हि सत्य
घटना माझ्या सोबत घडलेली .
हि घटना २००५ ची म्हणजे साधारण ७-८
वर्ष पूर्वीची गोष्ट आहे......
मी तेव्हा ५ वी-६वी असेन . माझा गाव...
मकुंसर तिकडची हि गोष्ट आहे...
मी आणि माझे कुटुंब आम्ही सर्व
माझ्या आत्याचा घरी म्हणजे
पालघरला सत्यनारायनाच्या
पूजेला गेलो होतो .
पालघर साधारण मकुंसर पासून १२-१५
किमी लांब आहे . आम्ही मकुन्सर
ला जायला एक टमटम पकडली . आमच
पूर्ण कुटुंब त्या टमटम मध्ये होत .
आणि तरी येताना साधारण ११.३०-१२
वाजले होते.
मी driver च्या बाजूला पप्पांच्या मांडीवर
बसलो होतो आणि माझा भाऊ खिडकी जवळ
बसलेला . त्याला टमटम मध्ये
बसायला अडचण होत होती म्हणून त्याने
एक पाय खिडकीच्या बाहेर टाकून
बसला होता ..
पालघर वरून येताना माकुंसार चा आधी केळवे
म्हणून एक गाव लागत . त्या गावात
वस्ती तशी कमी आहे, समुद्र किनारी आहे
ते गाव.
येताना रस्त्याचा बाजूला एक
पाण्याची टाकी आहे, आम्ही येत
होतो तेव्हा मी जरा झोपेतच होतो पण डोळे
उघडे होते टाकीचा जवळ
आम्ही पोहोचलो तेव्हा त्या टाकी चा खाली
बाई तिच्या मुलाला घेऊन
उभी होती आणि ती आमच्या टमटम
ला हात दाखवत होती ,तिचे केस
तिचा पाया पर्यंत येत होते पांढर्या साडीत
ती तिच्या लहान मुलाला घेऊन उभी होती.
driver ही मान्कुसार्चाच मकुन्सरचाच
होता . त्याने हि तिला बघितल .
आणि त्याने लगेच गाडीचा वेग वाढवला .
आम्ही घरी येउन लगेच झोपलो.
दुसर्या दिवशी माझा लहान भाऊ येउन
मला म्हणाला "तुला माहितीये का ? काळ
रात्री त्या सचिन बरोबर काय झाल "
मी म्हणालो " नाही . "
मग त्याने सांगितल " अरे आपल्या मागून
तो सचिन येत होता ना त्याची jeep
घेऊन .
त्याला रस्त्यात एका टाकी जवळ एक बाई
दिसली . पांढरी साडी , पायापर्यंत तिचे
केस होते. तिच्या लहान मुला सोबत
उभी होती ती . तिने याची जीप बघून
याला हात दाखवला .
याने jeep थांबवली .
ती म्हणाली 'मकुन्सर ला सोडता का जरा ?'
येव्हड्या रात्री हि बाई पोराला घेऊन
एकटीच उभी , म्हणून सचिन तिला लिफ्ट
दिली .
आणि हा निघाला मकुन्सर ला यायला .
आपल गाव सुरु होताना जे ब्रम्ह देवच मंदिर
लागत ना , तिथे आल्यावर याच लक्ष मागे
गेल ...तर ती बाई पोरा सकट गायबच
ना jeep मधून !!!!!!.
हा जाम घाबरला .. ११० च्या स्पीड ने
त्यांनी जीप पळवली . गावात
आला आणि गावातल्या माणसांना हा प्रकार
सांगितला .
तेव्हा कोणतरी आजोबा त्याला म्हणाले '
एका बाईने आपल्या पोटच्या पोराला घेऊन
काही वर्षांपूवी त्या टाकीत
आत्महत्या केलेली . तेव्हा पासून ती दर
आमावस्येला कोणाला न
कोणाला तरी दिसते.'
हे एकून सचिन
एवढा घाबरला कि त्याला ताप आला ,
रात्रभर तपाने फ़ण्फ़णत होता आणि आज
सकाळी त्याचा मृत्यू झाला. "
मी हे ऐकून खूप घाबरलो आणि पुढे जे
भावाने सांगितल ते ऐकून तर अजूनच .
तो म्हणाला " अरे तेव्हा आपण येत
होतो ना . त्या रात्री मी एक पाय
खिडकीच्या बाहेर टाकून बसलो होतो .
रस्त्याच्या बाजूला एक
पाण्याची टाकी होती वाटत , तिथे
चालत्या टमटम मधून कोणीतरी माझा पाय
खेचत होत !! पण driver ने स्पीड लगेच
वाढवला म्हणून मी वाचलो नायतर पडलोच
असतो खिडकीतून खाली . "
माझ्या भाव सोबत घडलेली ही घटना मात्र
आम्ही घरच्यांपासून लपवून ठेवली .
तो किस्सा आठवला की अजूनही माझ्या अंगा
काटा येतो .