कधींचा मी ऊभा द्वारीं तव देवा । धांव ये केशवा थांबूं नको ॥१॥

तिळतिळ तूटे जीव हा माधवा । पाहीन केधवां रुप तुझें ॥२॥

काषाय वासस माथा जटाभार । हातीं दंड माळ शोभतसे ॥३॥

जन्मींचा भिकारी फिरें दारोदारीं । लोटीं ना माघारी दीननाथ ॥४॥

बहुतां जन्मां अंतीं पावलें हें द्वार । न करीं धिक्कार दयासिंधो ॥५॥

उच्छिष्टाचा भूका ’रंग’ रंक तोका । न मागे भवसुखा दास्य देईं ॥६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel