या शेजारीच उभे होते. मी शुध्दीवर आलो हे
पाहुन त्यांनी माझ्यावर प्रश्नांचा वर्षावच सुरु
केला. आजू बाजुच्या घोळ्क्यामधे एक
व्यक्ति का कुणास ठाऊक पण त्याच्यावरुन
माझी नजर हटतच नव्ह्ती. मी पलंगावरुन उठुन
बसलो.तशी माझी नजर त्या व्यक्तिला शोधू
लागली मात्र काही कोणिहि नव्हते. काही वेळाने
मित्र गेले आणि माझ लक्ष
भिंतीवरच्या कॅलेंडरवर गेले. आज तर
अमावस्या आहे. आणि अमावस्या म्हटल
की भुतांचा दिवस अस एकुन होतो मी.
आणि या सर्व प्रसंगामधे काहि ना काही संबंध
आहे अस मला वाटु लागल. खर तर
माझ्या लक्षात आल की या प्रवासात जर
कोणती गोष्ट
दरवेळी माझ्या कानी पडली ती म्हणजे
अमावस्या आणि परबांचा वाडा .
8 वाजेच्या सुमारास मी तयारी करुन
या गोष्टिचा छडा लावण्यासाठी वाड्याच्या तळघरात
जायचे ठरवले.हातात एक कंदील घेउन
मी निघालो. मनात प्रश्न
आणि उत्सुकता यांनी कळस गाठला.पण
मनाच्या एका कोपरयात भिती मात्र कायम होती.
मला काय कळेल आणि काय समोर येईल
याची कल्पना नसतांनाही एक एक पाउल टाकत
तळघराच्या दरवाज्यापाशी पोहचलो.
दरवाजा जुना आणि भक्कम होता.
दरवाज्याची कड उघडुन आत पाउल ठेवताच
भयावह थंड वारा आणि भितीदायक अंधार
यांच्याशी माझा सामना झाला.बरेच वर्ष बंद
राहिल्याने
कोळ्यांची जाळी आणि जुन्या लाकडाचा वास येत
होता. कंदिलाच्या प्रकाशात हळु-हळू पुढे जात
असतांना माझा पाय कशाला तरी आपटला काय हे
पाहाव म्हणुन मी कंदील त्याच्या दिशेने
वळवला . माझा पाय एका पेटिला आपटला होता.
कंदिल जरा बाजुला ठेउन त्या पेटित काय आहे हे
जाणुन घेण्यासाठी मी ती पेटी उघडली.
पेटी उघडल्यानंतर त्यात अनेक कागद आणि लाल
कपड्यात बांधलेले एक पुस्तक सुध्दा होते .
सगळ्या गोष्टींवर धुळ जमा झाली होती .त्यामुळे
या वस्तु फ़ार जुन्या असाव्या हे ओळखणे
बिलकुल कठिण नव्हते. त्या पुस्तकात काय आहे
हे जाणणे मला आवश्यक वाटु लागले.म्हणुन ते
पुस्तक घेउन मी बाजुला बसलो . कंदिलाच्या मंद
प्रकाशात पुस्तक वाचायला सुरवात केली.
काही पानं वाचल्यानंतर पुस्तकाचा संदर्भ कळु
लागला. ते पुस्तक होते
वाड्याच्या इतिहासाबद्द्ल इथे घड्लेली प्रत्येक
घटना त्या पुस्तकात नमुद केलेली होती. पुस्तक
वाचता -
वाचता मी पुस्तकाच्या शेवच्या काही पानांपर्यंत
पोहचलो आणि पुढची पानं कोरिच होती.पुढे
काहि असेल म्हणुन मी शेवटच्या पानापर्यंत
गेलो. शेवटच्या पानावर लिहीले होते " जर
जीवनाच्या या खेळातुन सुखरुप बाहेर पडायचे
असेल तर मनाच्या चष्म्याने ती कोरी पान वाच
पण जर एकदा तु ती वाचलीस कि मग
तुला अशा प्रसंगांना सामोर जाव लागेल
ज्यांची कल्पना देखिल तु केली नसेल."
या वाक्याने माझ मन धडधडायला लागलं.पण
का कुणास ठाउक मनाच्या आतुन
कुणी तरी मला खुणावत होते कि वाच ती पानं
वाच. धिराने मी मन एकाग्र केले
आणि त्या पानांकडे पाहिले आणि काय आश्चर्य
ज्या पानांवर काही नव्हते तिथे चक्क चित्र
आणि ओळि दिसु लागल्या. .............
(या पुढे जे काहि माझ्या आयुष्यात झाले ते
मी कधीच विसरु शकणार नाही,
याची कल्पना मला नव्हती आणि त्या क्षणापासुन
माझ अख्ख आयुष्यच बदलल.)
त्या कोरया पानांवरची गोष्ट
अशी होती................ सुमारे 100
वर्षांपुर्वी आजच्या परबांचे पुर्वज श्रीमंत
धनाजी परब यांनी या वाड्याची रचना केली.
त्यांची संपत्ती अमाप होते. तसेच ते दयाळू
आणि कर्तबग़ार होते. त्यांच्या हद्दीत
कोणीहि दुःखी नव्ह्ते. परंतु त्यांच नशिबच खराब
कि त्यांना भिमाजी सारखा भाऊ मिळाला. भाऊ
कसला शत्रुच होता तो. त्याला वाटे ही सर्व
संपत्ती आपली असावी. यासाठी त्याने प्रयत्न
सूरू केले. धनाजी विरुध्द कट कारस्थानं करण्यास
सुरू केले. परंतु धनाजी च्या चांगल्या कामांमुळे
भिमाजीचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. म्हणुन
त्याने अघोरी विद्येची मदत घेण्याचे ठरवले.
तो एका मांत्रिकाकडे गेला.
आणि धनाजीच्या विध्वंसाची कामना करु लागला.
त्याच्या प्रयत्नांना यश येऊ लागले. वाड्यात
अघटित घटना घडू लागल्या. कधी जेवणात
पाली पडायच्या तर कधी दारात टाचण्या लावलेले
लिंब व बहूल्या सापडू लागल्या. वाड्यात
रात्री रडण्याचे व्हिवळण्याचे आवाज येऊ
लागले. घरात क्लेश होऊ लागले.
अशा परिस्थीतीत धनाजीची तब्येत बिघडली.
मात्र त्यांचा मुलगा सुर्याजी हुशार व
साहासी होता. त्याला हा सर्व प्रकार
जादुटोण्याचा आहे हे कळाले, लगेच तो राज्यातील
सिद्ध पुरुषांना शोधु लागला. अखेर त्याचा शोध
संपला तो पंचवटी गावात .येथे
त्याला स्वामी परमानंद भेट्ले. सुर्याजीने सर्व
हकिकत परमानंदांना सांगितली. हकिकत
कळल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता आपण
तुझ्या वडिलांकडे गेले पाहीजे असे म्हणुन ते
त्वरित देवगडसाठी रवाना झाले.
देवगडला परबांच्या वाड्यावर पोहचताच
स्वामींना तेथे अघोरी शक्तिंची जाणीव झाली. ते
दारातच थांबले आणि त्यांनी सुर्याजीस देखिल
थांबवले.त्यांचा चेहरा गंभीर होता .त्यांनी बरोबर
आणलेल्या गंगाजलाचा शिंपडा वाड्यावर
केला आणि मंत्र उच्चार सुरु केला .त्या नंतर
त्या घरावरचे संकट दुर झाले. पण भिमाजी अजुन
जिवंत होता, तो स्वतः अघोरी विद्या संपादन
करु लागला. तब्बल 12
वर्षांनी तो परतला तेव्हा सुर्याजी राजा होता.
भिमाजीने आपली सर्व शक्ति परब
घराण्याच्या विधवंसासाठी वापरली पण
सुर्याजीच्या पुंण्यामुळे आणि धाडसा मुळे हे
संकट टळले .भिमाजीचा अंत झाला पण
तो जाता - जाता स्वतःला दुष्ट
शक्तिंच्या स्वाधिन करुन
गेला .सुर्याजीच्या मरणानंतर हळु-हळू सर्व परब
घराण्याचा शेवट झाला.
भिमाजीची आत्मा वाड्यात फ़िरु लागली .पण
सुर्याजीच्या प्रधाणांनी परमानंदांच्या मदतीने
त्यांनी दिव्य आंगठी तयार केली या विचाराने
की भविष्यात या वाड्याला मुक्त
करण्यासाठी नियती कुणाला तरी इथे घेउन येईल
आणि तो हे करुन दाखवेल.........
................ "या कार्यासाठी तुझीच निवड
झाली आहे, तुच या वाड्याला वाचवू शकतोस"
असा आवाज माझ्या कानात घुमु
लागला.मी पटकन उठलो आणि वाट मिळेल तीथे
पळु लागलो .धावता -
धावता मी वाड्याच्या बाहेर पडलो .थांबल्यानंतर
माझ्या मनात एखाद्या जत्रे प्रमाणे
आठणींची गर्दि जमली.अचानक
मला त्या मुलाची आणि त्या लहान
मुलीची आठवण आली, तिने जाता-जाता आपण
कुथे राहतो हे मला सांगितले होते.
या वाड्याविषयी अधिक
माहीती मिळवण्यासाठी त्या चाळीकडे मी जाउ
लागलो.त्या चाळित पोहचल्यावर मी तिथेच
बाकावर बसलेल्या एका आजोबांना 12
व्या खोली विषयी आणि त्या मुली विषयी विचारल
तेव्हा त्यांच्या चेहरया वरचे भावच बदलले. ते
अश्या प्रकारे बोलत होते कि त्यांना मी चेष्टेने
विचारत आहे.ते हसतच मला म्हणाले " किद्याक
माझी मस्करी करतय, तुका दुसरो धंदो मिळाक
नाय?" मी त्यांना याच कारण विचारल तर ते
म्हणाले या चाळित 12 वी खोलिच नाही. यानंतर
मात्र मी चक्रउन गेलो.हा विचार करतच
मी वाड्यावर परतत होतो की अचानक
ती दोन्ही मुल माझ्या समोर
उभी असलेली मला दिसली आणि माझ्या ह्रदयाचा ठोकाच
चुकला. त्या मुलाच्या हातात मशाल होती. शरिर
गोठल्याचा अनुभव आला. हात पाय हलतच
नव्हते .ती मुले माझ्याकडे
आली आणि मला आपल्याबरोबर
एका डोंगरातल्या गुहेत घेउन गेले .तिथे
गेल्यानंतर त्या मुलाने मशाल पेटवली .ति मशाल
त्या गुहेच्या भिंतीकडे
वळवली आणि त्या भितींवर काहितरी कोरल्याचे
मला दिसले .त्या मुलाने मला सांगितले
की उद्या अमवास्या आहे. 100
वर्षांपुर्वी ह्याच दिवशी भिमाजीने
काळी विद्या संपादन केली होती. कारण हा दिवस
100 वर्षांत एकदाच
येतो आणि या दिवशी काळी जादु फ़ार
शक्तिशाली बनते. मी आश्चर्याने विचारलं
“तुला कस काय एवढ माहीत आहे त्यावर
तो हसला आणि म्हणाला "
मी या वाड्याचा राजकुमार सुर्याजी परब.
आणि ही माझी धाकटी बहिण अचानक ते
आपल्या मुळं रुपात आले आणि मला म्हणाले"
मी अस्तित्वात असेपर्यंत या आंगठीचे जतन
केले आणि ही माझी जबाबदारी होती. पण
आता ही आंगठी तिच्या खरया मालकाला आणि या वाड्याच्या वारसदारास
देण्याची वेळ झाली आहे. ति आंगठी अत्यंत
तेजस्वी आणि चमत्कारिक वाटत होती.
आंगठी घेतल्यानंतर मी त्यांना विचारले
तो म्हातारा कोण होता त्यावर राजकुमार
म्हणाला तो भिमाजी होता. “कदाचित तु इथे
येणार आहेस हे त्याला कळाल असेल
आणि तुला थांबवण्या करिता त्याने तुझ्या मनात
या वाड्या विषयी भिती निर्माण करत असेल."
राजकुमार म्हणाला .मी म्हणालो आता यापुढे
काय? यावर राजकुमार उत्तरला “यापुढे तुझ
नशीब आणि ही आंगठी हेच तुला मार्ग
दाखवतील. हे सांगुन ते अद्रुश्य
झाले ..................................
माझ्या आयुष्यातील सर्वात
मोठा लढा आता फ़क्त एक दिवस दुर
होता.......

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel