आपला घोडा कोणीतरी पकडला गेला आहे आपल्याला त्यांनी एक प्रकारचे आव्हान दिले आहे म्हणून श्रीराम आपल्या भाऊ भरताला त्याविरुद्ध मुकाबला करण्यासाठी पाठवतात लव्ह अंकुश भरताला पराभव करून टाकतात भरत खाली मान घालून परतावे लागते श्रीराम भरताला त्याबद्दल जाब विचारायला जातो "भरत कोण आहेत ते वीर त्यांनी तुला पराजीत करून परत पाठविलेला आहे, भरत खाली मान घालून बोलतो की ते दोन लहान बालवीर आहेत कोणी ऋषी कुमार वाटतात"  हे सर्व लक्ष्मण
ऐकुन घेऊन एकदम कोध्राने बोलतो एवढे लहान मुलांना तु पराभूत करु शकला नाहीस. हे भगवंत मला पाठवा त्या दोघांना जेरबंद करुन घेऊन येतो पहा श्रीराम लक्ष्मण यांच्या कडे भरपूर सैन्य देऊन पाठतात पण ते दोघे त्याचा पराभव करून परत पाठवितात आता स्वय श्रीराम सर्व तयारीनिशी फौजफाटा सोबत घेऊन बरोबर हनुमान घेऊन लव्ह अंकुश यांच्या वर चाल करून येतात ही वार्ता सीतामाई यांना समजते त्या वाल्मिकी ऋषी यांच्या चरणी धाव घेऊन करुणा करते पण वाल्मिकी हे ध्यानस्थ बसले होते इकडे श्रीराम लव्ह अंकुश यांच्या मध्ये घनघोर युद्ध चालले होते लव्ह अंकुश मंत्रसार्मथानं आपल्या भवती संरक्षण कवच तयार करून घेऊन लढाई करीत होते हे सर्व दृष्य वाल्मिकी अंतज्ञानाने पाहात होते हनुमान आपल्या रामाच्या मुलांना ओळखतो पण तो बोलून दाखवित नाही सीतामाई युध्दगणावर येऊन श्रीराम हे शेवटचा उपाय म्हणून ते ब्रम्हांत्र सोडणार होते तेवढ्यात तिथे जाऊन मुलांना बाजूला सारून श्रीरामांना ही आपलीच ‌मुले आहेत असे सांगून युद्ध विराम करतं तेवढ्यात वाल्मिकी त्याठिकाणी येऊन सर्वांचा मिलाभ करून आणतात पण सीतामाई यांना हे मान्य नसते त्या भुमातेला आपल्याला सामावून घेण्यासाठी विनवणी करू लागतं धरणीमाता  सीतामाई यांना आपल्या कुशीत सामावून घेतले जाते लव्ह अंकुश आईला पोरंक होतात श्रीराम जड अंतःकरणाने लव्ह अंकुश आपल्या पोटाशी धरून प्रेमभराने मिठी मारुन त्यांना आपल्या राजधानी कडे घेऊन जायचं निघतात वाल्मिकी पण जड अंतःकरणाने निरोप घेतात .
           *** गोष्ट समाप्त***

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel