पडतां पापीं धारी धर्म । दावी सत्यासत्य वर्म ॥१॥

सत्य तप घृति सार । शौच हेचि पाद चार ॥२॥

नेत्र प्रवृत्ति निवृत्ति । स्वर्ग मोक्ष फळ देती ॥३॥

दया दान हात होती । जीव अहिंसा निश्चितीं ॥४॥

’रंग’ निश्चयें राहती । पुनरावृत्ति न पाहती ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel