दत्त दत्त ध्यान वेडावलें मन । तनु धन प्राण पायीं तुझे ॥१॥

मागणें तें लई आणि नाहीं माई । पददास्य देईं तोष तेणें ॥२॥

संकल्पाचें जाळें तोडियेलें बळें । निःसंकल्प केलें स्वामिरायें ॥३॥

त्रिलोकींचें राज्य तव पदरज । सर्वसुखकंज भृंग ’रंग’ ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel