<p dir="ltr">ब्राम्हण राजकुमारीची लग्नकुंडली काढण्यासाठी पंचांग पाहू लागतात ते एकदम मिलन होतात हे बघून तो मुलगा राजवाड्यात जातो एक एक दालनात पाहत जातो पहिल्या दालनात धान्याची कोठारे असतात दुसऱ्या दालनात कपडे तिसऱ्या दालनात जातो तिथे त्याला सोने चांदी यांचं दागिने भेटतात सोन्याच्या मोहरा मिळतात ते पाहून त्याला हाव सुटते पण लगेच त्याला वडिलांनी सांगितले की सोनं चांदी नाणी चोरली तर एक दोन वर्षाची शिक्षा सुनावली जाते मग तो घाबरतो ते घेत नाही परत कपड्यांच्या दालनात येतो तिथे भारी भारी कपडे असतात वडिलांनी सांगितले की कपडे घेतले तर एक ते सहा महिने शिक्षा होऊ शकते नको रे बाबा असे म्हणत तो परत अन्नधान्य दालनांत येतो तो प्रत्येक धान्य घेऊन बघतो तर काय होईल ते विचार करून करून शेवटी तो मुलगा गव्हाचा कोंडा घेऊन जात असतो त्याला एक शिपाई बघतो तर त्याला वाटते की हा शिपाई राजाला जाऊन सांगेल म्हणून आपण त्या शिपाईगडीला ठार केले तर आपल्याला फाशी देण्यात येईल मग नकोस तो शिपाई पण त्याकडे दुर्लक्ष करून जातो मुलगा आपल्या घरी जातो आणि इकडे राजवाड्यात चोरी झाली आहे असे गोंधळ होतो की राजवाड्यात चोरी झाली राजा शिपाई यांना सर्व तपासुन पाहायला सांगतात सर्व शिपाई शोधाशोध करून पाहातात तर काही नाही चोरीला गेलं तर फक्त गव्हाचा कोंडा चोरला आहे त्याबद्दल राजाला आच्शर्य वाटते राजा म्हणतो की देवा अशा कसला चोर आहे की त्यांनी फक्त गव्हाचा कोंडा चोरला आहे राजा शिपाई यांना दंवडी पिटवून गावच्या रहिवाशी लोकांना कळवा की अशा कोणी चोर असेल तर त्यांनी राजवाड्यात यावं आम्ही त्याला बतिस देण्यात येईल ब्राम्हाणाला ही बातमी समजतं त्यांना हे सर्व काही आपल्या मुलांनी केले असले पाहिजे असे मत व्यक्त करीत ते आपल्या मुलाला जवळ घेऊन विचारतात तो मुलगा कबुल होतो तो म्हणाला मी फक्त गव्हाचा कोंडा चोरला आहे राजा मला फक्त कावेल दुसरं काही करणार नाही ब्राम्हण राजाकडे जाऊन आपली सर्व व्यत्ता सांगतात राजा त्या मुलाला जवळ बोलावून घेऊन त्याला कुरवाळू प्रेमाने हात हातात घेऊन आपला घरजावई करून घेतात आणि त्याला अर्धे राज्य बतिस देण्यात येतं आणि राजा त्याला आपला कायदे मंत्री बनवून घेतला अशाप्रकारे सर्व जण मिळून सुखाने जगू लागतात पाहिलेत बालमित्रांनो नशीब आपणच घडवितो ना ***गोष्ट समाप्त***</p>