एक वयोवृद्ध ग्रहस्थ आपल्या तीन मुलांना बरोबर गोडी गोविंदाने राहत होते प्रत्येकाचे वेगवेगळे बिराड होते तिघे पण आप आपल्या जबाबदारीची कामे पूर्ण करीत असत त्याबुध्द ग्रहस्थाला वाटते की आपण आता काही दिवसाचे सोबती आहोत म्हणून त्यांनी आपल्या तीन्ही मुलांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हणतले की मी तुम्हाला एक महत्त्वाचे तीन गोष्टी सांगणार आहे त्या नीट लक्षपूर्वक ऐकून घ्या पहिली गोष्ट म्हणजे रोज सकाळी सावलीने शौचाला जावे .दुसरी गोष्ट म्हणजे रोज ताजे खावे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे रोज चांगले कपडे वापरावे ह्या तीन गोष्टी तंतोतंत पालन करणे म्हणजे तुम्ही सुखी व्हाल काही दिवसांनी वडिलांना देवाज्ञा होते त्यांचं सर्व उत्तरकार्य झाल्यावर सर्वात मोठा मुलगा शौचालय पासून घरापर्यंत एक शेड उभारले म्हणजे शौचाला जाताना सावली झाली आहे ना आणि रोज ताजे अन्न करून खात असत रात्रीचं जेवण दुसऱ्या दिवशी खात नसत आणि रोज नविन नविन ़ घालून जात असे जरा कुठे फाटलं तर तो टाकून देत असत त्याला आपण वडिलांनी सांगितले त्याप्रमाणे वागतो आहे ना म्हणून समाधानी होता हे दोन नंबरच्या मुलगा बघतो आणि तो पण त्याच पद्धतीने वागायला लागला पण सर्वात लहान मुलगा घरात एकांतात बसुन विचार करून आपलं वडील हे असे का म्हणाले असतील की परत परत तेच तेच विचार त्यांच्या डोक्यात चालू राहीले असते तो रात्री उशिरापर्यंत झोप लागत नाही पण एकदा डोळा लागतो मग त्याला एक सुंदर स्वप्न साकार होते स्वप्नात एक संन्यासी पहाटे सुर्योदय होण्याच्या आधी तो शौचाला जातो त्यावेळी अंधुक प्रकाश असतो म्हणजे एकप्रकारे सावलीच असते पुढे तो संन्यासी नदीवर जाऊन स्नान करून सुर्याला तिर्थ स्नान करून आपलं जुने अंगावरील कपडे काढून कालचे धुतलेले कपडे घालून जुने कपडे धुवून वाळवून आपल्या आश्रमात जाऊन आपल्याला लागले तेवढं तिजोरी बनवून ते मंदिरात जायला निघाले एवढं स्वप्न पूर्ण झालं वर मुलगा जागा होतो ह्या स्वप्नाचा अर्थ त्याला समजतोय तो मुलगा त्याप्रमाणे वागण्याची सवय लाऊन सुखी होतो बाकीचे दोघे जवळचं सर्व पैसे संपुष्टात येऊन भिकारी होतात लहान भाऊ त्यांना थोडीफार मदत करून आपल्या पद्धतीने वागायला सांगतो आणि सर्व जण सुखी होतात * **गोष्ट समाप्त***