एक गाव होतं त्या गावातील लोक गोविगोविंदाने राहत होते त्या गावातील दहा बारा मुलं शेतातील विहिरीत पोहण्यासाठी गेले होते त्यामध्ये एक मुलगा आंधळा असतो तो विहिरीच्या काठावर बसून नुसतं पाय हालवित बसला होता बाकीची मुले पोहत होती तेवढ्यात आकाशातुन शंकर पार्वती आपल्या नंदी वर चाललेली असतात पार्वतीचे लक्ष त्या आंधळ्या मुलांकडे जाते तो बिचारा विहिरीच्या काठावर बसून नुसतं पाय हालवित बसला आहे ते पाहून माता पार्वती ला दुःख झाले ती शंकर लाल म्हणते की देवा ते खाली बघा तो आंधळा मुलगा विहिरीच्या काठावर बसून नुसतं पाय हालवित बसला आहे ना बाकीची मुले पोहत आहेत मौजमजा करीत आहेत बिचाऱ्या त्या आंधळ्या मुलांनी काय असा अपराध केला आहे की त्याला तुम्ही डोळे का दिलं नाहीस तेव्हा भगवान शंकर म्हणतात की तो मुलगा फारच खोडकर मुलगा आहे त्याला जर डोळे दिले तर तो सगळ्यांना बुडवून टाकेल पार्वती म्हणते की बघु बरं काय करीतो ते शंकर देवांचा नाईलाज होतो ते त्या आंधळ्या मुलाला डोळे देतात मग काय त्या आंधळ्या मुलाला दिसायला लागले मग तो लगेच विहिरीत उडी घेऊन एकेक एक मुलांना बुडून टाकत असतो ते पाहून पार्वती देवी म्हणते की नको रे बाबा देवा होते ते बरं होतं त्या बेचरम मुलाला परत आंधळं करा होता तोच बरा होता
                      ****गोष्ट समाप्त ****

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel