<p dir="ltr">ब्राम्हणाला मुलगा झाल्यावर ब्राम्हण सगळ्या ब्राम्हण वाडीत तो पेठे वाटतो आणि बारसाचे आमंत्रण दिले जाते बाऱ्याव्या दिवशी मोठ्या थाटामाटात बारसे होते श्रावण महिन्यात तो जन्मंला आहे म्हणून ब्राम्हण त्याचं नाव श्रावण असं ठेवण्यात येते ब्राम्हण सगळ्या गावच्या मुलांची जन्मकुंडली काढत असतात म्हणून ते आपल्या मुलाची तयार करण्यात पसांग साळू लागतात तर त्यांना आच्शर्य वाटते की मुलगा अठरा वर्षांचा झाल्यावर तो चोरी करु शकतो जर का त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर तो मुलगा हळूहळू मोठमोठ्या चोरी करून तब्बल दरोडेखोर बनू शकतो ब्राम्हणांना कुंडली तयार करताना घाम फुटला कशी बशी कुंडली तयार करण्यात येते ब्राम्हणाला आठ दहा दिवस झोप लागत नाही सारखं विचारांनी त्रासलेले असते विचार करून करून त्यांना एक युक्ती सुचली ती म्हणजे या मुलाला आपण लहानपणापासून शिक्षण देऊ या मग मुलाला कळायला लागलं की ब्राम्हण त्याला शिक्षण देण्याचे काम चालू करतात मुलांना लहानपणापासूनच चांगले शिक्षण मिळाले तर ते पुढे त्यांना चांगले वळण लागतं अशाप्रकारे त्या श्रावणाला चांगले शिक्षण मिळत गेले आता तो जेमतेम सतरा आठरा वर्षाचा झाला होता त्या गावाचे राजे यांची मुलगी लग्नाला आली असते म्हणून राजांनी त्या ब्राम्हणाला लग्नकुंडली काढण्यासाठी बोलविण्यात येते ते आपलं सर्व सामान्य घेऊन आणि आपल्या बरोबर मुलाला घेऊन जातात.              <br>
                          क्रमशः</p>
                          क्रमशः</p>