भंमर काही करून जात नव्हता त्यामुळे कर्णाची हालचाल होण्याची भिती वाटत होती कर्ण एकदम ठाम पणे शांत डोके ठेवून जरासुद्धा हालत नव्हता भुंगा आता हळूहळू त्याच्या मांडी कडे येवू पाहत होता काही वेळाने तो मांडी जवळ येऊन मांडीला टोचवू लागला कर्णाच्या मांडीतून कळा येऊ लागल्या होत्या भुंगा मांडीला भोक पाडू लागला त्यामधुन रक्त वाहू लागले होते कर्ण हु की तू करीत नव्हता भुंगाने मांडीला मोठी जखम केली त्यामधुन रक्त वाहू लागले होते परशुराम यांच्या हाताला ते उष्ण रक्त लागले त्यांना जाग आली आणि पाहतात तर काय कर्णाच्या मांडीतून रक्त वाहत आहे आणि कर्ण शांत पणे बसलेला आहे हे बघून परशुराम हे एकदम भडकतात त्यांनी कर्णाला दंडाला धरून उठवितात आणि त्याला ह्यबद्दल जाब विचारला जातो परशुराम त्याला म्हणतात की कर्णा तु कोण आहेस तू ब्राम्हण असू शकत नाही तू क्षत्रिय घराण्यातील कोणीतरी राजपुत्र असू शकतो तू माझी फसवणूक केली आहे माझा घोर अपमान केला आहेस मी तुला आतापर्यंत माझा चांगला शिष्य म्हणून स्वीकारले होते त्याची तू घोर निंदा केली आहेस म्हणुन मी शाप देतो की तुला माझ्याकडुन सर्व विद्या शिकून घेतल्या आहेत ना पण ब्रम्हांत्र हे अत्र आहे त्याबद्दल मी तुला सांगतो की हे अत्र तुझ्या उपयोगी एकदाच येईल दुसऱ्या वेळी ते वापरता येणार नाही कारण तुझ्या डोक्यात त्याचे मंत्र येऊ शकणार नाहीत जा आता माझ्या आश्रमात राहू शकत नाही कर्ण अत्यंत दु:खी अंतःकरणाने परशुराम यांच्या चरणी आपले मस्तक ठेवून त्यांचा आर्शीवाद घेऊन बाहेर पडतो आपल्या राज्यात निघून जातो 
                 ***   गोष्ट समाप्त***


Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel