शेतकरी आणि पहिलवान दोघं म्ज्ञणतात की चला बाबा लवकर नाहीतर तो आपल्याला ढेकणा सारखं मारून टाकेल असं बोलून ते जाण्यासाठी निघतात ते निघाले असताना पंलगावरील पहिलवान त्यांना पाहतो अरे कोण आहे रे तिकडे पकडा त्यांना हे ते दोघे ऐकतात तेव्हा दोघेही धुम ठोकतात दोघे पुढे आणि पहिलवान त्यांच्या मागे असे करत करत एक माणूस धान्याची डोंगरा एवढं राशी बनवून एक शेरराच्या मापाने तो धान्य खात असतो ते दोघे त्याचा जवळ जाऊन म्हणतात की आम्हाला कुठे तरी लपवा तो पहिलवान आम्हाला मारायला येत आहे लवकरात लवकर लपवून ठेवा तो माणूस त्यांना आपल्या दोन्ही गालात दोन्ही बाजूला दोन असं लपवितो तो पहिलवान त्या माणसाला विचारतो की तू त्या दोन माणसांना पाहिले आहे का पण तोंडांत दोघांना लपविल्यामुळे त्याला बोलता येत नाही तो नुसता मान हलवितो तो पहिलवान भडकतो आणि रागाने लाल बुंद होऊन म्हणतो की नुसते मान काय हलवितोच त्यांना पाहिले आहे का तो परत मान हलवितो पहिलवान अजून भडकतो तू स्व:ताला काय समजतोस असेल हिम्मत तर माझ्या बरोबर कुस्ती खेळ जो जिंकेल तोच सिकंदर समजलास
. क्रमशः