शांतीदेवी मुलांच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे . महात्मा गांधी द्वारा प्रसिद्ध समितीने तिची पडताळणी केली जे शांतिदेवी बरोबर तिच्या पूर्वजन्मीच्या गावी गेले होते व तिथल्या
घटनांचा आढावा घेतला .
१८ जानेवारी १९०२ मध्ये मथुरेच्या रहिवासी चतुर्भुज च्या घरी एका मुलीचा जन्म झाला जिचे नाव ठेवलं लुगडी . जेव्हा लुगडी १० वर्षाची झाली तेव्हा तीच लग्न जवळच्याच दुकानदार
असलेल्या केदारनाथ चौबेंशी करून दिलं होते . हि केदारनाथच दुसरं लग्न होतं कारण त्याची पहिली पत्नी मरण पावली होती . केदारनाथ ची मथुरेमध्ये आणि हरिद्वारला कपड्याची
दुकाने होती . लुगडी फारच धार्मिक होती आणि खूप कमी वयात कित्येक धार्मिक स्थळांना जाऊन आली होती . अश्याच एका तीर्थयात्रेला गेलेली असताना तिच्या पायाला मार लागला
ज्याचा इलाज प्रथम मथुरा व नंतर आग्ऱ्याला केला .
जेव्हा लुगडी पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ओप्रेशन नंतर तिला मृत बालक झाले . दुसर्या खेपेच्या वेळी तिचा चिंतीत पती तिला आग्र्याच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला जिथे
तिने ओप्रेशन नंतरच २५ सप्टेम्बर १९२५ ला एका मुलाला जन्म दिला . परंतु ९ दिवसांनंतर , ४ ऑक्टोबर लुग्डीची परिस्थिती बिगडली आणि तिचा मृत्यू झाला .
लुग्डीच्या मृत्युनंतर एक वर्ष १० महिने ७ दिवसानंतर , ११ डिसेंबर १९२६ ला दिल्लीच्या चीरावाला मोहोल्ल्याच्या बाबू रंग्बाहाद्दूर च्या घरी एका मुलीचा जन्म झाला जिचे नाव त्यांनी
शांतिदेवी ठेवले . ती सर्वसामान्य मुलीसारखीच होती पण ४ वर्षाची होईपर्यंत ती जास्त बोलू शकत नव्हती . पण जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा ती वेगळीच मुलगी होती -
ती आपल्या पती आणि "बाळाच्या गोष्टी करत होती . तिने सांगितलं कि तिचे पती मथुरेत आहेत जिथे त्याचं कपड्याचे दुकान आणि त्यांचा एक मुलगा आहे . ती स्वतःला चौबईन
म्हणवू लागली (चौबेची बायको) आईवडलांनी हि बालकल्प्ना समजून दुर्लक्ष केलं . पण त्यांना चिंता वाटू लागली जेव्हा तिने पुन्हा पुन्हा आपल्या पातीबारोबरच्या मथुरेच्या
जीवनाबाबत बोलायला सुरुवात केली . काही वेळा जेवणाच्यावेळी ती म्हणायची की "मथुरेमध्ये मी वेगळ्या प्रकारची मिठाई खात होती " . तिने आपल्या पतीच्या तीन निशाण्या
सांगितल्या कि तो गोरा होता , त्याचा डाव्या खाकेत मोठा मस होता आणि तो चष्मा घालत होता . तिने हेही सांगितलं की तिच्या पतीचे दुकान द्वारकाधीश मंदिराच्या समोर होतं .
ह्या वेळेपर्येंत शांतिदेवी सहा वर्षाची झाली होती आणि तिचे आईवडील तिच्या गप्पांनी हैराण झाले होते . मुलीने आपल्या मृत्यूची सविस्तर माहिती सगळ्यांना दिली होती . त्यांनी
त्यांच्या चिकित्सकाला हि गोष्ट सांगितली तेव्हा ते हैराण झाले कि एवढ्या छोट्या मुलीला ह्या गुंतागुंतीच्या शात्रीक्रीयेबद्दल कसे माहित ?
अशा तर्हेने हे रहस्य अजून गहिर झालं . जस जसे काळ उलटला ती आपल्या आईवडलांना मथुरेला चलण्याविषयी विनंती करत राहिली . पण जवळ जवळ आठ ते नऊ वर्षापर्यंत तिने
आपल्या पतीच नाव सांगितलं नाही कारण भारतात बायका आपल्या पतीचं नाव घेत नाही . जर कुणी विचारलं तर ती लाजून सांगत असे कि मला तिथे घेऊन जा मी त्यांना ओळखीन
. एक दिवस दिल्लीच्या शाळेत शिक्षक असलेले नातेवाईक बाबू बिश्चंद शांतीला म्हणाले कि जर तिने पतीचे नाव सांगितले तर ते तिला मथुरेला गेऊन जातील . ह्या प्रलोभनाला बली
पडून तिने त्यांच्या कानात पंडित कैदरनाथ चौबे हे नाव सांगितले . बिश्चंद यांनी सांगितले कि ते चौकशी करून मथुरेला जायची तयारी करतील . त्यांनी पंडित केदारनाथ चौबेंना पत्र
लिहिलं आणि त्यांना दिल्लीला यायला सांगितलं . केदार नाथांना सर्व गोष्टींची खात्री करून सल्ला दिला कि त्यांचा दिल्लीत राहणारा नातेवाईक पंडित कान्जीमल संतीला अगोदर भेटेल
. कान्जीमल सोबत एक बैठक बोलावली गेली ज्यात शांती देवींनी आपल्या पतीचा भाऊ म्हणून ओळख दिली . तिने आपल्या पतीच्या घराची आणि जिथे आपले पैसे गाडून ठेवले होते
त्याची सिद्ध माहिती दिली . तिने हे सुद्धा सागितलं कि तिला मथुरेला घेऊन गेले तर ती स्वतः रेल्वे स्टेशन पासून घरी एकटी जाऊ शकते . कनजिम्ल च्या सांगण्यानुसार केदारनाथ १२
नोव्हेंबर १९३५ रोजी, लुग्दीचा मुलगा नवनीत लाल आणि त्यांची आत्ताची पत्नी ह्याच्यासोबत दिल्लीला आले . शांतीने सहजपणे आपल्या पतीला ओळखलं आणि आपल्या आईला
म्हणाली , "मी म्हटल होत ना ? माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या गालावर एक म्हस आहे ." तिने आपल्या आईला पतीची आवडीची भाजी बनवायला सांगितली . नंतर
केदार्नाथांनी जास्त पप्रश्न विचारल्यावर तिने आपल्या मथुरेच्या घरात असलेल्या विरीचा उल्लेख केला जिथे ती रोज आंघोळ करत असे . तिने आपल्या मुलाला देखील सहजपणे
ओळखलं . खरं तर ती त्याला खूपच लहान असताना सोडून गेली होती . "वादा करून सुधा तुम्ही दुसर लग्न का केलंत ? " असा प्रश्न तिने आपल्या पतीला विचारला .
केदारनाथ गेल्यानंतर शांतिदेवी खूप उदास झाली आणि मथुरेला जाण्याचा हट्ट करू लागली . गांधीजी द्वारे गठीत समिती तिला घेऊन मथुरेला पोचली . जिथे तिने आपल्या घरचा पत्ता
रिक्षेवाल्याला सहज दिला . आपल्या घरी पोचल्यावर तिने तिथे असलेल्या लोकांना , सहज ओळखलं आणि घरातल्या मुख्य खोल्यांचा मार्गही सांगितला . शांतीने इतर जागाही सहज
ओळखल्या आणि जिथे तिने पैसे लपवले होते ती जागाही दाखवली . आपल्या वडिलांकडे गेल्यावर तिने आपल्या आईवडिलांनाही ओळखलं आणि आईला मिठीमारून खूप रडली जे पाहून
लोक हैराण झाले .
आपल्या तपासा दरम्यान केदारनाथ चे एक मित्र पंडित रामनाथ चौबेन्नी एक महत्वपूर्ण गोष्ट सागितली , ज्याची आम्ही इतर सुत्रानाकाडूनही माहिती केली .
जेव्हा केदारनाथ दिल्लीत होते तेव्हा पंडित रामनाथ चौबेंकडे एक रात्र राहिले होते . सगळे झोपले होते फक्त केदारनाथ , त्याची पत्नी , मुलगा नवनीत आणि शांती खोलीत होते .
नवनीत गाढ निद्रेत होता .
केदारनाथ नि शांतीला विचारले कि जर तिला गाठ होती आणि ती उठू शकत नव्हती तर ती गर्भवती कशी झाली ? शांतीने केदारनाथ सोबतची संभोगाच्या संपूर्ण क्रियेचे वर्णन केलं
ज्यामुळे केदार्नाथांना पूर्ण विश्वास पटला कि शांती त्यांचीच पत्नी लुगडी आहे . जेव्हा हि घटनेबाबत शांतीदेविला विचारलं तेव्हा म्हणाली "हो ह्या गोष्टीमुळे त्याचा माझ्याबाबत पूर्ण
विश्वास बसला होता ."
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.